परग्रहाबाबत मानवाला कायम उत्सुकता लागून राहिली आहे. या ग्रहांवर जीवन आहे का, याचा शोध जगभरातील अनेक देशांमधून घेण्यात येत आहे. अशा संस्थांसाठी अमेरिकेच्या नासानं एक आशेचा किरण दाखवला आहे. 23 जुलै रोजी नासाच्या पर्सिव्हरेन्स रोव्हरने घेतलेला एक फोटो घेतला आहे. हा फोटो 62 छायाचित्रांना एकत्र करून काढला आहे. नासानं हा फोटो 10 सप्टेंबर रोजी शेअर केला. या छायाचित्रात रोव्हरच्या मध्यभागी, एक खडक दिसत आहे, ज्याला “चेयावा फॉल्स” असे नाव देण्यात आले आहे. या खडकाच्या रचना मंगळावर सूक्ष्मजीव जीवन कधी अस्तित्वात होते का, या प्रश्नाचे उत्तर देणा-या असल्याचा दावा करण्यात आला आहे. मंगळावर जीवन आहे की, या रहस्याची उकल करण्यासाठी नासाच्या रोव्हरनं काढलेलं हे छायाचित्र मदत करत आहे. प्रत्यक्षात हा खडक पृथ्वीवर आणल्यावर त्यावर अधिक संशोधन होणार आहे. यातून लाखो वर्ष जुन्या रहस्य उलगडले जाणार आहे. (Mars)
नासाचा रोव्हर ‘पर्सिव्हरन्स’ ला मंगळावरील कोरड्या नदीत खडक सापडले आहेत. या खडकांचे जे छायाचित्र रोव्हरनं काढलं आहे, त्यामुळे अनेक संशोधकांच्या आशा जागृत झाल्या आहेत. या छायाचित्रामध्ये अब्जावधी वर्षांपूर्वीच्या सूक्ष्म जीवनाचे संकेत असण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. नासाच्या रोव्हरला मंगळावर जो एक खडक सापडला आहे, त्याची तपासणी नासामधील प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. यात मंगळावरील जीवनाबाबत काही पुरावे मिळाले तर, हा मानवी जीवनाबाबत मोठा शोध असल्याचे सांगण्यात येत आहे. नासाने म्हटले आहे की, “त्यांच्या पर्सिव्हरन्सने ‘सॅफायर कॅन्यन‘ नावाचा नमुना घेतला आहे, जो “चेयावा फॉल्स” नावाच्या खडकातून काढण्यात आला होता. (International News)
हे ठिकाण कोरड्या नदीच्या मार्गावर आहे, जे कोट्यवधी वर्षांपूर्वी पाण्याने भरलेले होते.” यामुळेच शास्त्रज्ञांच्या जीवनाबाबतच्या आशा वाढल्या आहेत. या खडकांमध्ये अशा खुणा आहेत की, त्यावरुन अब्जावधी वर्षांपूर्वी तेथे सूक्ष्म जीवन अस्तित्वात असावे असा अनुमान आहे. अर्थात यावर नासाच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, हा फक्त एक प्रारंभिक शोध आहे. रोव्हरने जे काही नमुने गोळा केले आहेत, ते पृथ्वीवर आणल्यानंतरच त्यांची योग्यरित्या तपासणी करता येईल. मंगळावर असलेल्या रोव्हरवर एक ड्रिल जोडलेले आहे. त्यातून ते खडकांचे आणि मातीचे छोटे तुकडे काढून टाकते आणि त्यांना सुरक्षित ठेवते. मंगळावरील कोरड्या नद्या आणि तलावांच्या अवशेषांवरून शास्त्रज्ञांचा दावा आहे की, तिथे अब्जावधी वर्षांपूर्वी तेथे पाणी होते. जर तिथे पाणी होते, तर तिथे हमखास जीवन असणार, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. (Mars)
रोव्हरला जो खडक मिळाला आहे, त्या खडकाचा आकार सुमारे 3 फूट लांब आणि 2 फूट रुंद आहे. विशेष म्हणजे, त्यात काही रंगीबेरंगी ठिपके देखील दिसले आहेत. बिबट्याच्या अंगावर असलेल्या ठिपक्यांसारखे हे ठिपके दिसतात. हे ठिपके म्हणजे, अन्य काहीही नसून खनिजे आहेत. यात सेंद्रिय कार्बन, सल्फर, फॉस्फरस आणि ऑक्सिडाइज्ड लोहाचे प्रमाण जास्त असल्याचे मानले जाते. या सर्व गोष्टी जीवनासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. एका खडकात अनेक प्रकारची खनिजे असल्यामुळे मंगळावर अशा अनेक मौल्यवान खनिजांच्या खाणी असल्याची शक्यताही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या खडकाच्या आत काही रासायनिक घटक आढळले आहेत. हे घटक सूक्ष्मजंतूंमुळे पृथ्वीवर तयार होतात. सूक्ष्मजंतू हे असे जीव आहेत जे उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. (International News)
============
हे देखील वाचा :
Nepal : जर नेहरु यांनी मान्य केले असते तर नेपाळ भारताचे राज्य असते…काय होता प्लॅन?
==============
पण त्यांचे अस्तित्व असते. सुक्ष्मदर्शकाच्या माध्यमातून हे घटक दिसू शकतात. अशाच सुक्ष्मजीवांना पृथ्वीवरील मानवी जीवनाचा आधार मानले जाते. आता मंगळावर सापडेल्या खडकातील खुणा अशाच प्रकारच्या सुक्ष्म जीवांच्या आहेत काय याचा शोध शास्त्रज्ञ करणार आहेत. अंतराळ संशोधनाबाबत महत्त्वाची कामगिरी करणा-या SETI संस्थेच्या जेनिस बिशप आणि मॅसॅच्युसेट्स विद्यापीठाच्या मारियो पॅरेंटे यांनी या शोधाचे वर्णन मानवी जीवनाला आकार देणारे संशोधन असे केले आहे. मात्र या सर्वांवर नासाच्या मुख्य शास्त्रज्ञांनी सावध प्रतिक्रीया दिली आहे. हा एक पुरावा, मंगळावर जीवन होते, हा दावा करण्यासाठी पुरेसा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Mars)
सई बने…
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics