Home » मासिक पाळी आल्यानंतर व्यायाम करावा का?

मासिक पाळी आल्यानंतर व्यायाम करावा का?

by Team Gajawaja
0 comment
Exercise during periods
Share

पीरियड्स म्हणजेच मंथली सायकल मुळे बहुतांश महिलांना पोटात दुखते. अशातच पीरियड्सवेळी व्यायाम करावा की नाही या संदर्भात नेहमीच प्रश्न उपस्थितीत राहतो. त्यामुळेच आम्ही तुम्हाला पीरियड्स मध्ये व्यायाम करावा की नाही यबद्दलच अधिक सांगणार आहोत. त्याचसोबत पीरियड्स मध्ये व्यायाम करण्याचे फायदे आणि त्यासंबंधित काही टीप्स ही जाणून घेऊयात. खरंतर पीरियड्समध्ये व्यायाम करता येऊ शकतो. असे मानले जाते की, काही व्यायामांच्या प्रकारांमुळे पीरियड्समध्ये होणारे दुखणे कमी केले जाऊ शकते. या व्यतिरिक्त पीरियड्सच्या वेळी व्यायाम केल्याने अन्य दिवसांच्या तुलनेत शरिर अधिक सक्रिय होऊ शकते.परंतु पीरियड्स दरम्यान प्रत्येक महिलांची स्थिती ही समान नसते. अशातच काहींचा अधिक ब्लड फो होत असतो तर शारिरीक क्षमतेनुसार पीरियड्सच्या वेळी व्यायाम करा किंवा ते करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या. तर पाहूयात पीरियड्समध्ये व्यायाम केल्याने काय फायदे होतात.(Exercise during periods)

-पीएमएसच्या लक्षांसाठी फायदेशीर
पीएमएस म्हणजेच प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम हे पीरियड आल्यानंतर एक किंवा दोन आठवड्यांपूर्वी सुरु होते. या दरम्यान, महिलांना डोके दुखी, तळवे दुखणे किंवा चिडचिड होणे, मुड स्विंग, स्तनांना सूज येणे अशा समस्या जाणवू लागतात. या समस्या दूर करण्यासाठी पीरियड्सच्या वेळी व्यायाम करणे फायदेशीर ठरु शकते.

-ताकद वाढवण्यासाठी लाभदायक
मासिक पाळी दरम्यान हार्मोनमध्ये बदल झाल्याने काही महिलांना अशक्यतपणा वाटू लागते. त्यामुळेच अशक्यतपणा दूर करण्यासाठी तुम्ही हलक्या स्वरुपाचा व्यायाम करु शकता. एका रिसर्चनुसार, व्यायाम केल्याने शरिराला उर्जा मिळते पण रक्तवाहिन्यांमध्ये ही ताकद टिकून राहते.

-मूड ठिक राहतो
पीरियड्सपूर्वी दोन आठवडे आधी ओव्युलेशनच्या वेळी एस्ट्रोजन नावाच्या हार्मोनच्या स्तर वाढू लागतो. तर ओव्यूलोशननंतर एस्ट्रोजन वेगाने वाढतो किंवा कमी होते. तर प्रोजेस्टेरोन हार्मोनचा स्तर वाढणे सुरु होते, त्यामुळेच अधिक थकवा आणि सुस्ती जाणवते. अशातच सकाळच्या वेळेस व्यायाम केल्याने शरिर अॅक्टिव्ह राहतेच पण मूड ही उत्तम राहतो.

हे देखील वाचा- जेवल्यानंतर शतपावली करण्याचे काय फायदे होतात?

Exercise during periods
Exercise during periods

पीरियड्समध्ये करण्यासाठी व्यायामाचे काही प्रकार

-कपालभाति प्राणायाम
पीरियड्समध्ये व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर कपालभाति प्राणायम बेस्ट ऑप्शन असू शकतो. कपालभाति ही एक ब्रिदिंग एक्सरसाइज आहे. त्यामध्ये वेगाने श्वास घेणे आणि सोडण्याची प्रक्रिया होते. पीरियमध्ये होणाऱ्या समस्येपासून दूर राहण्यासाठी नियमित रुपात हे प्राणायम तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकते.(Exercise during periods)

-कॅट काउ पोज
पीरियड्समध्ये कॅट काउ पोझ सुद्धा केली जाऊ शकते. या व्यायामाच्या प्रकारात पोटातील स्नायू, मान आणि पाठीमध्ये खेचल्यासारखे होते. तसेच मणक्यांमध्ये लवचीकता कायम ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते.

-चाइल्ड पोज
मासिक पाळी वेळी चाइल्ड पोज सुद्दा उत्तम मानली जाते. याच्या माध्यमातून पाठीच्या खालील भागात खेचल्यासारखे वाटते. या व्यतिरिक्त तणाव दूर करण्यासाठी, पाठीची समस्या, थकवा आणि गॅस आणि सूज ही समस्या सुद्धा दूर करण्यास मदत होते.

-प्लँक पोज
प्लँक पोज करणे अत्यंत सोप्पे आहे. पीरियड्सच्या वेळी हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरु शकते. हे करताना तुम्हाला हाताच्या जोरावर तुमच्या संपूर्ण शरिराचा भार घ्यायचा आहे आणि तुमचे शरिर हे एका सरळ रेषेत ठेवायचे आहे.

दरम्यान, व्यायाम केल्याने तुमच्या पीरियड्समधील ब्लडचा फ्लो हा कमी करण्यास मदत होणार नाही. पण रक्त प्रवाह हा सुरळीत राहू शकतो. या आधारावर असे मानू शकतो की, व्यायाम केल्याने पीरियड्सचा फ्लो नियंत्रित ठेवण्यात मदत होणार नाही. तसेच पीरियड्सच्या वेळी तुमचे शरिर अधिक स्ट्रेच होणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या. तसेच अधिक पोटात दुखत असेल तर व्यायाम करण्याऐवजी आराम करा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.