स्वित्झर्लंड या देशाची ओळख जगातील सर्वात सुंदर देश अशी आहे. स्वित्झर्लंडमध्ये पर्यटनासाठी एकदातरी जावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. या देशाचा कोपरा ना कोपरा निसर्गसौदर्यानं नटलेला आहे. स्वित्झर्लंड देश मानव विकास निर्देशांकात प्रथम क्रमांकावर येतो. येथील झुरिच, जिनेव्हा आणि बासेल सारखी शहरे जीवनाच्या गुणवत्तेच्या बाबतीत जगात सर्वोच्च स्थानी आहे. स्वित्झर्लंडमध्ये जगभरातील अनेक चित्रपटांचे चित्रिकरण रोज होत असते. शिवाय येथील खाद्यसंस्कृतीही जगभर ओळखली जाते. विशेष करुन स्वित्झर्लंडचे चॉकलेट आणि कॉफी जगप्रिद्ध आहे. या देशातील नागरिकांचे आयुष्य सर्वाधिक सुखी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच स्वित्झर्लंडचे नागरिक जास्त जगतात. मात्र या नागरिकांना त्यांच्या या जगण्याचाच आता कंटाळा आला आहे, हे सांगितले तर हे खरं आहे.
स्वित्झर्लंडमधील नागरिक त्यांच्या वयाला कंटाळले आहेत. येथील अनेक वृद्ध घरात एकटे रहात आहेत. त्यांना आजारपण नसले तरी ते या जगण्याला कंटाळले आहेत. त्यामुळे या देशात स्वेच्छामरण द्यावे अशी मागणी सर्वाधिक केली जाते. ही मागणी वाढल्यामुळे स्वित्झर्लंड सरकारनं स्वेच्छामरणाला परवानगीही दिली आहे. आता त्याही पुढे जात, या स्वित्झर्लंडमध्ये स्वेच्छामरण मशिनच तयार करण्यात आली आहे. य मशिनमध्ये बसल्यावर काही मिनिटातच संबंधित व्यक्तिचा मृत्य होणार आहे.या मशिनला प्रोसेसर असे म्हणण्यात येते. प्रोसेसरमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे आतील व्यक्ती बेशुद्ध होईल अशी व्यवस्था आहे. मृत्यूपूर्वी पाच मिनिटांपर्यंत हा व्यक्ती बेशुद्धच रहाणार आहे. फक्त एका बटणावर व्यक्तीला इच्छामरण स्विकारता येणार आहे. (Euthanasia In Switzerland)
पण या मशिनमध्ये बसल्यावर एकदा का जर बटन दाबले तर ते परत घेता येणार नाही. स्वित्झर्लंडमध्ये काही वर्षापासून इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी करणा-यांची संख्या वाढली आहे. अशांसाठी हे मशीन महत्त्वाचे मानले जात आहे.हे प्रोसेसर मशीन पोर्टेबल आहे. यात कोणत्याही वैद्यकीय देखरेखीशिवाय मृत्यू होऊ शकतो. मृत्यू होतांना संबधित व्यक्तिला काहीही त्रास होणार नाही, याचीही काळजी हे मशीन तयार करतांना घेण्यात आली आहे. स्पेससारखे कॅप्सूल असलेल्या या इच्छामरण प्रोसेसरची निर्मिती २०१९ मध्ये करण्यात आली होती. मशीनमध्ये ऑक्सिजनचे नायट्रोजनमध्ये रूपांतर होते. ते वापरण्यासाठी २० डॉलर खर्च येतो. तील व्यक्ती बेशुद्ध होतो.
मृत्यूपूर्वी पाच मिनिटांपर्यंत व्यक्ती बेशुद्ध रहातो, त्यामळे त्याला कुठल्याही वेदना जाणवत नाहीत. वेदनामयी मृत्यू होतो, असा दावा ही मशीन तयार करणा-यांनी केला आहे. स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरणाला कायद्याची परवानगी आहे. तरीही या मशिनला कुठपर्यंत परवानगी मिळेल, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. कारण इच्छामरणाची इच्छा असलेल्या व्यक्तींचे प्रथम मानसिक मूल्यांकन करण्यात येते. (Euthanasia In Switzerland)
====================
हे देखील वाचा : एक डान्सिंग आजार, जो नाचवतो आणि जीव घेतो…
====================
यानंतर, व्यक्तीला जांभळ्या रंगाच्या कॅप्सूलमध्ये झोपवून त्याचे दार बंद केले जाते. यानंतर त्या व्यक्तीला आत काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत. आपण कोण आहात, कुठे आहात, असे हे प्रश्न असतील. त्यानंतर प्रोसेसरमधून आवाज येईल की तुम्हाला मरायचे असेल तर हे बटण दाबा. हे बटण एकदा दाबले की प्रोसेसरमधील ऑक्सिजनची पातळी २० टक्क्यांवरून ०.०५ टक्क्यांपर्यंत खाली येते. यासाठी अवघ्या २० सेकंदाचा अवधी लागणार आहे. प्रोसेसरमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे आतील व्यक्ती बेशुद्ध होणार आहे आणि त्यातच त्याचा मृत्यू होणार आहे. (Euthanasia In Switzerland)
स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात सुंदर देश असला तरी या देशात सर्वाधिक आत्महत्या होतात. हे विदारक चित्र आहे. यासर्वांत आजारानं ग्रस्त असलेले आणि वृद्ध नागरिक यांचा समावेश असतो. मानसिक रोगांनी त्रस्त झालेल्या रुग्णांचीही संख्या या देशात अधिक आहे. त्यामुळेच या देशात इच्छामरणाची परवानगी देण्यात आली आहे. असे करणारा स्वित्झर्लंड हा जगातील पहिला देश आहे. यासाठी प्राणघातक अशा इंजेक्शनचा पर्यायही सुचवण्यात आला होता. ज्या देशातील निसर्ग सौंदर्य बघायला अख्खं जग येत, त्या देशाच्या नागरिकांची अवस्था मात्र अतिशय दारुण असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. (Euthanasia In Switzerland)
सई बने