बहुतांश लोक विजेचे बिल (Electricity bill) अधिक येत असल्याने नेहमीच त्रस्त असतात. तर उन्हाळ्यात अधिक गरम होत असल्याने घरात आपण फॅन, एसी तर खुप वेळ सुरु ठेवतो. त्यामुळे तेव्हा अधिक विजेचे बिल येणे सहाजिकच आहे. परंतु तरीही अन्य वेळी विजेचे बिल अधिक आल्यानंतर काय करावे हे कळत नाही. अशातच विजेचे बिल कमी येण्यासाठी तुम्हाला लहानसा बदल करावा लागणार आहे. जेणेकरुन तुमचे येणारे आताचे विजेचे बिल हे काही प्रमाणात कमी येईल.
विजेचे बिल कमी करण्यासाठी फार काही करण्याची गरज नाही आहे. फक्त काही गोष्टींमध्ये बदल करावा लागणार आहे. कारण काही ठिकाणी विनाकारण विजेचा वापर करणे टाळावे. जसे की, उन्हाळ्यात सर्वाधिक विजेचे बिल हे एसीमुळे येते. मात्र तुम्ही त्यात बदल करु शकता. त्यासाठी जर तुमच्या घरी लावण्यात आलेला एसी हा खुप जुना झाला असेल किंवा नॉन-कन्वंर्टर एसी लावला असून त्याची रेटिंग कमी असेल तर तुम्हाला विजेचे बिल अधिक येऊ शकते. ते कमी करण्यासाठी तुम्ही कंन्वर्टर एसी खरेदी करु शकता. नवा एसी खरेदीवेळी तुम्हाला त्यासाठी दिलेल्या रेटिंगकडे ही पहावे लागणार आहे.
हे देखील वाचा- Boarding Pass सोबत ‘या’ चुका करु नका अन्यथा होईल पश्चाताप

आणखी महत्वाचे म्हणजे अधिक रेटिंग असणारे इन्वर्टर एसी हे विजेचे बिल(Electricity bill) कमी करु शकतात. या व्यतिरिक्त एसीला २४-२५ डिग्री टेम्परेचरवरच ठेवा. यामुळे अधिक विजेचा वापर ही केला जाणार नाही आणि तुमच्या घरातील विजेचे बिल ही कमी येईल. तसेच एसीची वेळोवेळी सर्विसिंग सुद्धा करणे महत्वाचे आहे. कारण याचा थेट परिणाम कुलिंगवर होतो आणि विजेचा अधिक वापर होते. आपल्याला गरज असेल तेव्हाच एसी किंवा घरातील लाइट, पंख्यांचा वापर करावा. म्हणजेच विजेवर चालणाऱ्या गोष्टींचा आपल्या गरजेवेळीच वापर करावा.
जर तुम्ही आतापर्यंत जीएफएळ बल्बचा वापर करत असाल तर तो बदलून लगेच एलईडडी ब्लब वापरण्यास सुरुवात करा. त्याचसोबत थंडीत किंवा पावसाळ्यात ही जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकवर चालणारा गिझर असेल तर तो सुद्धा तुम्हाला हवे तेव्हाच सुरु ठेवून नंतर बंद करुन द्या. अशा प्रकारे तुम्ही विजेचा विनाकारण उपयोग होत नसेल तर ते बंद करुन ठेवत जा. जेणेकरुन तुम्हाला विजेचे बिल सुद्धा कमी येण्यास मदत होईल.