आपली पृथ्वीही सात खंडामध्ये विभागली गेली आहे. त्यापैकीच एक खंड म्हणजे, युरोप (Europe). युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र आणि पूर्वेला काळा समुद्र आहे. अत्यंत समृद्ध असलेल्या या युरोपधील हवामान बदल हा सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. युरोपमध्ये गेल्या काही वर्षात तापमानात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय हवामान तज्ञांच्या मते युरोपचे हवामान एवढे झपाट्यानं बदलत आहे की, 2050 पर्यंत हा संपूर्ण खंड वाळवंट होईल, अशी शक्यता आहे. युरोपमध्ये हवामान बदलाचे प्रमाण एवढे घातक स्वरुपात आहे की, यामुळे सर्व युरोपभर उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ज्या भागात आता बर्फ आहे, तो सर्व बर्फ वितळणार आहे. तसेच जिथे कायम थंड वातावरण राहिले आहे, त्या भागात आता उष्णतेच्या झळा बसणार आहेत. युरोपमध्ये (Europe) झालेले पर्यावरण बदल, आधुनिकतेच्या हव्यासापोटी झालेले बांधकाम हे यासर्वांसाठी कारणीभूत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
हा सर्व ग्लोबल वॉर्मिंगचा प्रकार आहे. याचा जबरदस्त फटका युरोपला बसत आहे. जगातील ज्या देशात थंडी वाजत होती, तेथे कडक उष्मा असल्याचे निदर्शनास आले आहे. तर जो भाग कोरडा होता, जिथे पाऊस अगदी कमी पडत होता, तेथे मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते हा बदल गेली अनेक वर्ष होत होता, मात्र तो दृष्टीस पडत नव्हता. आता हा बदल सर्वांच्याच लक्षात येत असून त्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती प्रभावित होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात शास्त्रज्ञांनी चर्चांचेही आयोजन केले आहे. या चर्चेतील मुद्दे नेचर जर्नल या पर्यावरण विषयक मासिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. जगभरात पर्यावरणात बदल होत आहेत. पण हे बदल युरोपमध्ये (Europe) सर्वाधिक वेगानं होत आहेत. हवामान बदलाचा परिणाम युरोप आणि अमेरिकेसह जगाच्या किनारपट्टीवर होणार आहे. यामुळे पावसाचे प्रमाण आणि स्वरुप बदलणार आहे. जिथे पाऊस पडत नव्हता अशा देशांमध्ये पावसामुळे पूर येणार आहेत आणि ज्या देशात भरपूर पाऊस पडत होता, तिथे पावसाअभावी पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार असल्याचा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. तर जिथे बर्फ आहे, त्या देशातील बर्फ वितळण्यास सुरुवात होणार आहे. हे पाणी समुद्रात मिसळून जे देश समुद्राच्या काठावर आहेत, त्यांनाही यामुळे धोका निर्माण होणार आहे.
या सर्वात युरोप (Europe) आणि अमेरिका या देशांना भविष्यात उष्णतेच्या मोठ्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. ही लाट काही दिवसांसाठी नसून अनेक वर्षांसाठी या भागात येणार आहे. त्यामुळे येथे वाळवंट होईल की काय अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. सध्या अमेरिका आणि युरोपमध्ये उष्णतेची तीव्र लाट आहे. अमेरिकेच्या टेक्सास, कॅलिफोर्निया, ऍरिझोना, न्यू मेक्सिको, नेवाडा, बाजा कॅलिफोर्निया, सोनोरा, चिहुआहुआ आणि कोहुइला या भागात उष्णतेची अतिषय तीव्र लाट आहे. अभ्यासकांच्या मते ही लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याशिवाय स्पेन, इटली, ग्रीस या थंड वातावरण असलेल्या देशांच्या वातावरणातही वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दशकात तापमानात सुमारे 10 अंशांनी वाढ होईल, असेही काही अभ्यासकांचे मत आहे. त्यांच्या मते, अशी परिस्थिती ठराविक वर्षांनी येते. या प्रकारची परिस्थिती हिमयुगातही दिसून आली होती. तेव्हा या भागात असलेले वातावरण बदलले होते.
आता तसेच निसर्गाचे चक्र सुरु असून या सर्व देशांत 2050 पर्यंत तापमान पूर्णपणे बदललेले दिसून येणार आहे. जगातील अनेक देशांना आतापासून अवकाळी पाऊस, अवेळी उष्णता किंवा अवेळी थंडीचा सामना करावा लागत आहे. या सगळ्यांसाठी अटलांटिक महासागरातील हालचालीं महत्त्वाच्या आहेत. अटलांटिक महासागरात विषुववृत्तावरून ध्रुवाकडे एक उबदार प्रवाह वाहतो. हा प्रवाह थंड होऊन खाली बसतो. यामुळे अटलांटिकमध्ये विद्युत प्रवाह तयार होतो. परंतु ग्रीनलँड बर्फ वितळल्यामुळे, खाडी प्रवाहाच्या अभिसरण पद्धतीवर परिणाम होत आहे. हाच कल असाच सुरू राहिला तर जागतिक पातळीवरील पावसाच्या पॅटर्नवरही परिणाम होणार आहे. हे चक्र सुरु झाले असून यामुळेच युरोपमध्ये आणखी वादळांचे प्रमाण वाढले आहे. तर उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर समुद्राची पातळी वाढणार आहे. यामुळे अॅमेझॉन रेनफॉरेस्ट आणि अंटार्क्टिक बर्फाच्या शीटला आणखी धोका निर्माण होणार आहे. (Europe)
========
हे देखील वाचा : ब्रिटीश राजघराण्यापेक्षा 16 पटींनी श्रीमंत आहे ‘हा’ परिवार
========
फक्त युरोप (Europe) आणि अमेरिकाच नाही तर भारतालाही या हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. सध्याही भारतात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. हे बदललेल्या पावसाचे प्रमाणही जागतिक हवामानाच्या बदलामुळे झाले आहे. याचवेळी युरोप आणि अमेरिकेच्या काही भागात प्रचंड उष्मा जाणवत आहे. या हवामान बदलाचे चक्र पुढचे काही वर्ष असेच चालू राहणार आहे.
सई बने