एक Secret Society जी संपूर्ण जगाला चालवते, जगातील मोठमोठ्या राजकरण्यांपासून ते नेत्यापर्यंत सगळे या Secret Society चे सदस्य आहेत. तुमच्या डोक्यात आता नाव आलं असेल, ते Illuminati बरोबर. कारण अशा चर्चा जेव्हा होतात तेव्हा Illuminatiचं नाव घेतलं जातं. पण आपल्या भारतात सुद्धा एक Secret Society होती, आहे. जिला सम्राट अशोकाने तयार केलं होतं. जे आजही गुप्त ज्ञानाची रक्षा करत आहेत. ज्यांना Nine Unknown Men असं म्हटलं जातं. सम्राट अशोकाने या नऊ जणांवर काय जबाबदारी टाकली होती ? हे Nine Unknown Men काय आहे? जाणून घेऊ. (Illuminati)
कलिंगच्या युद्धाने सम्राट अशोकाला आतून हादरवून टाकलं. लाखो लोकांचा मृत्यू पाहून त्याने युद्ध आणि साम्राज्य कायमचं सोडलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला. त्याने अहिंसा आणि शांततेचा प्रसार सुरू केला. पण त्यांना एक भीती होती की प्राचीन भारतातलं अफाट ज्ञान जर चुकीच्या हातात पडलं, तर काय होईल ? म्हणून त्यांनी ‘नऊ अज्ञात माणसांचा एक गुप्त समाज तयार केला. या नऊ जणांची जबाबदारी होती, मानवजातीचं सर्वात धोकादायक आणि मौल्यवान ज्ञान सुरक्षित ठेवणं. (History)
या ९ जणांना वेगवेगळ्या क्षेत्रांतील ज्ञान देण्यात आलं. त्यांचं काम होतं—आपल्या क्षेत्रात मास्टर बनायचं, जास्तीत जास्त ज्ञान गोळा करायचं आणि ते एका पुस्तकात लिहून ठेवायचं. ही क्षेत्रं होती : प्रोपगंडा, फिजियोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, अल्केमी, कम्युनिकेशन, ग्रॅव्हिटी, कॉस्मोगनी, लाइट आणि सोशियोलॉजी. या ९ पुस्तकांबद्दल डीटेल सांगायचं तर.. (Illuminati)
प्रोपगंडा या पहिल्या पुस्तकात लोकांच्या मनावर प्रभाव टाकण्याच्या त्यांना हवं तसं आपल्या बाजूने वळवण्याच्या Psychological आणि Biological पद्धती आहेत.
दुसरं पुस्तक होतं फिजियोलॉजीचं, यात मानवी शरीराबद्दल माहिती आहे. ज्याचामध्ये स्वःसुरक्षेसाठी काही Techniques दिल्या आहेत, त्यात एक ‘टच ऑफ डेथ’ नावाची Technique आहे. ती Technique येणाऱ्या माणसाला फक्त स्पर्शाने कोणालाही मारता येत होतं. असं सुद्धा बोललं जातं की या पुस्तकातील काही पानं हरवली होती, आणि त्या पानांच्या माहतीच्या आधारावरच जूडो हा मार्शल आर्ट जन्म झाला. पण ही माहिती किती सत्य आहे, हे माहित नाही. या पुस्तकात माणसाला मारण्याच्या Technique आहेत, तर तिसऱ्या मायक्रोबायोलॉजी या पुस्तकात बायोटेक्नॉलॉजीचं प्रगत ज्ञान होतं. कॅन्सरसारख्या आजारांवर उपचार आणि अजून न सापडलेल्या रोगांचंही वर्णन या पुस्तकात आहे. एवढं महत्त्वाचं ज्ञान या पुस्तकात होतं, तर ते लपवलं का जातं? कारण जर हे ज्ञान सार्वजनिक झालं, तर मोठ मोठ्या कंपन्या याचा गैरवापर करतील किंवा नवे व्हायरस बनवले जातील, म्हणून.(Illuminati)
अल्केमी, या चौथ्या पुस्तकातली माहिती तुम्हाला चमत्कारिक वाटू शकते. अल्केमी म्हणजे अशी कला आहे, ज्याद्वारे कोणत्याही सामान्य धातूला उच्च दर्जाच्या धातूंमध्ये रूपांतरित करता येऊ शकतं. असे अनेक पुरावे सापडले आहेत, जे हे सिद्ध करतात की ही कला चीन, भारत, युरोप आणि अनेक इस्लामिक देशांमध्ये प्रचलित होती. पण अनेक वर्षांत हे ज्ञान लुप्त झालं. पण सम्राट अशोकांच्या नऊ अज्ञातांपैकी एकाकडे हे ज्ञान आजही आहे!
पाचवं पुस्तक होतं कम्युनिकेशन या विषयावर, ज्यामध्ये फक्त जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत संवाद साधण्याच्या तंत्रांचा उल्लेख नव्हता, तर aliens शी सुद्धा संपर्क आणि संवाद साधण्याच्या तंत्राची माहिती आहे. (History)
सहाव्या पुस्तकात गुरुत्वाकर्षणावर आधारित एक अशी मशीन बनवण्याची प्रक्रिया लिहिली होती, ज्याद्वारे अँटी-ग्रॅव्हिटी फ्लाइंग मेकॅनिझम तयार करता येऊ शकतं. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, हे मेकॅनिझम कोणत्याही इंधनाशिवाय कार्य करु शकतं आणि अमर्याद काळापर्यंत हवेत तरंगू शकतं.
=================
हे देखील वाचा : Pamban Bridge : अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार ठरणारा पांबन पूल !
=================
आठव्या पुस्तकाचं शीर्षक होतं ‘प्रकाश’. यात फक्त प्रकाशाच्या वैशिष्ट्यांची माहिती नव्हती, तर प्रकाशाचा वेग, प्रकाशाचे गुणधर्म आणि प्रकाशाचा प्राणघातक शस्त्र म्हणून वापर कसा करता येईल, अशा असंख्य तंत्रांचा उल्लेख होता. आणि शेवटचं नववं पुस्तक होतं ‘सोशियोलॉजीचं पुस्तक’. या पुस्तकात काहीही प्राणघातक नव्हतं, तर अशा तंत्रांचा उल्लेख होता, ज्याद्वारे बंडखोर समाजांना नियंत्रित करता येऊ शकतं आणि अशा पद्धतीही लिहिल्या होत्या, ज्याद्वारे त्या समाजाचा नाश घडवून आणता येईल. (History)
या 9 पुस्तकांत मानवजातीचं भविष्यातील १००-२०० वर्षांपर्यंतचं ज्ञान आहे. आणि गेल्या २००० वर्षांच्या काळात या ज्ञानांची भर पडलीच असेल. सम्राट अशोकाने नेमलेल्या त्या ९ जणांना हे ज्ञान वाढवून गुप्त ठेवण्याची तर जबाबदारी होतीच, पण अशी सुद्धा जबाबदारी होती की त्यांच्या निधनानंतर त्यांचा पुढचा वारस निवडायचा आणि हे ज्ञान पुढे पुढे न्यायचं. म्हणूनच असं म्हणतात की हे लोक आजही जगात कुठेतरी आहेत. कदाचित तुम्हीही यापैकी एखाद्याला भेटला असाल, पण तुम्हाला कळलंच नसेल की तो त्या नऊ अज्ञातांपैकी एक आहे.(Illuminati)
आता या Nine Unknown Men यांची गोष्ट खरी आहे की काल्पनिक, हे कोणालाच ठाऊक नाही, पण या गोष्टींची चर्चा अनेकदा केली जाते.