समाजातील गरिब आणि दारिद्र रेषेखालील वर्गासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने त्यांच्या विकासासंदर्भात प्रयत्न केले जातात. अशातच गरीब स्वर्ण आणि आर्थिक रुपात असक्ष असलेल्या वर्गातील लोकांसाठी शासकीय नोकरी आणि शिक्षण संस्थेत १० टक्के आरक्षणाअंतर्गत सूट दिली जाते. केंद्र सरकारसह अन्य काही राज्यांनी सुद्धा याबद्दल विद्यार्थ्यांना सूट देण्याचा निर्णय घेतला होता. सध्याच्या काळात बहुतांश राज्यात आरक्षण हे मान्य करण्यात आले आहे.(EWS Certificate)
शासकीय नोकरी आणि शैक्षणि संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा लोकांकडे ईडब्लूएस सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. बहुतांश लोकांना याचा लाभ सुद्धा घ्यायचा असतो पण ते कसे तयार केले जाते आणि त्याचे काय फायदे होतात ते नीट माहिती नसते. अशातच त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. तर जाणून घेऊयात ईडब्लूएस सर्टिफिकेट कसे तयार केले जाते आणि त्याचे नक्की काय फायदे होतात त्याबद्दल अधिक.
हे देखील वाचा- तुम्हाला पॅन कार्डच्या आधारावर ही मिळते पर्सनल लोन, जाणून घ्या कसा कराल अर्ज

ईडब्लूएस सर्टिफिकेट कसे तयार केले जाते?
ईडब्लूएस सर्टिफिकेट तयार करण्यासाठी प्रथम तुम्हाला ईडब्लूएसच्या अर्जाचा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. आता फॉर्ममध्ये दिली गेलेली सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. फॉर्म भरल्यानंतर तेथे तुमचा फोटो आणि सही करावी लागेल. फॉर्म हा तहसीलमध्ये जाऊन लेखापालजवळ द्यावा लागणार आहे आणि तेथे वेरिफिकेशन केले जाईल. उत्तर प्रदेशासारख्या राज्यात सर्वात अखेरीच्या वेळेस ईडब्लूएस अर्जाचा फॉर्म हा तहसीलदाराकडे जातो. तेथे वेरिफिकेशन झाल्यानंतर त्यावर तहसीलदार आपली स्वाक्षरी करतो.(EWS Certificate)
काय आहेत फायदे?
ईडब्लूएस सर्टिफिकेट तयार केल्यामुळे विद्यार्थ्याला शिक्षण आणि शासकीय नोकरीत लाभ मिळतो. त्याचसोबत या कॅटेगरीतील सामान्य वर्गातील लोक आरक्षणाचा लाभ सुद्धा मिळवू शकतात. अशातच जर तुम्हाला सुद्धा नोकरी किंवा शिक्षणासाठी या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर ईडब्लूएस सर्टिफिकेट तयार करणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार, ज्या लोकांचे वर्षभराचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे आणि परिवाराकडे ५ एकरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना ईडब्लूएस सर्टिफिकेट तयार करता येते. याचा पूर्णपणे फायदा तुम्हाला होतो. ईडब्लूएस सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाण पत्र, जातीचा दाखला, एम्पॉलमेंट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साइज फोटो आणि मोबाईल क्रमांक.