Home » Elizabeth Gogoi : कोण आहेत एलिझाबेथ गोगोई ?

Elizabeth Gogoi : कोण आहेत एलिझाबेथ गोगोई ?

by Team Gajawaja
0 comment
Elizabeth Gogoi
Share

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची चहुबाजुने कोंडी होत आहे. अशाचवेळी भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही त्वरित देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी भारतात राहत असलेल्या काही पाकिस्तानी नागरिकांची नावे चर्चेत आली.  त्यातील एक आहे, सीमा हैदर हिचे आणि दुसरे नाव आहे, एलिझाबेथ गोगोई यांचे. (Elizabeth Gogoi)

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ गोगोई या पाकिस्तानी एनजीओसोबत काम करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.  पाकिस्तानी गुप्तचर संघटनेलाही मदत करत असल्याचा त्यांच्यावर आरोप झाला असून एलिझाबेथ यांना पाकिस्तान मंत्रालयाकडून पगार मिळत असल्याचाही आरोप आहे. आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असतांना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पुन्हा गौरव गोगोई आणि एलिझाबेथ गोगोई यांच्यावर वार केले आहेत.  याशिवाय पहलगाम हल्ला होण्यापूर्वी गौरव गोगोई 15 दिवस पाकिस्तानमध्ये मुक्कामी असल्याचा आरोपही त्यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता साम्बित पात्रा यांनीही गौरव गोगोई यांच्यावर असेच आरोप करत अटारी सीमेवरुन पाकिस्तानात गेलेल्या गौरव गोगोई यांनी पाकिस्तानात काय केले, हे स्पष्ट करावे असे खुले आव्हान दिले आहे.  या सर्वात पुन्हा गौरव गोगोई यांच्या पत्नी आणि मुलांच्या नागरिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Elizabeth Gogoi)   

भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असतांना कॉंग्रेसचे नेते गौरव गोगोई यांची पत्नी आणि मुलांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह विचारण्यात येत आहे.  आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या पत्नी एलिझाबेथ गोगोई यांना पाकिस्तानी एनजीओकडून पगार मिळत असल्याचे सांगितले आहे. शिवाय एलिझाबेथ या भारतीय नागरिकही नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  शिवाय गोगोई दाम्पत्याच्या मुलांच्या नागरिकत्वाबद्दल बिस्वा यांनी प्रश्नचिन्ह विचारले आहे. (Elizabeth Gogoi) 

यामुळे एलिझाबेथ गोगोई या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.  गौरव गोगोई यांची पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांनी पाकिस्तान सरकारच्या समित्यांमध्ये उच्च पदांवर केल्याचा आरोप करण्यात येतो.  पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख यांच्यासोबत एलिझाबेथ या काम करत होत्या.  या अली तौकीर शेखचे नाव अनेक अतिरेकी कारवायांमध्ये आले आहे.  मुळ ब्रिटीश नागरिक असलेल्या एलिझाबेथ कोलबर्न यांच्याशी शेख यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप यापूर्वीही करण्यात आला आहे.  मात्र यावेळी पहलगाव हल्ल्यापूर्वी गौरव गोगोई पाकिस्तानमध्ये 15 दिवस राहून आल्याचे स्पष्ट झाले.  त्यामुळे त्यांच्यावर आणि एलिझाबेथ हे दोघंही पुन्हा वादात सापडले आहेत.  एलिझाबेथ या आयएसआय या अतिरेकी संघटनेसोबत जोडल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.  पहलगाव हल्ल्यामध्येही याच संघटनेचा समावेश असल्याचा संशय भारत सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.  अशावेळी एलिझाबेथ यांना पाकिस्तान सरकारकडून कशासाठी पगार देण्यात येतो, हा प्रश्न विचारण्यात आला आहे.(Elizabeth Gogoi)  

============

हे देखील वाचा : Mahabharat : महाभारतातील ‘या’ आहेत शक्तिशाली महिला

=============

यासंदर्भात हिमंता बिस्वा सरमा यांनी एलिझाबेथ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  भारतीय तरुणांना पाकिस्तानी दूतावासात नेऊन त्यांचे विचार बदलण्याचा आणि त्यांच्यात कट्टरतावाद वाढवण्याचा प्रयत्न एलिझाबेथ करीत असल्याचेही त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.  एलिझाबेथ गेल्या 12 वर्षापासून भारतात रहात आहेत, मात्र त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले नाही.  शिवाय त्या सर्वात मोठ्या धर्मांतर रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. (Elizabeth Gogoi)  

एलिझाबेथ कोलबर्न यांचा जन्म इंग्लडमध्ये झाला आहे. एलिझाबेथने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.  2013 मध्ये त्यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र गौरव गोगोई यांच्याशी लग्न केले.  एलिझाबेथ यांनी मार्च 2011 ते जानेवारी 2015 दरम्यान क्लायमेट अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्कसाठी काम केले. त्यांनी भारत आणि नेपाळमध्ये सीडीकेएनच्या कार्यक्रमांचे समन्वय साधले. यादरसम्यान त्यांनी अली शेख यांच्यासोबत पाकिस्तानसाठी काम केल्याचेही सांगण्यात येते.  एलिझाबेथ सध्या ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंटमध्ये पॉलिसी अॅनालिस्ट म्हणून काम असल्याची माहिती आहे.  पहलगाव हल्ल्यानंतर पुन्हा त्यांचे नाव वादात सापडले असले तरी गौरव गोगोई यांनी यावर कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.