Home » Emmanuel Macron : चक्क राष्ट्राध्यक्षांच्या कानाखाली बसते तेव्हा !

Emmanuel Macron : चक्क राष्ट्राध्यक्षांच्या कानाखाली बसते तेव्हा !

by Team Gajawaja
0 comment
Emmanuel Macron
Share

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे हनोई, व्हिएतनाम येथे आग्नेय आशिया दौऱ्यासाठी दाखल झाले. एक महत्त्वाची राजनैतिक भेट, म्हणून या दौ-याचा उल्लेख करण्यात येत होता. मात्र दौ-याची सुरुवात होण्यापूर्वीच त्याचा मुळ हेतू बाजूला होऊन या दौ-यात इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वैयक्तिक आयुष्यावरच चर्चा अधिक झाली. त्याला कारण ठरली ती एक थप्पड. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन व्हिएतनाममध्ये दाखल झाले. सुरक्षारक्षकांनी विमानाचे दरवाजे उघडले, कॅमेरे तयार होते, अशावेळी हसतमुख मॅक्रॉन दाम्पत्य पुढे येणं अपेक्षित होतं, मात्र त्याचवेळी इमॅन्युएल यांना त्यांच्या पत्नीकडून बसणारी थप्पड, अवघ्या जगासमोर आली. (Emmanuel Macron)

कॅमे-यांनी हे दृष्य टिपलं. क्षणात तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांचीही तारांबळ उडाली. अखेरीस एक महिला कर्मचारी दारात उभी राहिली. पण त्यापूर्वी फ्रान्सच्या 72 वर्षाच्या फर्स्ट लेडीनं दोन्ही हातांनी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनचा चेहरा धरला आणि त्यांना बाजूला ढकलले होते, आणि हे सर्व कॅमे-यामध्ये रेकॉर्डही झाले होते. या घटनेनंतर मॅक्रॉनही गडबडले होते. आपल्या बायकोनं आपल्याला मारलेलं कॅमे-यांनी रेकॉर्ड केलं आहे, हे कळल्यावर त्यांच्या चेह-यावरचं हसूच गायब झालं. त्यानंतर स्वतःला सावरणारे आणि कॅमे-यासमोर नजर चुकवणारे मॅक्रॉनही अवघ्या जगानं पाहिले. या प्रकरणानंतर ब्रिजिट आणि इमॅन्युएल यांच्यातील अप्रत्यक्ष तणाव पुढेही जाणवत होता. या दोघांनीही एकमेकांचे हात पकडणेही टाळले. या घटनेचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, फ्रान्स सरकारला त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यात हा फक्त विनोद होता, भांडण नाही, असे सांगण्यात आले. (International News)

मात्र या सर्वानंतर व्हायचा तोच परिणाम झाला आहे. आधीच इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिजिट यांच्या लग्नावर अनेक विनोद होत आहेत. अशा परिस्थितीत आलेला हा व्हिडिओ या विनोदामध्ये भर टाकून गेला आहे. या सर्वांनंतर इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या 72 वर्षीय पत्नी, ब्रिजिट मॅक्रॉन चर्चेत आल्या आहेत. वर्गशिक्षिका असेल्या ब्रिजिटच्या प्रेमात इमॅन्युएल कसे पडले, आणि चक्क 24 वर्षांनी मोठ्या असलेल्या ब्रिजिट, मिसेस मॅक्रॉन कशा झाल्या, याची चर्चा सुरु झाली आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिजिट यांची प्रेमकहाणी ही ब-याचवेळा फ्रान्समध्ये विनोदाचा विषय ठरते. कारण या दोघांमधील वयाचे अंतर आणि त्यांचे लग्नापूर्वीचे नाते. 1993 मध्ये, ब्रिजिट या 39 वर्षाच्या असतांना त्यांची आणि 15 वर्षाच्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांची ला प्रोव्हिडन्स हायस्कूलमध्ये भेट झाली. (Emmanuel Macron)

फ्रान्समधील ही शाळा उच्चभ्रूंची शाळा म्हणून ओळखली जाते. तिथे ब्रिजिट या फ्रेंच साहित्य आणि नाट्यशिक्षिका होत्या. याच शाळेत ब्रिजिटची मोठी मुलगी शिकत होती. ती आणि इमॅन्युएल हे दोघंही मित्र होते. तेव्हा हे दोघंही एकमेकांना डेट करत आहेत, अशाही चर्चा होत्या. पण इमॅन्युएलला आपल्या मैत्रिणीची आईच जास्त आवडली. त्यासाठी त्यांनी नाट्यशिक्षणाचा वर्गही लावला. या ब्रिजिटचा जन्म 13 एप्रिल 1953 रोजी अमिन, फ्रान्स येथे झाला आहे. ती एका चॉकलेट आणि पेस्ट्री व्यवसायिक कुटुंबातून आली आहे. तिच्या कुटुंबाची “ट्रोग्नेक्स” नावाची एक प्रसिद्ध चॉकलेट कंपनी आहे. इमॅन्युएलशी भेट होण्यापूर्वी तिचा विवाह व्यवसायानं बॅकर असलेल्या आंद्रे यांच्याबरोबर झाला होता. या दोघांनाही तिन मुलं होती. (International News)

ही तिन्ही मुलं इमॅन्युएल यांच्या बरोबरच शिकत होती. इमॅन्युएल यांनी एकदिवस ब्रिजिटला थेट लग्नाची मागणी घातली. पण ब्रिजिटनं त्याला नकार दिला. त्यानंतरही इमॅन्युएल आपल्या प्रेमावर ठाम राहिला. त्याच्या प्रेमाची कहाणी त्याच्या कुटुंबात समजली तेव्हा भूकंप झाला. त्याला थेट लंडनमध्ये पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले. पण तिथूनही इमॅन्यूएल ब्रिजिटला पत्र पाठवत असे. नंतर ब्रिजिटही त्याच्या प्रेमात पडली. दोघंही लग्नापूर्वी 10 वर्ष लिव-इन रिलेशनशिप मध्ये होते. इमॅन्युएलचे शिक्षण संपल्यावर आणि आर्थिकदृष्ट्या तो स्वतंत्र झाल्यावर ब्रिजिटनं 2006 मध्ये आंद्रे याला घटस्फोट दिला. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2007 मध्ये इमॅन्युएल आणि ब्रिजिट यांचा विवाह झाला. त्यावेळी इमॅन्युएल 29 वर्षांचे होते आणि ब्रिजिट 54 वर्षांची होती. या दोघांच्या वयातील अंतर हा कायम त्यांच्या विवाहावर होणारा टिकेचा आणि थट्टेचा विषय झाला. (Emmanuel Macron)

2017 मध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष झाले आणि ब्रिजिट मॅक्रॉन फ्रान्सच्या पहिल्या पत्नी बनल्या. या निवडणुकीत ब्रिजिटने मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे फ्रान्सच्या राज्यघटनेत नसलेले फर्स्ट लेडीचे पद इमॅन्युएलने ब्रिजिटसाठी खास सादर केले. या विवाहावर कायम टिका होत राहिली. अर्थात ब्रिजिटच्या तीन मुलांना इमॅन्युएलनं आपल्या मुलांसारखेच स्विकारले. त्यांच्यात आणि इमॅन्युएलच्या वयात फार अंतर नसले तरी आता त्यांची ओळख ही इमॅन्युएलची मुले अशीच झाली आहे. (International News)

=================

हे देखील वाचा : Jawaharlal Nehru Tribal Wife : ‘ती’ आदिवासी नेहरूंची पत्नी होती ?

Apple Cider Vinegar Disadvantages : अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करताय? या गोष्टीही ठेवा लक्षात

=================

आता या मुलांसोबत आणि नातवंडांसोबत हे मॅक्रॉन दांम्पत्य रहात आहे. या दोघांच्या लग्नावर अव्होइर डिक्स-सप्टेंबर अँस नावाचे पुस्तकही लिहिले गेले. त्यात ब्रिजिटच्या पहिल्या पतीला या लग्नामुळे किती धक्का बसला आणि तो कसा अज्ञातवासात गेला आहे, हे सांगितले आहे. यापूर्वी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष झेवियर बोल्सोनारो यांनी सोशल मिडियावरुन ब्रिजिटची खिल्ली उडवली होती. यावर बराच वाद झाला होता, आणि विनोदही झाले होते. तेव्हा इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पुढे येत आपल्या पत्नीचा मान ठेवा, अशी विनंती केली होती. मात्र यावेळी त्याच इमॅन्युएलला पत्नीकडून थप्पड मिळतांना अवघ्या जगानं बघितलं आहे. ते स्वतः या घटनेचा उल्लेख, आमच्यातील सहज नाते, असा करुन देत असले तरी मॅक्रॉन पती-पत्नीमधील वाद अवघ्या जगासमोर आला आहे. (Emmanuel Macron)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.