एलॉन मस्क एक यशस्वी व्यावसायिक रुपात जगभरात प्रसिद्ध आहेत. ते जे काही करतात त्यामध्ये त्यांना एकतर नफा होतो अथवा तोटा. असे सांगितले जाते की, अरबपति होण्यापूर्वी त्यांच्याकडे काहीच संपत्ती नव्हती. केवळ त्यांचा शार्प मेंदू आणि लक्ष्य होते. नुकत्याच त्यांनी सक्सेसफुल फेलियरचा मंत्रा सांगितला आहे. त्यांच्या स्पेस एक्स कंपनीचे स्टारशिप सुपर हैवीच्या परिक्षणाच्या अपयशानंतर त्यांनी आपल्या टीमला शुभेच्छा देत म्हटले होते की, आपण खुप काही शिकलो आहोत. तेव्हापासूनच ते फार चर्चेत आहेत. जाणून घेऊयात एलॉन मस्क यांच्या सक्सेसफुल फेलियरचा मंत्रा काय आहे. (Elon Musk)
जेव्हा मस्क यांनी आपल्या जुन्या अंदाजात एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी त्यांच्या स्पेस एक्सच्या परिक्षणाच्या अपयशातून खुप काही शिकायला मिळाले असे लिहिले होते. तो पर्यंत काही तज्ञांनी असे म्हटले होते की, वास्तवात हे एक उत्तम परिक्षण म्हणून समोर येईल आणि यामुळे यानाच्या विकासाला गती मिळेल.
स्वत: स्पेस एक्सने मानले आहे की, सुपर हैवीच्या २२ शक्तिशाली रॅप्टर इंजिनमध्ये वरती जाताना खुप बिघाड झाला. त्याचसोबत स्पेस एक्सने असे ही म्हटले की, बूस्टर रॉकेट आणि स्टारशिप डिझाइनरुप वेगळे होण्यास अपयशी ठरले. परंतु मस्क यांनी यावर आनंद व्यक्त केला होता.
येथे मस्क यांचा एक यशस्वी व्यावसायिकाचा गुण दिसतो, तो म्हणजे आपल्या अपयशातून ते शिकतात. अशा माणसांना अचूक माहिती असते की, अपयशानंतर यश हे आपलेच असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमीत कमी दोन एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या तज्ञांनी रायटर्स सोबत बोलताना असे मान्य केले होते की, हे परिक्षण काही प्रकारे खरंच फायदेशीर होते. (Elon Musk)
तर नासाचे माजी अंतराळवीर, स्पेस एक्सचे वरिष्ठ सल्लागार आणि युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्नियाचे एस्ट्रोनॉटिकल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर गॅरेड रेइसमॅन यांनी असे म्हटले, हे स्पेसएक्सचे शास्रीय यशस्वी अपयश आहे. त्यांनी असे ही म्हटले की, रॉकेटसाठी अधिक खर्च असल्याने दीर्घकाळासाठी यामधून स्पेसएक्सच्या बहुतांश गोष्टीची बचत होईल.
हे देखील वाचा- ISRO कडून सिंगापुरच्या दोन सॅलेटाइटचे प्रक्षेपण, वातावरणाची देणार माहिती
एलन मस्क यांचे काही विचार जे सुरुवातीला केवळ स्वप्नच होते ते आता सत्यात उतरले आहेत. काही लोकंनी त्यांना एक सीरियल व्यावसायिकच्या रुपात पाहिले आहे. त्याचसोबत ते प्रत्येक वेळी एक नवा विचार घेऊन येतात. तर मस्क यांची इलेक्ट्रिक कार टेस्ला, अंतराळ तंत्रज्ञान मध्ये स्पेसएक्, उर्जा क्षेत्रात सोलर सिटी सारख्या काही क्षेत्रात मस्क यांनी क्रांती घडवण्याचे काम केले आहे.