भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच इथिओपिया या देशाचा दौरा केला. इथिओपिया हा पूर्व आफ्रिकेत स्थित देश आहे. सुदान, दक्षिण सुदान, केनिया, सोमालिया, जिबूती आणि एरिट्रिया यांच्या सीमेवर असलेला इथिओपिया हा त्याच्या नैसर्गिक सौंदर्य, प्राचीन संस्कृती आणि अद्वितीय परंपरांसाठी ओळखला जातो. या देशाचे स्वतंत्र असे १३ महिन्यांचे कॅलेंडर आहे. या देशाला पंतप्रधान मोदी यांनी भेट दिल्यावर त्यांचे स्वागत करण्यासाठी इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली स्वतः उपस्थित होते. या दौ-यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी इथिओपियाची खास वस्तू भेट म्हणून देण्यात आली. ही वस्तू म्हणजे, इथिओपियाची खास कॉफी. इथिओपियाला कॉफीचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. याच देशात पहिल्यांदा कॉफीचा शोध लागला, असे मानले जाते. (Ethiopia)

आज जगभरातील अनेक देशांमध्ये कॉफीचे उत्पादन होते, मात्र इथिओपियामधील कॉफी ही सर्वात अधिक दरानं विकली जाते. या अफ्रिकन देशामधील कॉफीच्या बियांची योग्यता कशी पारखली गेली, आणि ही कॉफी इथिओपियाची ओळख कशी झाली, याची मोठी रंजक कहाणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथिओपियाच्या दौ-यावर असतांना त्यांचे स्वागत करण्यासाठी इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली हे स्वतः विमानतळावर उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी यांना मानवंदना देण्यात आली. मात्र डॉ. अबी यांनी आणखी एका पद्धतीनं केलेले स्वागत जगभरासाठी चर्चेचा विषय ठरले आहे. (International News)
इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी यांनी विमानतळावर कॉफी देऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. डॉ. अबी यांनी विमानतळावरच इथिओपियन संस्कृतीतील एक पवित्र विधी म्हणून पारंपारिक कॉफी समारंभ आयोजित केला. विमानतळावर झालेल्या या कॉफी समारंभाने जगभराचे लक्ष वेधले गेले आहे. इथिओपियातील पारंपारिक कॉफी समारंभ हा बुन्ना समारंभ म्हणून ओळखळा जातो. हा एक विस्तृत सांस्कृतिक विधी आहे. यातून आपली मैत्री आणि आध्यात्मिक संबंध किती दृढ आहेत, हे दाखण्यात येते. इथिओपियाध्ये कॉफी हा जीवनाचा भाग आहे. विश्वासाचे आणि मैत्रीचे प्रतिक म्हणूनही कॉफीकडे या देशात पाहिले जाते. कारण याच देशातून कॉफीचा जन्म झाला असे मानले जाते. आज इथिओपियामधील संपूर्ण आर्थिक प्रगती ही कॉफीमुळेच झाली आहे. इथिओपियामध्ये या कॉफीवर अनेक साहित्यही जन्माला आले आहे. बुना दाबो नाव, अशी तेथील म्हणही आहे. त्याचा अर्थ, कॉफी ही आपली भाकरी आहे. यावरुन तिथे कॉफी किती महत्त्वाची आहे, याची कल्पना येते. (Ethiopia)
इंन्स्टंट कॉफी हा प्रकार इथिओपियाच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. कारण इथे कॉफी पिण्यासाठी आणि त्याआगोदर ती तयार करण्यासाठी किमान एक तासांचा अवघी लागतो. इथिओपियन अस्सल कॉफी करण्यासाठी सामान्यतः एक ते दोन तासांचा वेळ लागतो. यासाठी हबेशा केमिस नावाचा पारंपारिक पांढरा पोशाख, परिधान केलेल्या महिला कच्च्या हिरव्या कॉफी बीन्स धुवून कोळशाच्या आगीवर भाजून घेतात. या बीन्स भाजूलागल्यावर त्यांचा सुगंध कॉफी तयार होत आहे, याची वार्ता आसपास देतो. नंतर या कॉफीच्या भाजलेल्या बिया, लाकडाच्या भांड्यात कुटल्या जातात. हे सर्व झालं की मग मातीच्या भांड्यात ही कॉफी उकळून तयार होते. अशी कॉफी तयार झाल्यानंतर, ती तीन कपामध्ये दिली जाते. यातील प्रत्येक कॉफीचा कप हा वेगळा अर्थ सांगत असतो. पहिल्या कपला अबोल म्हणतात, त्यातून दृढ मैत्रिचा संदेश दिला जातो. (International News)

दुसऱ्या कपाला टोना म्हणतात, म्हणजेच त्यातून मैत्री पुढे जाते. त्यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या कपला बाराका म्हणतात. यातून दृढ झालेल्या नात्याला आशीर्वाद दिला जातो. या कॉफीचा इथोपियामध्ये शोध ९ व्या शतकात एका मेंढपाळाला लागला. या मेंढपाळाच्या बक-या कॉफीच्या बिया खायच्या, त्यानंतर या बक-यांमध्ये उत्साह वाढल्याचे या मेंढपाळानं बघितलं. त्यामुळे त्यानंही उत्सुकतेपोटी या कॉफीच्या बिया खाऊन बघितल्या, तेव्हा त्यालाही उत्साही वाटू लागले. या काल्डी नावाच्या मेंढपाळानं मग त्याला मिळालेल्या कॉफीच्या अन्य बियाही घरी नेल्या. त्या जास्त वेळ टिकाव्यात म्हणून त्यांनी या बिया भाजल्या. पण कॉफीच्या बिया भाजल्यावर त्यातून आलेल्या सुगंधानं हा मेंढपाळ भारावून गेला. मग या बिया कुटून त्यांनी त्याचे पेय तयार केले, आणि जगातील पहिली कॉफी तयार झाली, असे सांगितले जाते. (Ethiopia)
======
हे देखील वाचा : America VS Venezuela : सद्दामच्या वाटेवर मादुरो…
=======
इथिओपियाची अर्थव्यवस्था कॉफीच्या निर्यातीवर अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षात या देशातील या मुख्य उत्पादनावर युरोपमधील देशांनी अक्षरशः डल्ला मारला. त्यामुळे निराश झालेल्या अनेक कॉफी बागायतदारांनी कॉफीचे उत्पादन करणे सोडून दिले होते. मात्र आता तेथील परिस्थिती सुधारत आहे. सध्या इथिओपिया हा कॉफीचा एक प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. जगातील पहिल्या ५ देशांमध्ये इथिओपियाचा समावेश आहे. जर्मनी, सौदी अरेबिया, बेल्जियम, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांमध्ये इथिओपियाची कॉफी सर्वात जास्त निर्यात होते. कॉफीचे जन्मस्थान असलेल्या या देशाचे आणि भारताचे नातेही या कॉफीच्या आधारे अधिक भक्कम झाले आहे. (International News)
सई बने…
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
