Home » पतीकडून बेदम मारहाण, आत्महत्या करण्याचाही केलाय ‘या’ अभिनेत्रीने प्रयत्न

पतीकडून बेदम मारहाण, आत्महत्या करण्याचाही केलाय ‘या’ अभिनेत्रीने प्रयत्न

अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे नेहमीच वादाच्या चर्चेत अडकलेली असते. पूनम पांडेच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्याबद्दल अधिक बोलले जाते.

by Team Gajawaja
0 comment
Entertainment
Share

Entertainment : कंगना राणौतचा शो लॉक अपमध्ये स्पर्धक म्हणून झळकलेली पूनम पांडेला सर्वजण ओखळतात. सोशल मीडियावर मृत्यूची खोटी बातमी चालवणे असो किंवा खासगी आयुष्यातील काही घटना अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पूनम पांडेने आपल्या करियरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. याशिवाय अभिनेत्रीने हिंदी सिनेमांसह भोजपुरी, तेलुगु आणि कन्नड भाषेतील काही सिनेमांमध्ये काम केले आहे.

पतीकडून मारहाण
11 मार्चला जन्मलेली पूनम पांडे नेहमीच वादाच्या कचाट्यात अडकलेली असते. प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत येते. लॉक अप शो दरम्यान पूनम पांडेने विवाहिक आयुष्याबद्दलचे काही धक्कादायक खुलासे केले होते. दरम्यान, पूनम पांडेने तिचा दीर्घकाळ प्रियकर राहिलेला सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न अवघ्या काही दिवसातच मोडले गेले.

शो वेळी पूनम पांडेने खुलासा केला होता की, ज्या नात्यात मी होते त्यामध्ये चार व्यवस्थितीत आयुष्य जगली नाही. मला पार्टनर कुत्र्यासारखा मारहाण करायचा. मला बेडरुममध्ये मारहाण केली जायची. एवढेच नव्हे मारहाण करताना फोनही फुटला गेलाय. खरंतर, याबद्दल मी कोणालाही सांगितले नाही. याशिवाय विष प्राशन करून आयुष्य संपवण्याचाही विचार केला होता. लग्न मोडू नये म्हणून देखील प्रयत्न केले. या सर्व गोष्टींमुळे काही वेळेस डिप्रेशनचाही सामना करावा लागला आहे. (Entertainment)

आयुष्य संपवण्याचा विचार
लग्नानंतर पूनम पांडे पतीसोबत गोव्याला हनीमूनसाठी गेली होती. तेव्हाच सॅम बॉम्बेने तिला बेदम मारहाण केली होती. याशिवाय पूनमने सॅमच्या विरोधात पोलिसात गुन्हाही दाखल केला होता. यानंतर गोवा पोलिसांनी पूनमच्या पतीला अटक केली होती.


आणखी वाचा :
मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
सोनाली कुलकर्णीचे आकर्षक फोटोशूट

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.