कर्मचारी भविष्य निधी संगठनेने म्हणजेच ईपीएफओ कडून ई-नॉमिनेशन हे अनिवार्य केले आहे. खरंतर कोणत्याही बचत खात्यासाठी सुद्धा खातेधारकाने नॉनिमी ठेवणे हे गरजेचे असते आणि याचा फायदा नक्कीच होते. त्यामुळे खातेधारकाच्या मृत्युनंतर खात्यातील सर्व पैसे हे नॉमिनीला दिले जातात. मात्र अशातच आता ईपीएफओने सुद्धा ई-नॉमिनी ठेवणे अनिवार्य जरी केले असले तरीही एकापेक्षा अधिक जणांना नॉमिनी म्हणून ठेवता येणार आहे. (EPFO Nominee)
ई-नॉमिनेश पीएफ खातेधारक किंवा त्याच्या परिवारातील सदस्याला पीएफचा फायदा मिळण्यास खुप फायदेशीर ठरणार आहे. जर पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास तर प्रोविडेंट फंड, पेंन्शन, बीमा याचा फायदा हा ई-नॉमिनी असलेल्या व्यक्तीला होतो. त्यामुळेच नॉमिनेशन ठेवणे फार महत्वाचे असते.
परिवारातील सदस्यच होऊ शकतो नॉमिनी
पीएफ खातेधारक हा आपल्या परिवारातील सदस्यालाच आपला नॉमिनी करु शकतो. जर एखाद्याचा परिवार नसेल तर तो अन्य व्यक्तिला नॉमिनी म्हणून ठेवू शकतो. मात्र जरी तुम्ही दुसऱ्याला नॉमिनीला ठेवलात आणि वेरिफिकेशनमध्ये कळले की, तुमचा परिवार आहे तर तुमचे नॉमिनेशन रद्द होते. जर कर्मचाऱ्याने नॉमिनीचा उल्लेख केला नसेल आणि त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या उत्तराधिकाऱ्याला पीएफ मिळण्यासाठी उत्तराधिकार प्रमाण-पत्र मिळवण्यासाठी सिव्हिल कोर्टात जावे लागते.
हे देखील वाचा- एखाद्यासाठी Loan Guarantor रहाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

एकापेक्षा अधिक नॉमिनी ठेवता येतात?
पीएफ खातेधारक हा एकापेक्षा अधिक जणांना नॉमिनी म्हणून घोषित करु शकतो. त्यासाठी तुम्हाला व्यक्तींची माहिती द्यावी लागते. त्याचसोबत कोणत्या नॉमिनीला किती पैसे मिळणार याचा सुद्धा उल्लेख करावा लागतो.(EPFO Nominee)
कसे कराल ई-नॉमिनेशन
-ई-नॉमिनेशनसाठी प्रथम तुम्हाला ईपीएफओची अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in येथे लॉग इन करावे लागणार आहे
-सर्विस टॅपमध्ये ड्रॉप डाउन मेन्यूमधून फॉर इम्पॉलइजच्या ऑप्शनवर क्लिक करा
-आता आपल्या युएएन क्रमांकासह लॉग इन करा
-मॅनेज टॅब दिसेल, यामध्ये ई-नॉमिनेशन ऑप्शन निवडा
-आता तुमचा पत्ता टाका
-फॅमिलि डिक्लेरेशन बदलण्यासाठी YES सिलेक्ट करा
-नॉमिनीची माहिती द्या आणि सेव्ह ऑप्शनवर क्लिक करा
-आता ई-साइन आयकॉनवर क्लिक करा
-आपला आधार क्रमांक द्या आणि रजिस्टर मोबाईल क्रमांवर आलेला ओटीपी सुद्धा द्या
-ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे नॉमिनेशन अपडेट होईल.
तर अशाप्रकारे तुम्ही पीएफच्या खात्यासाठी ई-नॉमिनेशसाठी एकापेक्षा अधिक जणांना नॉमिनी म्हणून ठेवू शकता. त्याचसोबत सध्या आता ईपीएफओकडून ऑनलाईन पद्धतीने पीएफ काढण्याची सुद्धा सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिल्याने सर्व काही गोष्टी या सोप्प्या झाल्या आहेत.