Home » तालिबानच्या हाती पन्नाच्या खाणी

तालिबानच्या हाती पन्नाच्या खाणी

by Team Gajawaja
0 comment
Panjshir Panna
Share

अफगाणिस्तानवर २०२१ मध्ये तालिबाननं ताबा मिळवला. अमेरिकेच्या सैन्यानं अफगाणिस्तानमधून आपले बाडबिस्तार आवरले. ऑगस्ट २०२१ या महिन्यात संपूर्ण जगात बहुधा अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य कसे प्रस्थापित झाले, याचेच चित्रण बघण्यात आले. सुरुवातील काही दिवस तालिबानी शासकांनी केलेल्या अत्याचाराच्या बातम्या येत होत्या.

जगातील अत्यंत कमी देशांनी तालिबानला मान्यता दिली आहे. त्यामुळे तालिबनाचे आर्थिक नियोजन कसे चालते, हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून याचे उत्तर मिळाले आहे. अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यातील पन्नाच्या खाणी तालिबानसाठी खजिन्यासारख्या ठरल्या आहेत. पंजशीर खो-यातील पन्ना हा जगातील सर्वोत्तम पन्ना मानला जातो. जगातील सर्वोत्तम चमकदार पन्ना म्हणून पंजशीर पन्नाची ओळख आहे. याच पंजशीर पन्नामुळे तालिबान सरकारही मालामाल झाले आहे. (Panjshir Panna)

अफगाणिस्तानच्या काबूलपासून १५० किमी अंतरावर असलेल्या खोऱ्यातून एक नदी वाहते. तिला पंजशीर नदी म्हणतात. याच नदीवरुन या खो-याला पंजशीर खोरे असे नाव पडले आहे. पंजशीरला ‘पंजशेर’, म्हणजे ‘पाच सिंहांची दरी’ असेही म्हणतात. हिंदुकुशच्या दोन खिंडीत प्रवेश देणारा पंजशीर हा एक प्रमुख महामार्ग आहे. या खोऱ्यात पन्ना खाणीचे मोठे केंद्र तयार झाले आहे. अफगाणिस्तानमधील सर्वात सुंदर खोरे म्हणून पंजशीर खो-याचे नाव घेतले जाते. या खो-यात मुलभूत सुविधांचा अभाव होता. (Panjshir Panna)

मात्र अमेरिकेचे सैनिक अफगाणिस्तानमध्ये आले, आणि ते या खो-याच्या प्रेमात पडले. त्यांनी या खो-याला विकसित केले आहे. या भागात रस्ते केले तसेच विजेची व्यवस्था केली. असे असले तरी पंजशीरमधील नागरिकांनी अमेरिकन वर्चस्व आणि त्यांच्या सुविधा लगेच स्विकारल्या नाहीत. पंजशीर खो-याला स्वतंत्र खोरे म्हणून आपले अस्तित्व हवे आहे. त्यासाठी त्यांनी सुरुवातील रशिया आणि अमेरिकेलाही विरोध केला. तालिबाननेही संपूर् अफगाणिस्तानवर विजय मिळवला तरी त्यांना या खो-यावर विजय मिळण्यासाठी मोठी संघर्ष करावा लागला. आता याच खो-यातून तालिबान खो-यानं पैसे कमवत आहे.

पंजशीरच्या पन्नाला जगात मोठी मागणी आहे. पंजशीर पन्ना जगातील सर्वोत्तम रत्नांमध्ये समाविष्ट आहे. सध्या जगभरानं तालिबानवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तालिबान अफगाणिस्तानवरील सरकार कसे चालवते हा प्रश्न विचारला जातो. तालिबानच्या उत्पन्नाचा स्रोत याच पंजशीर खो-यानं दिला आहे. १९९६ मध्ये, तालिबानने अफगाणिस्तानमध्ये तत्कालीन अध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी यांना सत्तेवरून हटवून काबूलवर कब्जा केला होता. (Panjshir Panna)

त्या वेळीही लादेनच्या नेतृत्वाखालील अल-कायदाला या पन्नाच्या खाणींमधून दरवर्षी ४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळत होते. सध्याच्या तालिबान सरकारला या खाणींमधून दरमहा सुमारे १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळत आहेत. यात अधिक वाढ होण्याची शक्यताही आहे. कारण तालिबननं या पन्नाच्या खाणीसाठी आता आधुनिक सामुग्री घेतली असून त्याद्वारे पन्ना काढण्याच्या कामाला वेग येणार आहे.
तालिबान सरकार पंजशीर खो-यात अनेक पन्नाच्या खाणी चालवतात. या खाणीतून निघणा-या पन्नाशाठी तालीबान सरकारनं स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे.

===============

हे देखील वाचा१३०० वर्षे जुनी तलवार !

===============

अफगाणिस्तानच्या पन्नाच्या खाणी काबुलच्या उत्तर-पूर्वेस ११५ किमी अंतरावर आहेत. पंजशीर नदीच्या पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशात ७००० ते १४००० पर्यंत या खाणी पसरल्या आहेत. पंजशीरमध्ये आढळणाऱ्या पाचूचा रंग वेगळा हिरवा आणि निळा आहे. पंजशीर पन्ना हा आंतरराष्ट्रीय रत्न बाजारात सर्वाधिक पसंतीचा पन्ना मानला जातो. गडद हिरवा रंग आणि चमकमुळे, त्याची किंमत खूप जास्त आहे. खेंज, मिकेनी, बुटक, बुजमल, बाखी आणि बरुण या खाणीमधून हा पन्ना मोठ्या प्रमाणात निघतो. एकेकाळी याच पंजशीर खो-यातून तालीबानला सर्वाधिक विरोध झाला होता. (Panjshir Panna)

तालीबान सरकारविरुद्ध येथे एक आघाडीही स्थापन झाली होती. मात्र तालिबाननं पंजशीर खो-याचा विरोध मोडून विजय मिळवला. आता त्याच खो-यातील पन्नावर तालिबानची आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे. पण या भागातील नागरिकांचा तालिबानला असलेला विरोध कायम आहे. त्यांच्यामते तालिबान ज्या पद्धतीनं पन्नाची लूट करीत आहे, त्यानुसार या खाणी काही वर्षातच खाली होणार आहेत. त्याचा इथल्या निसर्गावर परिणार होणार आहे. अर्थात या विरोधाकडे डोळेझाक करत तालिबान पंजशीरमधील खाणींमध्ये चोवीस तास पन्ना शोधण्याचे काम करीत आहे. (Panjshir Panna)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.