Home » जाणून घ्या एव्हरग्रीन जोडी असणाऱ्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी

जाणून घ्या एव्हरग्रीन जोडी असणाऱ्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ashok Saraf Love Story
Share

आपल्या सामान्य लोकांना नेहमीच कलाकारांच्या आयुष्यात डोकवण्यास आवडत असते. त्यांचे वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्याची सगळ्यांचीच इच्छा असते. त्यातही कलाकार आणि त्यांच्या लव्हस्टोरी ऐकणे जाणून घेणे यात जरा जास्तच स्वारस्य असते. काही लव्हस्टोरी तर अगदी चित्रपटातील कथेसारख्या असतात, तर काही खूपच सोप्या. अशीच एक गाजलेली आणि नेहमीच चर्चेत येणारी एक लव्हस्टोरी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची.(Ashok Saraf Love Story)

मराठी मनोरंजनविश्वातील विनोदाचा बेताज बादशहा म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. अनेक दशकं त्यांनी मराठी सिनेसृष्टीवर राज्य केले. मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील त्यांनी त्यांची ओळख तयार केली. नाटकं, चित्रपट यांमधून आपले मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांची पंच्यात्तरी उलटली असली तरी त्यांचा उत्साह आणि काम करण्याची इच्छा नेहमीच कौतुकास पात्र ठरते.

ashok saraf and nivedita saraf love story

अशा या अशोक सराफ यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी लग्न केले असून, त्यांना अनिकेत नावाचा एक मुलगा देखील आहे. अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांच्यामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. एवढे अंतर असूनही त्यांनी कधीच याचा त्यांच्या संसारामध्ये अडसर होऊ दिला नाही. त्यांच्या लग्नाला बराच विरोध झाला, मात्र तरीही त्यांनी सगळ्यांच्या संमतीने लग्न केले आणि टिकवून देखील दाखवले. आज आपण या सर्वांच्या लाडक्या जोडीची लव्हस्टोरी जाणून घेऊया.(Ashok Saraf Love Story)

निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांची प्रेमकहाणी खऱ्या अर्थाने हटके आणि वेगळी आहे. निवेदिता सराफ यांचे वडील गजानन जोशी आणि अशोक सराफ हे मित्र होते. हे दोघे मित्र `‘डार्लिंग – डार्लिंग’ या नाटकात एकत्र काम करत होते. तेव्हा निवेदिता शाळेत होत्या. एकदिवस नाटकाचा प्रयोग होता आणि त्या दिवशी निवेदिता यांना शाळेला सुट्टी होती. म्ह्णून त्यांचे वडील त्यांना नाटकाला घेऊन गेले. तिथे पहिल्यांदा अशोक सराफ आणि निवेदिता यांची भेट झाली.

त्यानंतर अनेक वर्षांनी दोघांनी सचिन यांच्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या सिनेमात एकत्र काम केले.मात्र यात त्यांचा एकही सीन सोबत नव्हता. विशेष म्हणजे यात त्यांनी बहीण, भावाची भूमिका केली होती. या सिनेमात काम करताना अशोक मामांनी निवेदिता यांना गजानन जोशी यांची मुलगी असल्याचे ओळखले होते.(Ashok Saraf Love Story)

ashok saraf and nivedita saraf love story

पुढे या जोडीने ‘तू सौभाग्यवती हो’ या सिनेमात पुन्हा एकत्र काम केले, मात्र यातही त्यांचा एकत्र सीन नव्हता. पुढे आला ‘धुमधडाका’ या चित्रपटात पहिलाच सीन अशोक सराफ आणि निवेदिता यांचा होता. या सीनमध्ये मामांचे पहिलेच वाक्य होते, “तुला मनासारखा नवरा मिळू देत”.त्यानंतर संपूर्ण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांचे बोलणे झालेच नाही. मात्र अशोक मामांनी तेव्हा निवेदिता यांना गाडी चालवायला शिकवली होती.

पुढे या दोघांचा सिनेमा आला ‘मामला पोरींचा’ याच चित्रपटाच्या दरम्यान त्यांचे सूट जुळले. या सिनेमाच्या शूटिंगला येताना अशोक सराफ यांचा मोठा अपघात झाला होता. तेव्हा त्यांचा त्या अपघातातून खऱ्या अर्थाने पुनर्जन्म झाला. त्यावेळी निवेदिता या पहिल्यांदा त्यांच्या घरी मामांना भेटायला गेल्या होत्या. पुढे मामा यातून बरे झाले. मात्र त्या दरम्यान निवेदिता या अशोक मामांना सतत बघत होत्या. त्यांचे प्रयत्न, मेहनत, कलाकार म्हणून असलेली जिद्द यावरच त्या भाळल्या आणि मामांच्या प्रेमात पडल्या. तेव्हाच त्यांनी ठरवल लग्न करणार तर फक्त अशोकशीच नाहीतर नाही.”(Ashok Saraf Love Story)

हे देखील वाचा : “आरोपांचा काही फरक…” बऱ्याच वर्षांनी लैंगिक छळाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी दिली प्रतिक्रिया

अशोक सराफ आणि निवेदिता हे खऱ्या अर्थाने जवळ आले ते ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान. तेव्हा त्यांनी पक्के ठरवले की थेट लग्नच करायचे. मात्र अडचण होती ती घरच्यांची. निवेदिता यांच्या घरी या लग्नाला साफ नकार होता. याचे मुख्य कारण म्हणजे दोघांमध्ये असलेले वयाचे अंतर. शिवाय त्यांनी सिनेविश्वातील मुळाशी लग्न करू नये अशी निवेदिता यांच्या आईची इच्छा होती. या सर्व काळात निवेदिता यांना भक्कम साठी दिली ती त्यांच्या मोठ्या बहिणीने मीनल परांजपे यांनी.

पुढे सगळे नकार होकारात बदलले आणि निवेदिता आणि अशोक सराफ यांनी गोव्यात मंगेशीच्या देवळात लग्नगाठ बांधली. अशोक सराफ यांचे कुलदैवत असणाऱ्या या मंदिरात त्यांनी लग्न केले. पुढे त्यांचा संसार सुरु झाला आणि अनिकेतच्या त्यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यानंतर मात्र निवेदिता यांनी कामातून ब्रेक घेत पूर्ण वेळ मुलाला देण्याचे ठरवले आणि त्यांनी १४ वर्ष काम केले नाही. सध्या निवेदिता या नाटक, चित्रपट आणि हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम करताना दिसत असून अशोक मामा हे नाटकांमध्ये सक्रिय आहेत.(Ashok Saraf Love Story)

हे देखील वाचा : अर्जुन कपूरच्या बर्थ डेला मलायकाने शेअर केली क्रिप्टिक पोस्ट, दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चाना उधाण

ashok saraf and nivedita saraf love story

याचवर्षी अशोक मामा यांना ‘महाराष्ट्र भूषण’, ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ आणि मराठी नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या लग्नाला या वर्षी ३५ वर्ष पूर्ण होत असून, त्यांनी त्यांच्या या संपूर्ण प्रवासात अनेक चढ उतार पहिले मात्र एकमेकांची साथ कधीच सोडली नाही.

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.