Home » जादूटोण्याची पुस्तकं वाचून ती स्वत: भूत झाली !

जादूटोण्याची पुस्तकं वाचून ती स्वत: भूत झाली !

by Team Gajawaja
0 comment
Estefania
Share

जगात विश्वास न बसणाऱ्या इतक्या घटना आहेत. ज्यांचं रहस्य जगासमोर कधीच येतं नाही. जे घडतंय ते का आणि कसं घडतय हे आपल्याला कधीच कळत नाही. मग आपल्यापर्यंत जेव्हा त्या पोहचतात, तेव्हा आपल्यालाच शंका येते की हे खरंच हे घडलं होतं की ही एक दंतकथा आहे. आजची गोष्ट सॉरी खरी घडलेली घटना तशाच प्रकारची आहे. एक १८ वर्षांची मुलगी, जिला भुताच्या गोष्टी, तंत्र-मंत्र आणि जादू टोण्याची पुस्तक वाचायची आवड होती. अशी पुस्तकं वाचायला तिला दिवस सुद्धा कमी पडायचा इतके ती हे पुस्तकं वाचत होती. पण काही दिवसांनी तिच्यासोबत अशा गोष्टी घडू लागल्या, जे ऐकल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण या घटनेच साक्षीदार स्वत: पोलिस सुद्धा आहेत. कोण होती ही मुलगी? तिच्यासोबत काय घडलं? जाणून घेऊया. (Estefania)

ही गोष्ट आहे १९९१ च्या आसपासची स्पेनच्या मॅड्रिड शहरात राहणाऱ्या 18 वर्षांच्या Estefania Gutierrez Lazaro ची. Estefania ही तिच्या आई-वडील आणि छोट्या भावंडांसोबत राहत होती.आधी जसं सांगितलं तसं तिला भुताच्या गोष्टी, तंत्र-मंत्र आणि जादू टोण्याची पुस्तकं वाचायची आवड होती. या पुस्तकांमुळे तिच्या आयुष्यात काही इपरित घडेल असं कोणालाचं वाटलं नव्हतं. 1973 मध्ये जन्मलेल्या Estefania च्या आयुष्यात 18 वर्षांपर्यंत सर्व काही ठीकठाक होतं. पण दिवस Estefania कॉलेजमधून घरी परतली, तेव्हा तिचं वागणं जरा बदलेलं होतं. ती रोजच्यासारखी वागत नव्हती तिच्या चालण्या बोलण्यात खूप फरक पडला होता. तिच्या कुटुंबीयांना तिच्या या वागणुकीमुळे चिंता वाटू लागली. (International News)

कुटुंबांना चिंता वाटण्याचं कारण सुद्धा तसंच होतं. Estefania तिच्या लहान भावाकडे पाहून जनावारांसारखं गुरगुरत होती, जनावरांसारखेच आवाज काढत होती. ती ज्या प्रकारे तिच्या भावाकडे पाहत होती. असं वाटत होतं ती त्याला मारणार आहे. हे पाहून तिच्या आई वाडिलांना तिची आणखींच काळजी वाटू लागली. जेव्हा ती नॉर्मल असायची तेव्हा Estefania च्या आई-वडिलांनी तिला विचारलं की तिच्या अशा वागण्याचं कारण काय आहे? तर Estefania ला सुद्धा समजत नव्हतं की ती असं का करत आहे, पण तिने तिच्या आई वडिलांना सांगितलं की तिला रात्री मध्यरात्री एक सावली दिसते, आणि त्या नंतरच तिचं वागणं बदलायला सुरुवात होते. Estefania चं असं वागणं जेव्हा हाताबाहेर जाऊ लागलं, तेव्हा तिच्या आई वडिलांनी ती वाचते ते सर्व पुस्तक लपवून ठेवली. (Estefania)

पण दिवसेंदिवस Estefania ची स्थिती आणखी वाईट होऊ लागली. अखेर, तिच्या वडिलांनी चर्चमधल्या एका पादरीकडून मदत मागितली, पण त्याला देखील यावर काहीच उपाय सापडला नाही. शेवटी, Estefania ला एका हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. तिथे Estefania ची बारकाईने तपासणी केली गेली, पण तिचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. डॉक्टरांनी सांगितलं की तिला कोणतीही शारीरिक किंवा मानसिक समस्या नाही. ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे ठीक आहे. तरीही, Estefania ची तब्येत झपाट्याने खालावत गेली. ती एकदम कमजोर आणि दुबळी झाली. डॉक्टरांनी काही दिवसांसाठी तिला रुग्णालयात ठेवलं पण अचानक एके दिवशी Estefania चा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं कळलं की तिचा मृत्यू हृदयाचे ठोके थांबल्यामुळे झाला. Estefania च्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहावर कैथोलिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. ती घरातली सर्वात मोठी मुलगी होती, म्हणून तिचे आई वडीलांना धक्का बसला होता. तिच्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी एका खोलीत सुरक्षित ठेवल आणि खोलीच्या दरवाजाला टाळा लावला. (International News)

आता सगळं नॉर्मल होतं. Estefania ला जाऊन सुद्धा बरेच दिवस लोटले होते. Estefania च्या आईने एक दिवस Estefania च्या खोलीची साफ सफाई करण्यासाठी ती खोली उघडली. तेव्हा तिच्या आईला खोलीत Estefania चं समान अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं. तिच्या आई- वडिलांना वाटलं की घरतल्याचं कोणी तरी हे केलेलं असेल. म्हणून त्यांनी त्या वस्तु व्यवस्थित पुन्हा जागवेर ठेवल्या. काही दिवसांनी, पुन्हा ती खोली उघडली तेव्हा सुद्धा Estefania च्या सर्व वस्तू खोलीत अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या, आता Estefania च्या कुटुंबीयांना शंका आली आणि त्यांनी रोज खोली उघडण्याचा निर्णय घेतला. ते वस्तू नीट जागेवर ठेवायचे, आणि जेव्हा ते खोली उघडायचे तेव्हा त्यांना ते समान अस्ताव्यस्त पडलेलं दिसायचं. (Estefania)

काही दिवसांनी, त्यांना त्या खोलीच्या भिंतींवर नखाच्या ओरखड्याचे निशाण सुद्धा दिसले, या खोलीत नक्की काय चाललं आहे, हे त्यांना कळतंच नव्हतं. त्यामुळे ते भयभीत झाले होते. त्यामुळे त्यांनी त्या खोलीला नट-बॉल्ट लावून कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेतला. पण, त्या रात्रीचं त्या खोलीतून विचित्र आवाज येऊ लागले. Estefania च्या कुटुंबीयांनी शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धाव घेतली. तर शेजाऱ्यांनी देखील तशेच आवाज ऐकल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी कुटुंबाने ती खोली बंद करण्यासाठी सुताराला बोलावून घेतलं, आणि ती खोली पॅक बंद केली. एकदा Estefania च्या शाळेचे शिक्षक तिच्या घरी आले. अशा विचित्र घटनांमुळे Estefania च्या कुटुंबाची परिस्थिती आधीच बिकट झाली होती. त्यात या शिक्षकांनी त्यांना Estefania बद्दल जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. (International News)

शिक्षकाने सांगितलं की शाळेत Estefania ची एक घनिष्ट मैत्रीण होती, जिचा बॉयफ्रेंडचा अपघातात मृत्यू झाला होता. त्या नंतर, Estefania ची मैत्रीण डिप्रेशनमध्ये गेली होती. तेव्हा Estefania, तिची मैत्रीण आणि आणखी २, ३ मुली शाळेच्या मागच्या बाजूला तंत्र मंत्र करताना या शिक्षकाने त्यांना पकडलं होतं आणि त्यांना तिथून हाकलून दिलं. पण त्या मुलींपैकी एका मुलीने शिक्षकाला सांगितलं की Estefania ही भूतांशी बोलते आणि ती तिच्या मैत्रिणीच्या मृत बॉयफ्रेंडच्या आत्म्याशी बोलतं होती. शिक्षकाची ही गोष्ट ऐकून लाजारोच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी ती खोली बंद केली होती. या घटनांमुळे त्यांनी ठरवलं होतं की हे घर सोडून दुसरीकडे राहिला जावं. पण एक रात्री Estefania च्या आईला एक विचित्र अनुभव आला. ती झोपलेली असताना तिला असं वाटलं की कोणीतरी तिच्या छातीवर बसलं आहे. कुटुंबाने आता मदतीसाठी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. (Estefania)

=====

हे देखील वाचा :  युद्ध झालं होतं एका फळासाठी !

========

पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना त्या खोलीत घरातील इतर खोलींपेक्षा जास्त थंडावा जाणवला. शेजाऱ्यांचं आणि त्या कुटुंबाचं बोलणं ऐकून पोलिसांनी दुसऱ्या दिवशी रात्री तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री पोलिसांनी ते विचित्र अनुभव स्वत: घेतले. त्या रात्री Estefania चा भाऊ बेडवरून फुटबॉल सारखा उड्या मारत होता, कधी एका ठिकाणी तर कधी दुसऱ्या ठिकाणी तो जातं होता. Estefania च्या खोलीत थंड वारे वाहत होते, तर घरातील इतर खोल्यांमध्ये थंडीचा लवलेशही नव्हता. इतकंच नाही तर पोलिसांना रात्रभर ते आवाजही ऐकू आले आणि त्यांनी या सर्व गोष्टी आपल्या रीपोर्टमध्ये लिहून ठेवल्या. पोलिसांमुळे हे प्रकरण मीडियासमोर सुद्धा आलं. पोलिसांनी या घटना होण्या मागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. तपासणी केली. पण त्यांना ते कारण कधी कळालच नाही. नंतर पोलिसांनी कुटुंबाला ते घर सोडण्याचा सल्ला दिला. Estefania च्या कुटुंबाने घर सोडल्यानंतर त्यांना तशा कोणत्याही घटनांचा सामना करावा लागला नाही. आजही स्पेनमध्ये ही गोष्ट एक रहस्यचं आहे, ज्याचं उत्तर कधीही मिळालं नाही. (International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.