Home » महिलांना ‘या’ सवयी बनवतील Emotionally Strong

महिलांना ‘या’ सवयी बनवतील Emotionally Strong

by Team Gajawaja
0 comment
Emotionally Strong
Share

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात चढ-उताराचा सामना करावा लागतो. मुलांचा अभ्यास, घरातील मंडळींची कामे हे ती सर्व उत्तमपणे सांभाळते. पण काही महिलांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना किंवा अशी काही स्थिती ज्याचा त्या ठामपणे सामना करण्यास कधीकधी डगमगतात. याउलट काही महिला अशा सुद्धा असतात आपल्यावर आलेल्या स्थितीला ठापमणे सामोरे जातात. याच महिला मानसिक आणि भावनिक स्ट्राँन्ग असल्याचे म्हटले जाते. अशातच आम्ही तुम्हाला महिलांनी अशा कोणत्या सवयी आहेत ज्या जरुर स्वत: साठी लावाव्यात जेणेकरुन त्या इमोशनली स्ट्राँन्ग (Emotionally Strong) होतील याच बद्दल सांगणार आहोत.

-लक्षात ठेवा आपले आयुष्य आपल्याच हातात
साइकोलॉजी टुडेच्या मते जर तुम्ही असा विचार करत असाल की, तुमची एखादी गोष्ट दुसऱ्याने मांडावे तर अशी अपेक्षा कधीच करु नका. आपल्या आयुष्याचे लक्ष्य काय आहे हे ठरवा. त्यानुसार काही पावले उचला आणि लक्ष्य पूर्ण करण्याकडे अधिक भर द्या. स्वत: च्या समस्या स्वत: सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण नेहमीच लक्षात ठेवा तुमचे आयुष्य हे दुसऱ्या कोणाच्या हातात नव्हे तर तुमच्याच हाती आहे. तुम्ही जसे कराल, वागाल तसेच होईल.

-इतरांशी स्वत: ची तुलना करु नका
प्रत्येक व्यक्तीची स्थिती ही वेगवेगळी असते. त्यामुळे स्वत: ला कधीच दुसऱ्यांसोबत तुलना करु नका. आयुष्यात तुम्ही किती उत्तम पद्धतीने काही गोष्टी करु शकता याचे आत्मपरिक्षण करा. तुमची आजची जी स्थिती आहे तिच स्थिती कायम राहणार नाही हे लक्षात ठेवा.

-ओवरथिंकिंग करु नका
बहुतांश महिला एखाद्या स्थितीबद्दल फार विचार करतात. अशातच ताण वाढतो. त्यामुळे ओवरथिंग करण्याच्या सवयीपासून दूर रहा. यामुळे तुम्हीच समस्यांचा सामना कराल. असे असेलच तर एखाद्याशी बोला. तुमचे मन हलके होईल. दिवसरात्र एकाच गोष्टीबद्दल विचार करणे योग्य नव्हे. यामुळे तुम्हाला तुम्ही कमजोर समजता.(Emotionally Strong)

-आत्मपरिक्षण करा
सर्वात प्रथम तुम्ही तुमचे आत्मपरिक्षण करा. जेणेकरुन तु्म्ही कोणत्या गोष्टी किती उत्तमपणे करु शकता हे तुम्हाला कळेल. तुमच्यातील ज्या उणीवा आहेत त्या कशा दूर होतील यावर ही विचार करुन कृती करा. यामुळे तुम्ही इमोशनली स्ट्राँन्ग व्हालच. पण आपल्या समोर आलेल्या संकटाला सुद्धा शांतपणे सामोरे जाऊ शकता.

-काहीतरी हटके करा
स्टीरियोटाइप विचार करण्यापेक्षा आउट ऑफ द बॉक्स विचार करत जा. महिला असालात तरीही काही गोष्टी तु्म्ही उत्तम पद्धतीने करु शकता हे लक्षात ठेवा. स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करा. जेणेकरुन तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी संधी मिळतील आणि आत्मविश्वास ही वाढेल.

हेही वाचा- प्रत्येक गोष्टीचा राग करणे तुमच्या आयुष्यासाठी ठरेल धोकादायक

पुढील गोष्टींची घ्या काळजी
-गरजेचेपेक्षा अधिक अपेक्षा करु नका
-एखाद्याची मदत मागत असाल तर तुम्ही कमजोर आहात असे समजून नका
-स्वत: वर आत्मविश्वास ठेवा आणि सेल्फ डाउट ठेवू नका
-नियम मोडल्यास घाबरु नका
-नेहमीच पुढे जा आणि मागे वळून पाहू नका
-दुसऱ्यांना दोष देणे टाळा


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.