बॉलिवूडमध्ये लग्न(wedding) होणे जितके सहज आहे त्यापेक्षा जास्त ते तुटणे किंवा घटस्फोट होणे सहज आहे. बॉलिवूडमध्ये रोजच कोणाचे ना कोणाचे ब्रेकअप होते किंवा घटस्फोट होतो. बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला असे अनेक कपल आहेत, ज्यांनी एकापेक्षा जास्त लग्न केली आहेत. त्यांना त्यांच्या लग्नामध्ये यश न मिळाल्यामुळे त्यांनी अधिक लग्न केले आणि चर्चेत आले. अनेकांनी तर दोन तीन लग्न देखील केले. आज आपण या लेखातून अशाच काही सेलिब्रिटींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी दोन पेक्षा अधिक लग्न करत तुफान लाइमलाइट मिळवली.
किशोर कुमार :
या यादीत पहिले नाव आहे किशोर कुमार यांचे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात चार लग्न केले. त्यांचे पहिले लग्न १९५० साली रुमा गुहा ठाकुरतासोबत झाले होते. मात्र लग्नाच्या आठ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर १९६० साली त्यांनी मधुबाला यांच्यासोबत लग्न केले, पुढे मधुबाला यांचे निधन झाले. पुढे १९७६ साली त्यांनी योगिता बाली यांच्याशी तिसरे लग्न केले. हे लग्न देखील खूप कमी टिकले आणि मोडले. पुढे १९८० साली त्यांनी चौथे लग्न लीना चंद्रावरकर सोबत केले त्यांना दोन मुलं आहेत.
कबीर बेदी :
कबीर बेदी यांनी देखील चार लग्न(wedding) केले. त्यांचे पहिले लग्न डान्सर प्रोतिमा बेदीसोबत झाले. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न ब्रिटिश फॅशन डिझायनर असलेल्या सुसैन हम्फ्रेस यांच्याशी केले. हे लग्न देखील टिकले नाही. १९९० साली कबीर बेदी यांनी तिसरे लग्न टीव्ही आणि रेडिओ प्रेझेन्टर निक्कीसोबत केले आणि २००५ साली दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी ब्रिटिश मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या परवीन दुसांजसोबत चौथे लग्न केले.
संजय दत्त :
अभिनेता संजय दत्तने पहिले लग्न १९८७ साली अभिनेत्री रिचा शर्मासोबत केले. रिचाचे १९९६ साली ब्रेन ट्युमरने निधन झाले. १९९८ साली त्याने रिया पिल्लईसोबत दुसरे लग्न केले. सात वर्षांनी ते वेगळे झाले. २००८ साली संजयने तिसरे लग्न(wedding) मान्यता सोबत केले या दोघांना आता दोन मुलं आहेत.
करण सिंह ग्रोवर :
करण सिंग ग्रोव्हरने पहिले लग्न अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत केले. त्यांचे लग्न केवळ १० महिने चालले. २०१२ साली करणने टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत दुसरे लग्न केले. २०१४ साली ते वेगळे झाले. मग २०१६ बिपाशा बसुसोबत तिसरे लग्न केले आता हे दोघं सुखात संसार करत आहे.
सिद्धार्थ रॉय कपूर :
निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरने देखील तीन लग्न केले. त्याने पहिले लग्न त्याची मैत्रीण आरती बजाजसोबत केले. दुसरे लग्न टीव्ही निर्माती कवितासोबत केले मात्र हेही लग्न(wedding) जास्त टिकेल नाही नंतर त्याने तिसरे लग्न त्याने अभिनेत्री विद्या बालनसोबत केले.
विधु विनोद चोपड़ा :
दिग्दर्शक आणि निर्माता विधू विनोद चोप्रा ७० च्या दशकात पहिले लग्न फिल्म एडिटर रेणू सलुजासोबत केले. त्यानंतर शबनम सुखदेवसोबत दुसरे लग्न केले. १९९० साली त्यांनी तिसरे लग्न फिल्म क्रिटिक अनुपमा चोप्रासोबत केले.
अदनान सामी :
गायक संगीतकार अदनान सामीने १९९३ साली जेबा बख्तियारसोबत पहिले लग्न केले. त्यानंतर दुबईच्या सबाह गलदारी नावाच्या मुलीशी २००१ साली दुसरे लग्न केले आणि २००९ साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याने तिसरे लग्न जर्मन मुलगी असलेल्या रोया फरयाबीसोबत केले त्यांना एक मुलगी आहे.
लकी अली :
गायक लकी अलीने देखील तीन लग्न केले. लकीने पहिले लग्न अभिनेत्री मेघन जेन मकक्लियरीसोबत केले घटस्फोटानंतर त्याने दुसरे लग्न इनाया नावाच्या पर्शियन महिलेसोबत केले. त्यांना दोन मुलं झाले आणि त्यानंतर ते वेगळे झाले. २०१० साली त्याने वयाच्या ५२ व्या वर्षी ब्रिटिश ब्यूटी क्वीन केट एलिजाबेथसोबत तिसरे लग्न(wedding) केले त्यांना एक मुलगा आहे.