Home » नेदरलँन्डमध्ये मुलांच्या इच्छामरणासाठी तयार केलाय कायदा

नेदरलँन्डमध्ये मुलांच्या इच्छामरणासाठी तयार केलाय कायदा

by Team Gajawaja
0 comment
Euthanasia Law
Share

आई-वडिलांच्या परवानगीने इच्छामृत्यू संदर्भात नेदरलँन्ड सरकारने तयार केलेल्या निर्णयावर जगभरात वादाची स्थिती निर्माण झाली आहे. येथील सरकारने विशेष परिस्थितीत त्या मुलांसाठी इच्छामृत्यूच्या मागणीला परवानगी दिली आहे एखाद्या गंभीर स्थितीतून जात आहेत. त्याचसोबत त्यांच्याकडे आयुष्य जगण्याचा कोणताच अर्थ उरलेला नाही. खास गोष्ट अशी की, नेदरलँन्ड सरकारने आई-वडिलांनी जरी यासाठी नकार दिला तरीही १२ वर्षाखालीली मुलांना या कायद्याचा वापर करता येणार आहे.(Euthanasia Law)

नेदरलँन्ड सरकारने असे म्हटले आहे की, कठीण आणि मृत्यूसारख्या स्थितीतून जात असलेल्या मुलांसाठी हा योग्य पर्याय आहे. हा निर्णय १७ वर्षीय नोआ पोथेवेन हिला कायदेशीर रुपात आयुष्य संपवण्यासाठी परवानगी दिल्यानंतर जवळजवळ चार वर्षांनी आला आहे. दरम्यान इच्छामृत्यूचा कायदा केवळ ५-१० वयोगटातील मुलांसाठीच असणार आहे. त्यावरील वयोगटासाठी नाही.

खरंतर अर्न्हेम मध्ये राहणाऱ्या एका डच मुलीसोबत एक घटना घडली होती, तेव्हा ती केवळ ११ वर्षाची होती. तीन वेळेस तिच्यावर हल्ला झाला होता. तिचे लैंगिक शोषण ही केले गेले होते. त्यानंतर ही अगदी वाईट स्थितीतून जात होती. तिचे नाव नोआ पोथोवेन असे होते. तर वयाच्या १७ व्या वर्षात तिचा मृत्यू झाला.

तिच्यासोबत झालेल्या प्रकारानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तिला एनोरेक्सिया आणि पोस्ट-ट्ऱॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर झाला होता. तिने इच्छामृत्यूसाठी परवानगी मागितली होती. दीर्घकाळापासून पीडितेच्या स्थितीत राहिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्याबद्दल वृत्तपत्रात छापून आले तेव्हा जगाचे लक्ष तिच्याकडे गेले. अखेर असे समोर आले होते की, तिने इच्छामृत्यूसाठी नकार दिला होता. त्यानंतर तिने खाणं-पिणं सोडलं होत. अशातच तिचा मृत्यू झाला. या नंतरच सरकारने नवा नियम तयार केला.(Euthanasia Law)

हेही वाचा: भीषण स्फोटात ‘हा’ डेअरी फार्म झाला उद्ध्वस्त; 18,000 गायी ठार 

नेदरलँन्ड हा असा एक देश आहे जेथे यापूर्वी सुद्धा अल्पवयीन मुले इच्छामृत्यूची मागणी करु शकतात. परंतु अट अशी होती की, वय १२-१५ वर्षादरम्यान असावे. तसेच पालकांची यासाठी परवानगी असावी. तर १६-१७ वयोगटातील मुलं तरुण होण्यापूर्वी ते इच्छामृत्यूसाठी नकार द्यायचे. पण या वयात त्यांचा पालकांना सांगणे फार गरजेचे होते. २०१९ मध्ये झालेल्या एका अभ्यासानंतर नियमांत विस्तार करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार १-१२ वर्षादरम्यान मुलांना आपले आयुष्य संपवण्याच्या मुद्द्यावर विचार करण्यास जोर दिला गेला. जे एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त होते आणि त्यांना मृत्यू हवा होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.