टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्यामुळे अमेरिकन राजकारणात खळबळ उडाली आहे. 4 जुलै या अमेरिकेच्या स्वातंत्रदिनी मस्क यांनी अमेरिकन पार्टी या आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. अमेरिकन नागरिकांना त्यांचे स्वातंत्र्य परत मिळवून देण्यासाठी या पक्षाची स्थापना करत असल्याचे मस्क यांनी सांगितले. वास्तविक पक्के मित्र असलेले डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क या दोघांमध्ये वन बिग ब्युटीफुल बिलमुळे तणाव वाढला आहे. त्यातूनच द अमेरिकन पार्टी या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा मस्क यांनी केली आहे. (Elon Musk)
हा पक्ष काढण्याच्या घोषणेपूर्वी मस्क यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडियावर एक सर्वेक्षण केलं होतं. त्यात 65 टक्के अमेरिकन नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला. मस्क यांच्या या नव्या पक्षामुळे डेमोक्रॅटिक पक्ष की रिपब्लिकन पक्षाला फायदा होईल, की नुकसान याची चर्चा सुरु झाली आहे. द अमेरिकन पार्टी या मस्क यांच्या पक्षाचा अमेरिकेचा तिसरा पक्ष म्हणून उल्लेख होत असला तरी अमेरिकेतील तिसरा सर्वात प्रमुख पक्ष द लिबर्टेरियन्स हा आहे. परंतु या पक्षाचे अमेरिकन संसदेत प्रतिनिधी नाहीत. कारण अमेरिकेत पक्ष काढल्यावर त्याच्यासाठी फंड गोळा करणे आणि त्याची मान्यता मिळवण्यासाठी नोंदणीकृत मतदारांकडून पुरेशा संख्येने स्वाक्षऱ्या मिळवाव्या लागतात. ही सर्वच प्रक्रिया खूपच किचकट आणि महागडी आहेत. आता यातून मस्क कसा मार्ग काढतात यावरच त्यांच्या द अमेरिकन पार्टी या पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. (International News)
अमेरिकन लोकशाहीत दबदबा राहिलेल्या डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाला आव्हान म्हणून टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी द अमेरिका पार्टी नावाचा एक नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे. 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत एलोन मस्क यांनी राजकीय प्रवाहात प्रवेश केला होता. मात्र आता ते स्वतः थेट अमेरिकेच्या राजकारणात उतरले आहेत. ट्रम्प अध्यक्षीय निवडणूक लढवत असतांना मस्क यांनी रिपब्लिकन पक्षाला सुमारे $2.7 अब्ज देणगी दिली होती, त्यामुळे ट्रम्प यांचा विजय अधिक सुकर झाला होता. आता त्याच ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटिफुल बिलाविरोधात मस्क यांनी आघाडी उभारली आहे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत, जेव्हा देशाला उद्ध्वस्त करणारी अनावश्यक आणि महागडी धोरणं तयार होतात, तेव्हा देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण होतो. सद्यपरिस्थितीत अमेरिकेतील लोकांकडे कोणताही राजकीय पर्याय नाही, अशांसाठी द अमेरिकन पार्टी हा आशादायक ठरणार आहे, असे स्पष्ट केले आहे. या घोषणेआधी मस्क यांनी 4 जुलै या अमेरिकेच्या स्वातंत्रदिनी एक सर्वेक्षण केले. त्यात 65 टक्के नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. (Elon Musk)
अर्थात मस्क यांनी द अमेरिकन पार्टी या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली तरी या पक्षात कोण येणार आहे, किंवा पक्षाची ध्येयधोरणे काय असतील, याबाबत कुठलाही खुलासा केलेला नाही. मात्र आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी हा पक्ष किती प्रभावी ठरणार याकडे अमेरिकेतील मतदारांचे लक्ष लागले आहे. 2026 च्या मध्यावधी निवडणुकीमध्ये द अमेरिकन पार्टीचा कसा प्रभाव आहे, याची एक परीक्षाच होणार आहे. अमेरिकेत, सिनेटच्या एक तृतीयांश आणि प्रतिनिधी सभागृहाच्या एक तृतीयांश जागांसाठी दर दोन वर्षांनी निवडणुका होतात. यात रिपब्लिकन पक्षाला मोठे नुकसान झाले तर ते अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमत गमावणार असून यामुळे ट्रम्प यांना निर्णय घेणे कठिण होणार आहे. वास्तवित अमेरिकेत दोन पक्षांशिवाय अन्य पक्षही आहेत. मात्र अमेरिकेतील निवडणूक प्रक्रिया किटकट असल्यामुळे या पक्षाला एकदाही प्रतिनिधीत्व मिळवता आलेले नाही. द लिबर्टेरियन्स हा अमेरिकेतील तिसरा पक्ष फार कमी मतदारांपर्यंत पोहचला आहे. (International News)
1787 मध्ये अमेरिका स्वतंत्र झाली तेव्हा डेमोक्रॅटिक आणि व्हिग पक्ष, हे दोन पक्ष अस्तित्वात होते. यानंतर रिपब्लिकन पक्ष तिसऱ्या पक्षाच्या रूपात निवडणुकीच्या रिंगणात आला. गुलामगिरी समर्थक व्हिग पक्ष, यामुळे मागे पडला. 1850 पासून, अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट हे दोनच पक्ष सत्तास्थानी राहिले. यानंतरही अमेरिकेत ग्रीन पार्टीसारखे अनेक पक्ष पण ते या दोन्ही पक्षांना आव्हान देऊ शकले नाहीत. त्यामुळेच आता एलोन मस्क द अमेरिकन पार्टीसाठी कशाप्रकारे ध्येयधोरणे आखणार आहेत, यातून या पक्षाची लोकप्रियता ठरणार आहे. मस्क यांनी 2028 च्या अध्यक्षीय निवडणुकीत आपला पक्षही उतरणार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळेच मस्क यांच्या पुढच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेत द्विपक्षीय पद्धती अधिक दृढ झाली आहे. येथे राष्ट्रीय स्तरावरील निवडणुका लढवण्यासाठी, कोणत्याही नवीन पक्षाला संघीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी लागते. (Elon Musk)
तशी नोंदणी मस्क यांच्या पक्षानं अद्याप केलेली नाही. शिवाय निवडणुकी दरम्यान, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांची नावे सार्वत्रिक निवडणुकीच्या मतपत्रिकेवर आपोआप समाविष्ट होतात. तर अन्य लहान पक्षांना त्यांच्या उमेदवाराची नावे मतपत्रिकेवर टाकण्यासाठी नोंदणीकृत मतदारांकडून पुरेशा संख्येने स्वाक्षऱ्या मिळवाव्या लागतात. सर्व प्रक्रिया खूपच खर्चिक आहे. त्यामुळे लहान पक्षांना हा खर्च परवडत नाही. कारण अमेरिकेत डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या उमेदवारांना सार्वत्रिक निवडणुकीसाठी संपूर्ण संघीय निधी मिळतो. परंतु अन्य लहान पक्षाच्या उमेदवाराला मागील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत जेवढी मते मिळाली असतील, तेवढी ही मदत मिळते. निवडणूक लढवणाऱ्या नवीन पक्षाला जर राष्ट्रीय मतांच्या किमान 5 टक्के मते मिळाली तर निवडणुकीनंतर संघीय निधी मिळण्याचा अधिकार असतो. त्यामुळे अमेरिकेतील लहान पक्ष या निवडणुकीपासून दूर रहातात. (International News)
=============
हे ही वाचा : Mamdani VS Trump : ममदानीविरोधात ट्रम्पनी थोपटले दंड !
Raja Charles : राजघराण्याच्या परंपरेसाठी जनतेचा खिसा खाली !
=============
द अमेरिकन पार्टीमुळे मस्क यांनी खळबळ उडवून दिली असली तरी ते अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत भाग घेऊ शकत नाहीत. कारण अमेरिकेच्या संविधानानुसार, ज्यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे तेच लोक राष्ट्रपती होऊ शकतात. एलोन मस्कचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आहे. पण या पक्षात जे सामिल होतील, त्यांना या निवडणुकीत उतरता येणार आहे. यात पहिला नंबर लागतोय तो ट्रम्पच्या ‘बिग ब्युटीफुल बिल’च्या विरोधात मतदान करणारे अमेरिकन काँग्रेस सदस्य थॉमस मॅसी यांचा. शिवाय फॉरवर्ड पार्टीचे सह-संस्थापक अँड्र्यू यांग यांनीही मस्कसोबत येण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टकर कार्लसन, मार्जोरी टेलर ग्रीन हे लोकप्रिय नेतेही या द अमेरिकन पार्टीमध्ये सामिल होण्याची शक्यता आहे. अर्थात मस्क आपल्या पक्षाची ध्येयधोरणे कशी तयार करतात, यावरच 2028 च्या निवडणुकीची सगळी गणितं ठरणार आहेत, आणि मस्क यांच्या पक्षाचे भविष्यही. (Elon Musk)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics