तुम्ही आयुष्यात अनेक पुल पाहिले असतील. त्यापैकी काही पुलांवर गाडी चालणे म्हणजे श्वास रोखून धरल्यासारखे आहे.असे पुल कसे पार करायचे असा प्रश्नच पडतो. ऐवढेच नव्हे तर या पुलावरुन नकोच जायला असा निर्णय घेतो. मात्र जापान मध्ये असा एक खतरनाक पुल आहे. त्यावरुन जाणे म्हणजे आकाशातून वर जाऊन खाली पडल्यासारखा अनुभव येतो. तुम्ही अशा पुलावर जाण्याचे धाडस कराल का? खरंतर एशिमा ओहाशी असे त्या पुलाचे नाव आहे.(Eshima Ohashi Bridge)
जापान मधील सर्वाधिक धोकादायक पुलांपैकी हा एक आहे. तर जगातील सर्वाधिक तीसरा धोकादायक पुल मानला जातो. झोपाळ्याच्या आकाराचा हा पुल नाकौमा झऱ्याजवळच आहे. तो मैटसू आणि सकाईमिनाटो शहराला जोडतो. दोन्ही पुल 1.7 किमी लांब आणि 11.4 मीटर रुंद आहे.
या पुलावर गाजी चालणे म्हणजे एखाद्या रोलरकोस्टर राइड सारखा अनुभव येतो. हा पुल 2004 मध्ये तयार करण्यात आला होता. त्यावरुन जाताना आधी अचानक वरच्या टोकाला जाणे आणि थेट खाली जातो असा वळणावळणाचा रस्ता या पुलासाठी तयार करण्यात आला आहे कांक्रिटने तयार करण्यात आलेल्या पुलाच्या दुतर्फा गाड्या धावू शकतात. तो १.७ किमी लांब आहे. या पुलाचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात तुफान व्हायरल होतात..

एशिमा ओहाशी पुलाचे काम 1997 मध्ये सुरु झाले होते आणि 2014 मध्ये त्याचे काम पूर्ण झाले. हा पुल 6.1 टक्के शिमानो प्रांतात झुकलेला आहे तर 5.1 टक्के भाग हा टोटारी प्रांतात झुकलेला आहे. आपल्या विचित्र डिझाइनमुळे हा पुल अत्यंत धोकादायक मानला जातो. पुलाची खासियत पाहता देहात्सु कंपनीने आपल्या टांटो मिनीवॅनच्या जाहिरातीत याचा उल्लेख केला होता. जाहिरातात पुलाच्या माध्यमातून गाडीच्या स्थिरतेबद्दल सांगण्यात आले होते.(Eshima Ohashi Bridge)
हेही वाचा- ट्रॅव्हल इंन्शुरन्ससोबत करा तुमचा प्रवास सुरक्षित, जाणून घ्या फायदे
एशिमा ब्रीज हा दिसायला खतरनाक जरी असला तरीही पर्यटकांचा तो आकर्षण बिंदू आहे. आपल्या आजूबाजूला असलेला सुंदर परिसर पाहण्यासाठी सुद्धा पर्यंटक फार उत्सुक असतात. पुलावरुन नकाउमी झरा आणि माउंच डाइसन मधून बाहेर पडल्यानंतर डाइकॉइन बेटाचे सौंदर्य पाहता येते. या पुलाच्या निर्मितीसाठी तब्बल 200 मिलियन डॉलरपेक्षा पेक्षा खर्च आला होता. या पुलाची उंची 45 मीटर असल्याचे सांगितले जाते.