नववर्ष सुरु झालं आहे. हे वर्ष कसं असेल याची उत्सुकता आपल्या प्रत्येकाला आहे. त्यातच या नव्या वर्षाबाबत अनेक भविष्यकारांनी अजबगजब भविष्यवाणी केली आहे. जगावर तिस-या महायुद्धाचे सावट ते परग्रहींपासूनचे युद्ध आदी भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. यात भरीस भर म्हणून काहींनी तर कोरोनापेक्षाही अधिक असे साथीचे रोग या नव्या वर्षात मानवाची डोकेदुखी वाढवतील असा धोका दिला आहे. या सर्वांमध्ये नॉस्ट्राडेमस, बाबा वेंगा, खेम विस्ना आणि हॅना कॅरोल या सर्वांची नावे चर्चेत आहे. रोज या सर्वांनी सांगितलेल्या भविष्यवाणींमुळे धडकी भरत आहे. अशात आणखी एक नाव चर्चेत आलं आहे, ते म्हणजे, एथोस सलोन(Athos Salon). ब्राझीलच्या या तरुणाला प्रती नॉस्ट्राडेमस म्हणण्यात येत आहे. एथोस सलोन या नावाची सध्या सोशल मिडीयावर धूम आहे. एकतर एथोस सलोन हा दिसायला राजबिंडा आहे. त्यामुळे लाखो तरुण-तरुणी त्याचे फॉलोअर्स आहेत. यात तरुणींची संख्या थोडी जास्तच आहे. त्यातच त्यानं अलिकडील काही वर्षात व्यक्त केलेले अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत. त्यामुळेच भविष्यकर्ता नॉस्ट्राडेमस आणि त्याची तुलना करण्यात येत आहे. एथोसनं अगदी अलिकडे फिफा विश्वचषकाबाबतही भविष्यवाणी केली होती. फ्रान्स आणि अर्जेंटीनामध्ये विश्वचषकाचा अखेरचा सामना होऊन अर्जेंटीनाच्या गळ्यात विजयची माळ पडेल असं एथोसनं सोशल मिडीयवर सांगितलं होतं. पण यासोबत एथोसनं व्यक्त केलेल्या काही अन्य संभाव्य घटनांमुळे भीती व्यक्त करण्यात येत आहे, तर त्यानं व्यक्त कलेल्या एका अंदाजाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

ब्राझीलच्या एथोस सलोन (Athos Salon) ने यापूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यानं कोरोना महामारी ते राणी एलिझाबेथ द्वितीयच्या निधनाबाबतही भविष्यवाणी केली होती. ती तारीख अगदी बरोबर निघाल्याचे सांगण्यात येते. आता एथोसने तिसऱ्या महायुद्धाबाबतही दावा केला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने तिसरे महायुद्ध सुरू झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय या नववर्षात रशिया आणि युक्रेनच्या युद्धात आणखीही दोन देश ओढले जाणार आहेत, आणि यातूनच तिसरे महायुद्ध भडकू शकते अशी शक्यताही एथोसनं व्यक्त केली आहे. एथोसच्या (Athos Salon) फॉलोअर्सच्या मते हे दोन देश म्हणजे चीन आणि अमेरिका आहेत. याबरोबर एथोसनं या युद्धात अणुशस्त्रांचाही वापर होऊ शकतो, असा सूचक इशाराही दिला आहे.
ब्राझीलच्या या भविष्यवक्त्याला त्यामुळेच आधुनिक काळातील नॉस्ट्राडेमस म्हटले जाते. एथोसनं यापूर्वीच इलॉन मस्क ट्विटरचा मालक होणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला होता. एथोस हा अगदी लहान असल्यापासून भविष्यवाणी करत आहे. त्याबाबत तो सांगतो, वयाच्या 12 व्या वर्षी मला जाणवले की मी इतरांपेक्षा वेगळा आहे. ज्या घटनांवर माझे नियंत्रण नाही अशा घटनांबाबत मी बोलतो, आणि त्या घटना ख-या होतात. कधी मला स्वतःवरही शंका येते. कारण अनेक वेळा मी अशा गोष्टी बोलतो, ज्या शक्य वाटत नव्हत्या, पण काही काळानंतर खऱ्या होतात. तो त्याच्या क्षमतेचे श्रेय देवाच्या आशीर्वादांना देतो. प्रत्येक मनुष्य ईश्वराच्या अंशाने बनलेला आहे, म्हणून तो अर्धा देव देखील आहे. आणि देवाच्या आशीर्वादानेच मला भविष्यातील घटनांबाबत सूचना मिळते, आणि त्या सूचना मी लोकांसमोर व्यक्त करतो, असे एथोस सांगतो. मात्र या एथोसच्या(Athos Salon) आगामी भविष्यवाणीबाबत कमालीची भीती आणि उत्सुकताही आहे. यात भीती वाटेल अशी भविष्यवाणी म्हणजे त्यानं कोरोनापेक्षाही तापदायक ठरेल अशा विषाणूंबाबत वक्तव्य केले आहे. हे विषाणू अनेक वर्षापासून बर्फांमध्ये दबलेले असतील. जसेजसे अर्टांटीकामधील बर्फ वितळेल तसे हे विषाणू बाहेर येतील आणि जगावर पुन्हा महामारीचे संकट फैलावले असेही एथोस सलोन यांनी सांगितले आहे. काही महिन्यांपूर्वी अर्टांटीका येथे हजारो वर्षापूर्वींचा जीका नावाचा विषाणू मिळाला होता. हा विषाणू कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते.
=======
हे देखील वाचा : मोठी बहिण स्टार आणि आईसुद्धा अभिनेत्री, तरीही डांन्सबार मध्ये काम करुन चालवले घर
======
याशिवाय 2023 हे वर्ष परग्रहींचे वर्ष असल्याचे एथोसनं (Athos Salon) सांगितलं आहे. त्याच्या या भविष्यवाणीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याच्या मतानुसार अमेरिकेच्या नासाला एलियनबाबत माहिती आहे. 2023 मध्ये एलियनचे रहस्य उघड होईल, असेही त्यानं सांगितलं आहे. अमेरिकेच्या एका विशिष्ट भागामध्ये एलियन आहेत. ही मोठी गुहा असून दुस-या जगामध्ये जाण्याचा मार्गही तिथेच आहे. या नव्या वर्षात अमेरिकेनं जगापासून लपवून ठेवलेलं हे एलियनचं रहस्य उघड होणार असल्याचे एथोसंनं सांगितलं आहे. त्याच्या याच भविष्यवाणीची सर्वत्र चर्चा आहे. काहींच्या मते, एथोस (Athos Salon) हा भविष्यकर्ता नसून तो लोकांना फसवत आहे. तर त्याचे फॉलोअर्स लवकरच एथोस किती खरा भविष्यकर्ता आहे, हे जगासमोर उघड होईल असा दावा करीत आहेत. अर्थात काहीही होऊ दे, पण हे वर्ष सुखासमाधानात जाऊ दे, एवढीच आपल्या सर्वांची इच्छा आहे.
सई बने