Home » एलन मस्क यांनी आपल्या आत्महत्येबद्दल का सांगितले, ‘हे’ आहे मोठे कारण

एलन मस्क यांनी आपल्या आत्महत्येबद्दल का सांगितले, ‘हे’ आहे मोठे कारण

by Team Gajawaja
0 comment
Elon Musk
Share

ट्विटरचे नाव मालक एलॉन मस्क हे आपल्या विधानांमुळे नेहमीच वादात राहतात. अशातच आता एका लाइव्ह प्रश्न-उत्तराच्या सेशनदरम्यान, जेव्हा एलॉन मस्क यांची मानसिक स्थिती आणि सुरक्षिततेसंदर्भात प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्यांनी आपल्या श्रोत्यांना माझ्या मनात आत्महत्येबद्दल कोणाताही विचार नाही आहे. याचा अर्थ असा की, एलॉन मस्क यांनी आपल्या समर्थकांना आश्वासन दिले आहे की, सध्या त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम आहे. (Elon Musk)

एलॉन मस्क यांना एका व्यक्तीने विचारला हा प्रश्न
या प्रश्न-उत्तराच्या १ लाखांहून अधिक लोक ऐकत होते आणि या सेशन दरम्यान, एलॉन मस्क यांना काही प्रश्न विचारण्यात आले. एका व्यक्तीने मस्क यांना असे विचारले की, ते खरंच आत्महत्या करणार आहेत? बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देत असे म्हटले की, नाही. माझ्या मनात आत्महत्येसारखा कोणताही विचार नाही. जर मी आत्महत्या केली असेल तर हे वास्तविक नसेल. ट्विटरनुसार, ट्विटर स्पेस इंटरव्यूच्या दरम्यान १.८ मिलियनहून अधिक लोक सहभागी झाले होते.

Elon Musk
Elon Musk

ऐवढेच नव्हे तर एलॉन मस्क यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे संकेत दिले होते. त्यांनी असे म्हटले की, जीव धोक्यात आहे. त्यामुळे खुल्या कारमध्ये फिरु शकत नाहीत. पहिल्यांदा असे झाले नाही की, जेव्हा मस्क यांनी आपल्या संभाव्य रहस्यमयी मृत्यू संदर्भात कोणतेही संकेत दिलेले नाहीत. यापूर्वी मे मध्ये ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांनी ट्विट करत असे लिहिले होते की, जर माझ्या संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाल्यास तर तो Nice Knowin Ya असेल. (Elon Musk)

हे देखील वाचा- ‘जॅक मा’ जपानमध्ये राहत असल्याचे उघड?

तर एलॉन मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या मुलासंदर्भात काही खुलासे केले. ट्विटर फाइल्स नावाने करण्यात आलेल्या या खुलास्यामध्ये मस्कने या गोष्टीचा उल्लेख केला आहे की, २०२० मध्ये Hunter Biden संबंधित बातम्या सेंसर केल्या होत्या. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता की, न्यूयॉर्क पोस्टच्या या बातमीला दाबण्यात आले होते.

तर एलॉन मस्क यांनी ट्विटरची सुत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही अधिकाऱ्यांना सुद्धा काढून टाकले होते. त्याचसोबत ट्विटरला ब्लू टीकसाठी पैसे द्यावे लागतील या गोष्टीवरुन सुद्धा अधिक चर्चा झाली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.