Home » Mohammad Ali Jinnah : एला वालिया आणि मोहम्मद आली जिना !

Mohammad Ali Jinnah : एला वालिया आणि मोहम्मद आली जिना !

by Team Gajawaja
0 comment
Mohammad Ali Jinnah
Share

मोहम्मद अली जिना यांना पाकिस्तानचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. मोहम्मद जिना यांनी रतनबाई नावाच्या पारसी महिलेबरोबर दुसरे लग्न केले होते. रतनबाई या मुंबईतील श्रीमंत पारसी कुटुंबातील होत्या. त्यांच्या कुटुंबाला हे लग्न पसंत नव्हते. शिवाय रतनबाई आणि जिना यांच्या वयामध्येही मोठे अंतर होते. या दोघांना दिना नावाची मुलगी झाली. पुढे भारत-पाकिस्तान फाळणीनंतर दिना यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला आणि जिना यांच्या या एकुलत्या एक मुलीनं पारसी व्यापारी नेव्हिल वाडिया यांच्याबरोबर लग्न केले. तेव्हा जिना यांना नाराजी व्यक्त केली होती. (Mohammad Ali Jinnah)

मात्र दिना या भारतप्रेमी होत्या. याच दिना वाडिया यांची पुन्हा चर्चा होत आहे. कारण त्यांच्या कुटुंबातील पुढच्या पिढीची सदस्य असलेल्या एला वाडिया हिने नुकतीच पॅरिसमधील एका प्रतिष्ठित कार्यक्रमात हजेरी लावली. एला ही मोहम्मद अली जिना यांची चौथी पिढी आहे. पॅरिसमधील ले बाल डेस डेब्युटंटेस हा सोहळा म्हणजे, जगभरातील प्रतिष्ठीतांच्या नवीन पिढीचा सोहळा असतो. या सोहळ्यात एला तिच्या आधुनिक पेहरावानं आणि सौंदर्यानं सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे. पाकिस्तानचे संस्थापक असलेल्या मोहम्मद अली जिना यांची पुढची पिढी काय करते, याबाबत फारशी माहिती नाही. जिना यांची पुढची पिढी पाकिस्तानमध्ये नाही, तर भारतात वाढली आहे. वाडिया कुटुंबामध्ये जिना यांच्या एकुलत्या एक मुलीनं लग्न केलं. वाडिया हे कुटुंब प्रतिष्ठित उद्योगपती घराणे आहे, आणि आता या कुटुंबाची आणखी एक तरुण फळी चर्चेत आली आहे. एला वाडिया ही जिना यांची पणतू म्हणजेच चौथी पिढी आहे. (International News)

पाकिस्तानचे संस्थापक असलेल्या मोहम्मद अली जिना यांची पणतू एला वाडिया ही पॅरिसमधील प्रतिष्ठित ‘ले बाल डेस डेब्युटंटेस २०२५’ मधून जगासमोर आली. एला ही जहांगीर आणि सेलिना वाडिया यांची मुलगी आहे. ले बाल देस डेब्युटँटेस हा पॅरिसमध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा प्रतिष्ठित फॅशन आणि चॅरिटी कार्यक्रम आहे. यात जगभरातील प्रभावशाली कुटुंबांमधील १६-२२ वयोगटातील तरुणी, ज्यांना डेब्युटँटेस म्हणतात, त्यांचा परिचय करुन दिला जातो. जगातील सर्वात महागडे डिझायनर कपडे बघायचे असले तर हा ले बाल देस डेब्युटंटेस नक्की बघावा असे सांगितले जाते. हा कार्यक्रम, हा मेट गाला आणि रॉयल बॉलचे मिश्रण आहे. त्याला “ले बाल” असेही म्हणतात. जगभरातील मान्यवर फॅशन डिझायनचे सर्वोत्तम डिझाइन यातूनच जगासमोर येतात. या शानदार सोहळ्यात हॉलिवूड स्टार, राजेशाही आणि मिलेनियर कुटुंबातील मुली सहभागी होतात. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये पॅरिसमध्ये होणा-या या सोहळ्यातून धर्मादाय संस्थांसाठी मोठा निधी उभारला जातो. (Mohammad Ali Jinnah)

याच सोहळ्यात दिसलेल्या एका चेह-याची जगभरात चर्चा सुरु झाली आहे. विशेषतः भारत आणि पाकिस्तानमध्येही या तरुणीची चर्चा सुरु झाली आहे. जहांगीर वाडिया आणि सेलिना वाडिया यांची मुलगी असलेली एला वाडिया ही पॅरिसमधील या ले बाल डेस डेबुटंटेस कार्यक्रमात सोनेरी रंगाचा डिझायनर गाऊन घालून आली, आणि सर्वत्र तिच्या सौंदर्याची चर्चा सुरु झाली. या सोहळ्यात जगभरातील फक्त २५ तरुणींना सहभागी करुन घेतले जाते. त्यापैकी एक असलेल्या एलाचे वडिल, उद्योजक जहांगीर वाडिया हे फॅशन ब्रँड सी फेमचे मालक आहेत. शिवाय वडील बॉम्बे डाईंग, गो फर्स्ट आणि बॉम्बे रिअल्टीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर एलाची आई सेलिना वाडिया या प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. (International News)

========

हे देखील वाचा :  Japan : कब्रस्तान हवे असले तर तुमच्या देशात जा !

========

आता एला वाडियाचे या सोहळ्यातील सुंदर फोटो जगभरात सर्वात व्हायरल झाले आहेत. एला वाडिया सोबत या सोहळ्यात ड्यूक ऑफ मार्लबोरोची मुलगी लेडी अरामिंटा स्पेन्सर-चर्चिल, अमेरिकन अभिनेत्री अँजेला बॅसेटची मुलगी ब्रॉनविन व्हान्स, फॅशन डिझायनर कॅरोलिना हेरेराची नात कॅरोलिना लॅन्सिंग, अमेरिकन व्यावसायिक साम्राज्याची वारस रूबी केम्पर, होहेनझोलर्नच्या प्रिन्स अल्बर्टची मुलगी युजेनिया, सारा बे, माजी ELLE संपादक जॅनिस ली यांची मुलगी, राजकुमारी इसाबेल डी’ऑर्लियन्स अशा जगभरातील प्रतिष्ठित घराण्यातील तरुणी सहभागी झाल्या होत्या. पॅरिसमधील प्रतिष्ठित शांग्री-ला हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्यात जगभरातील सर्वज राजघराण्याचे सदस्य, हॉलिवूड स्टार आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. (Mohammad Ali Jinnah)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.