Home » मुक्काम पोस्ट मंगळ !

मुक्काम पोस्ट मंगळ !

by Team Gajawaja
0 comment
Elon Musk On Mars
Share

टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांच्या कंपनीचा नवा पत्ता लवकरच येणार आहे. हा पत्ता म्हणजे, मुक्काम पोस्ट मंगळ. अर्थातच इलॉन मस्क मंगळ ग्रहावर स्वारी करण्याच्या तयारीत आहेत. फक्त स्वारीच नाही तर मंगळावर वस्ती निर्माण करण्याचा पूर्ण प्लॅन इलॉन मस्क यांनी तयार केला आहे. पुढच्या वीस वर्षात इलॉन मस्क हे त्यांच्या या स्वप्नवत वाटणा-या योजनेवरे काम करणार आहेत. त्याची सुरुवात आता त्यांनी सुरु केली असून मस्क मंगळावर स्टारशिप मिशन पुढील दोन वर्षांत प्रक्षेपित करणार आहेत. स्पेसएक्सचे स्टारशिप हे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट मानले जाते. मानवाला चंद्रावर आणि नंतर मंगळावर पाठवण्यासाठी या रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे. (Elon Musk On Mars)

यासंदर्भात इलॉन मस्क यांनी सोशल मिडियावर घोषणा केली आहे. शिवाय कामय एकाच ग्रहावर अवलंबून रहाता येणार नाही. मानवाला आता स्वतःच्या अस्तित्वासाठी दुस-या ग्रहावरही जावे लागणार आहे. असी टिपण्णीही त्यांनी केली आहे. मस्क यांच्या या मंगळग्रहावरील स्वारीसाठी स्टारशिप मंगळावर कसे उतरेल याची चाचणी घेण्यात येणार आहे. हे स्टारशिपचे लँडिंग व्यवस्थित झाले, तर पुढील चार वर्षात मंगळावर प्रथम मानवाला पाठवण्याची योजनाही इलॉन मस्क यांनी केली आहे. (Elon Musk On Mars)

अब्जाधीस इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स येत्या 2 वर्षांत जगातील सर्वात शक्तिशाली स्टारशिप रॉकेट मंगळावर पाठवणार आहे. यातून मंगळावर स्टारशिपच्या लँडिंगची चाचणी करण्यात येईल. या प्रवासात एकही माणूस उपस्थित राहणार नाही. हा चाचणी यशस्वी झाली तर याच माध्यमातून मानवी वस्ती मंगळावर उभाण्याचे स्वप्न इलॉन मस्क बघत आहे. फक्त वस्तीच नाही तर मंगळावर या माध्यमातून मोठे शहर स्थापन करण्याच्या विचारात मस्क आहे. त्याच्या या मानवी मोहीमेसाठी अब्जो रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून मस्क यासाठी तयारी करीत आहे. तसेच मंगळावर जाण्यासाठी उत्सुक असलेल्या अन्य कंपन्यांनाही त्यांनी आवाहन केले आहे. (Elon Musk On Mars)

आधीच इलॉन मस्कची स्पेसएक्स ही कंपनी चंद्रावर जाण्यासाठी काम करत आहे. चंद्रावरही मस्कला मानवी वस्ती तयार करायची आहे. त्यापाठोपाठ मस्क आता मंगळ ग्रहावरही जाण्याचा रस्ता तयार करीत आहे. यासाठी स्पेसएक्सचे सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिप पाठवण्यात येणार आहे. स्टारशिप मंगळावर लॅंड झाल्यावर पुढच्या चार वर्षात मंगळस्वारीची योजना कार्यान्वयीत करण्यात येणार आहे. मस्क यांच्या सांगण्यानुसार या सर्व मोहिमा यशस्वी झाल्या तर पुढील 20 वर्षांत मंगळावर एक शहर उभारण्यात यश येणार आहे. इलॉन मस्क यांचा अन्य ग्रहावरील जीवसृष्टीवर विश्वास आहे. त्यांच्यामते अन्य ग्रहांवर जीवसृष्टी आहे. ती शोधण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. त्यामुळे स्टारशिपमधून पुढील 4 वर्षांत मंगळावर संशोधकांना पाठवण्याचा मस्कची योजना आहे. त्यातून मंगळावरील वास्तव्याचा मानवाचा एक मार्ग खुला करण्यात येणार आहे. मस्क यांच्या मते पृथ्वीवासी जावनासाठी फक्त एकाच ग्रहांवर अवलंबून आहेत. भविष्यात पृथ्वीवरील जीवसृष्टीस धोका निर्माण झाल्यास मानवी जीवनही संपूष्टात येईल. पण तिथेच अन्य ग्रह शोधला तर जीवन चालू राहण्याची शक्यता अधिक आहे. (Elon Musk On Mars)

मस्क यांनी स्पेसएक्सच्या कर्मचाऱ्यांना मंगळावर शहर स्थापन करण्याच्या योजनेवर काम करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मंगळावर रहाण्यासाठी इलॉन मस्क लहान घुमटाकार घरे तयार करत आहेत. स्पेसएक्सची आणखी एक टीम मंगळाच्या प्रतिकूल वातावरणाला तोंड देण्यासाठी स्पेससूट बनवण्याचं काम करत आहे. मंगळावर मानवाला मुले होऊ शकतात का, यावर मस्क यांचे वैद्यकीय पथक स्वतंत्ररित्या संशोधन करत आहे. मंगळावर मानवी वस्ती स्थापन करणे हे सहजसाध्य नाही. त्यासाठी 40 ते 100 वर्षे लागू शकतात. पण ही योजना सुरु झाल्यापासून पुढील 20 वर्षात मंगळावर शहर बसवण्यात येईल. यातून मंगळावर सुमारे 1 दशलक्ष लोकांना स्थायिक करण्याचे मस्कचे लक्ष्य आहे. (Elon Musk On Mars)

==============

हे देखील वाचा : आणखी एक मोठा हिरा !

===============

यासाठी स्पेसएक्सने पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट बनवले आहे, जे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाण्याचा खर्च कमी करेल. आत्तापर्यंत कोणत्याही ग्रहावर जाणे खूप महाग होते, पण मस्क हा प्रवास शक्यतो तेवढ्या कमी दरात उपलब्ध करुन देणार आहेत. मंगळावर वस्तीचे स्वप्न ज्या स्टारशिप मार्फत साकार होणार आहे ते, स्पेसक्राफ्ट आणि सुपर हेवी बूस्टर यांना एकत्रितपणे ‘स्टारशिप’ म्हणतात. या वाहनाची उंची 397 फूट आहे. हे पूर्णपणे पुन्हा वापरण्यायोग्य आणि 150 मेट्रिक टन भार वाहून नेण्यास सक्षम आहे. ही सगळी मोहीस सुरळीत झाली तर स्टारशिप सिस्टीम एकाच वेळी 100 लोकांना मंगळावर घेऊन जावू शकते. (Elon Musk On Mars)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.