टेस्लाचे सीईओ आणि अब्जाधीस एलॉन मस्क यांनी आपल्या मुलाचे नाव X AE A-XII असे ठेवले. या नावामुळे एलॉन मस्कची जगभरात अक्षरशः टिंगल करण्यात आली. एलॉन मस्क यांच्या एक्सचा जन्म 4 मे 2020 रोजी झाला. त्याच्या आईचे नाव ग्रिम्स आहे. हा एक्स आता पाच वर्षाचा होणार आहे. पण त्याच्या नावावरुन होणारी टिंगल आता थांबली असून एक्स हा जगातील सर्वात लोकप्रिय लहान मुलांपैकी आणि अब्जाधीश मुलांपैकी एक झाला आहे. एलॉन मस्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू सहकारी आहेत. ट्रम्प सरकारमध्ये मस्क यांच्यावर सरकारी कार्यक्षमता विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता या मस्क सोबत पाच वर्षाचा एक्सही व्हाईट हाऊसमध्ये मुक्तपणे फिरत असतो. मस्क यांच्या खांद्यावर बसलेल्या एक्सचे फोटो सर्वाधिक व्हायरल होतात, आणि त्यांना करोडो लाईकही मिळत आहे. (Elon Musk)
ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले तेव्हाही झालेल्या आनंदोत्सवात मस्क आपल्या या लाडक्या एक्सला खांद्यावर बसवून सामिल झाले होते. राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रिय ओव्हल ऑफीसमधील पत्रकार परिषदेतही मस्क एक्सला खांद्यावर घेऊन आले होते. तेव्हाही ओव्हल ऑफीसमधील एक्सचे फोटो सर्वाधिक व्हायरल झाले. आता या एक्सनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आहे. अमेरिकेच्या दौ-यावर असतांना पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी मस्क, पत्नी आणि मुलांसह आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एक्सला पुस्तकांची भेट दिली. पुस्तकं पाहून आनंदित झालेल्या एक्सनं मोदींच्या हातातून ती जवळपास ओढून आपल्या ताब्यात घेतली. एक्सचे हे फोटो आता सर्वत्र व्हायरल होत आहेत. येत्या मे महिन्यात पाच वर्षाचा होणारा एक्स हा सर्वाधिक हुशार मुलगा असल्याचा दावा एलॉन मस्क करतात. मस्क यांच्या अनेक उद्योगांची नावंही या एक्सवरुन आहेत. मस्क यांचा हा सर्वात हुशार मुलगा कसा आहे, हे बघुया. (International News)
एलोन मस्क आणि त्याची माजी प्रेयसी आणि गायिका ग्रिम्स यांना 4 मे 2020 रोजी एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव मस्क यांनी X AE A-XII ठेवले. एक्स हा मस्क यांचा दहावा मुलगा आहे. याशिवाय 2021 मध्ये मस्क यांना एक मुलगीही झाली. या अकराव्या मुलीचे नाव त्यांनी AXA डार्क साइडरल मस्क ठेवले आहे. मस्क यांच्या या एक्स नावाची खूपच चर्चा झाली. मात्र मस्क यांना एक्स हे अक्षर खूप आवडते. कारण त्यावरुनच त्यांच्या अनेक उद्योगाची नावं आहेत. एलोन मस्क यांनी 1999 मध्ये ऑनलाइन बँकिंग प्लॅटफॉर्म X.com लाँच केले. 2002 मध्ये त्यांनी स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन म्हणजेच स्पेसएक्सची सुरुवात केली. एका अंदाजानुसार, एलोन मस्कची ही कंपनी सुमारे 150 अब्ज डॉलर्सची आहे. (Elon Musk)
ट्विटर विकत घेतल्यावरही त्यांनी त्याचे नामांतर करुन ‘X’ हे नावं दिले. एलॉन मस्क हे टेस्ला या ऑटोमोबाईल कंपनीचेही मालक आहेत. 2015 मध्ये, टेस्ला कंपनीने मॉडेल-एक्स नावाची तिसरी इलेक्ट्रिक कार लाँच केली. टेस्लाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी ही एक कार आहे. यातूनच मस्क यांना ‘X’ या अक्षराबद्दल किती प्रेम आहे, हे समजते. त्यामुळेच आपल्या मुलालाही त्यांनी हेच, ‘X’ हे नाव दिले आहे. त्यांचा दहावा मुलगा असलेला ‘X’ हा मस्क यांचा सर्वाधिक लाडका मुलगा आहे. मस्क यांच्या प्रत्येक मिटींगला हा ‘X’ हजर असतो. तोही आपल्या अब्जाधिश वडिलांच्या खांद्यावर बसून. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पहिल्या प्रेसकॉन्फरन्सलाही हा ‘X’ हजर होता. यामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने तयार केलेल्या सरकारी कार्यक्षमता विभागासंदर्भात त्यांनी अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी खांद्यावर बसलेल्या एक्सला सांभाळत ट्रम्प यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली. (International News)
अर्थात यावरुनही त्यांच्यावर टिका झाली. कारण ट्रम्प हे सरकारी विभागातील अनावश्यक खर्चाला कात्री लावत आहेत. त्यासाठी मस्क यांची त्यांनी नेमणूक केली आहे. यावर टिका होत आहे. मात्र मस्क यांनी एक्सबरोबर खेळत यासंदर्भात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिल्यामुळे मस्क या टिकांकारांना फारसं महत्त्व देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हाच संदेश त्यांनी एक्सला सोबत घेऊन पत्रकारांना दिल्याचे सांगितले जात आहे. एकूण काय पाच वर्षाचा हा एक्स आत्तापासूनच उद्योगासह राजकारणाचे धडेही गिरवत आहे. याच पत्रकारपरिषदेच्या दरम्यान ओव्हल ऑफीसमधील राष्ट्राध्यक्षांच्या टेबलाखाली खेळणा-या एक्सचे फोटोही व्हायरल झाले. जॉन केनेडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतांना ज्यु. केनेडी यांच्या टेबलखाली बसलेला एक फोटो प्रचंड लोकप्रिय झाला होता. (Elon Musk)
=============
हे देखील वाचा : Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे झाले ?
Modi Trump : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत काय ठरलं?
=============
एक्स आणि ट्रम्प यांच्या फोटोशी आता त्याची तुलना करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिकन दौ-यादरम्यान हाच एक्स पंतप्रधान मोदी यांनाही भेटला. या भेटीत पंतप्रधान मोदी यांनी मस्कच्या मुलांना तीन पुस्तके भेट दिली. त्यात नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे “द क्रेसेंट मून”, द ग्रेट आरके नारायण कलेक्शन आणि पंडित विष्णू शर्मा यांचे पंचतंत्र या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांना बघून एक्स आनंदित झाला. ही पुस्तकं त्यानं लगेच वाचायला घेतली आणि पंतप्रधान मोदी यांचे आभारही व्यक्त केले. बहुधा त्याच्या याच स्वभावामुळे मस्क यांना एक्स हा सर्वाधिक आवडतो. एलॉन मस्क यांना एकूण 12 मुलं आहेत. या सर्व मुलांपैकी त्यांच्यासोबत फक्त एक्स सर्वत्र असतो. सुरुवातीला या एक्स नावावरुन मस्क अनेकवेळा ट्रोल झाले होते. मात्र आता हा एक्स लोकप्रियतेच्या बाबतीत आपल्या वडिलांना टक्कर देत आहे. (International News)
सई बने