लॉस एंजेलिस येथे होणार्या ‘ऑस्कर अवॉर्ड्स’ (Oscars 2022) साठी संपूर्ण जगाचा मनोरंजन उद्योग खूप उत्सुक आहे. कारण मनोरंजन विश्वासाठी ती सर्वात मोठी उत्सवाची रात्र असेल. २७ मार्च रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस (Los Angeles) येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
या अवॉर्ड शोसाठी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते तसेच फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. रेड कार्पेटवर त्यांचे आवडते कलाकार कोणते डिझायनिंग पोशाख घालतील हे पाहण्यासाठी भारतीय चाहतेही खूप उत्सुक आहेत.
ऑस्कर अवॉर्ड्स म्हणजेच ९४ वा सोहळा पुरस्कार २७ मार्च रोजी रात्री लॉस एंजेलिसमध्ये सुरू होणार आहेत, परंतु वेळेतील फरकामुळे, सोमवारी, २८ मार्च रोजी भारतात त्याचे प्रसारण पाहू शकतात.

====
हे देखील वाचा: टायगर श्रॉफ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, नवाजुद्दीन विलनच्या भूमिकेत
====
हे यूएस मध्ये २७ मार्च रोजी संध्याकाळी ८ वाजता थेट प्रेक्षेपण असेल परंतु भारतात २८ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता पुरस्कार सोहळा पाहू शकतात. हा सोहळा वेबसाईट्सवर तसेच टीव्ही चॅनेलवर पाहता येईल. स्टार वर्ल्ड आणि स्टार मुव्हीजवर सकाळी ६.३० वाजता हा सोहळा प्रसारित होईल.
हे ३ सेलिब्रिटी ऑस्करचे होस्ट असतील
तब्बल ३ वर्षांनंतर या पुरस्कारांचे आयोजन ‘ऑन ग्राउंड’ होत आहे. यापूर्वी हा अवॉर्ड शो कोरोना महामारीमुळे आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.
यामुळेच यावेळी तीन सेलिब्रिटी हा शो होस्ट करताना दिसणार आहेत. कॉमेडियन एमी शुमर, रेजिना हॉल आणि वांडा सायक्स यांच्यासोबत ९४ व्या पुरस्कारांचे आयोजन केले जाणार आहे. एलेनने हा शो अनेकदा होस्टही केला आहे.
====
हे देखील वाचा: कीवमध्ये रशियन हल्ल्यात प्रसिद्ध युक्रेनियन अभिनेत्रीचा मृत्यु
====
भारतातील एका डॉक्युमेंटरीला ऑस्कर नामांकन
यावर्षी ऑस्कर 2022 मध्ये भारतातून फक्त एका डॉक्युमेंटरीला नामांकन मिळाले आहे. दिल्लीतील रिंटू थॉमस आणि सुष्मित घोष या दोन चित्रपट निर्मात्यांनी ही डॉक्युमेंटरी बनवली आहे. ‘रायटिंग विथ फायर’ असे या डॉक्युमेंटरीचे नाव आहे.