सिरिया या देशानंतर आणखी एक मुस्लिम देशामध्ये अध्यक्षांविरुद्ध निदर्शने सुरु झाली आहेत. ही परिस्थिती आहे, तुर्की या देशामधील. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी त्यांचे प्रमुख विरोधक आणि इस्तंबूलचे महापौर एकरेम इमामोग्लू यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप ठेवत त्यांना अटक केली आहे. या अटकेनंतर देशभर निया देशातील स्थिती एवढी बिघडली आहे की, आंदोलन करण्यासाठी बंदी असूनही रस्त्यावर गेले आठ दिवस लाखो नागरिक जमले आहेत.दर्शने होऊ लागली. इमामोग्लू यांच्यावर भ्रष्टाचार आणि दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा आरोप करुन त्यांच्या समर्थकांनाही अटक होऊ लागताच जनतेमध्ये उद्रेक उसळला. इमामोग्लू यांच्या समर्थकांच्या मते, एर्दोगान यांच्या एकाधिकारशाहीने तुर्कीची जनता त्रस्त झाली आहे. एकरेम इमामोग्लू यांनी एर्दोगान यांच्या याच एकाधिकारशाहीला आव्हान दिले आहे. (Syria)
त्यामुळे 2028 मध्ये होणा-या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांना अटक करण्यात आल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. एर्दोगानसमोर आव्हान उभं करणारे इमामोग्लू हे एकमेव विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांची लोकप्रियता एर्दोमान यांच्यापेक्षा जास्त असल्यानं 2028 ची निवडणूक एर्दोमान हरणार असे भाकित करण्यात येत आहे. एकरेम इमामोग्लू यांनी एर्दोमान यांच्या कालखंडातील अनेक व्यवहारांची चौकशी कऱण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भविष्यात ते जर सत्तेत आले तर एर्दोमान यांनी उभारलेल्या साम्राज्याची चौकशी होणार हे उघड आहे, त्यामुळे एर्दोमान यांनी आपल्या विरोधकाला आधीच अटक केली. मात्र ही त्यांची खेळी आता त्यांच्यावरच उलटल्याची चिन्हे आहेत. कारण तुर्कीमधील जनतेने एर्दोमान यांच्या या कृतीचा निषेध सुरु केला असून सुरु झालेली निदर्शने कधीही हिंसक होतील, अशी शक्यता आहे. एका माहितीनुसार एर्दोमान यांनी शेजारी जॉर्जियामध्ये आपले कुटुंब हलवले असून, देशातील परिस्थिती गंभीर झाली, तर स्वतः एर्दोमानही या देशाच्या आश्रयाला जाण्याची शक्यता आहे. (International News)
तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांची सत्ता धोक्यात आली आहे. तुर्कीचे 12 वे अध्यक्ष असलेले एर्दोगान हे आता 71 वर्षाचे आहेत. तुर्कीमध्ये 2028 साली निवडणुका होणार असून एर्दोगान या निवडणुका लढवणार आहेत. मात्र त्यांच्या हुकुमशाहीला येथील जनता कंटाळली आहे. एर्दोगान हे इस्लामी राजकीय पार्श्वभूमीतून आलेले नेते आहेत. रुढीवादी विचारसरणीच्या एर्दोगान यांना देशातील तरुण वर्गाचा विरोध वाढत आहे. अशावेळी इस्तंबूलचे महापौर इमामोग्लू यांच्याकडे तुर्कीचे भावी नेतृत्व म्हणून बघण्यात येत आहे. 54 वर्षाचे इमामोग्लू हे तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. याच इमामोग्लू यांनी एर्दोगान यांनी 2028 मध्ये होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आव्हान दिले आहे. तुर्कीमध्ये यासंदर्भात झालेल्या पाहणी अहवालानुसार एर्दोगान यांच्यापेक्षा इमामोग्लू हे कितीतरी अधिक मतांनी निवडणुकीत विजयी होणार आहेत. त्यामुळे हा संभाव्य धोका ओळखून एर्दोगान यांनी इमामोग्लू यांना अटक केली. अर्थात ही त्यांची खेळी नेमकी उटली पडली, आणि तुर्कीमध्ये जनक्षोभ उसळला आहे. (Syria)
इमामोग्लू यांच्या अटकेनंतर तुर्कीमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. तुर्कीच्या अनेक शहरांमध्ये इमामोग्लूच्या समर्थनार्थ रॅली काढल्या जात आहेत. इमामोग्लू यांच्या समर्थकांनी या अटकेला राजकीयदृष्ट्या प्रेरित म्हटले आहे. मात्र पोलिसांनी इस्तंबूलचे महापौर इमामोग्लू यांनी बंदी घातलेल्या कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीला मदत केल्याचा आरोप आहे. अर्थात इमामोग्लू यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. औपचारिकपणे अटक करण्यात आली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगात पाठवण्यात आले आहे. इमामोग्लू यांच्यासोबत अन्य विरोधी नेत्यांवरही अशीच कारवाई झाली असून तेही अटकेत आहेत. (International News)
==============
हे देखील वाचा : America : अमेरिकेतील शिक्षण विभागालाच टाळे !
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
या सर्वांविरुद्ध संतापलेल्या नागरिकांनी निदर्शने सुरु केली असून गेल्या दशकातील सर्वात मोठी निदर्शने म्हणून त्यांचे वर्णन केले जात आहे. अनेक ठिकाणी निदर्शने हिंसक झाली असून पोलीसांनी हजारो इमामोग्लू समर्थकांना अटक केली आहे. तरीही तुर्कीच्या शहरांमधील आंदोलकांची संख्या कमी होत नसल्यामुळे एर्दोगान यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तुर्कीमध्ये निदर्शने करण्यावर बंदी घालण्यात आली तरी हजारो नागरिक रस्तावर बसून इमामोग्लू यांच्या अटकेचा निषेध करीत आहेत. ही निदर्शने म्हणजे, एर्दोगान यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट असल्याचीही चर्चा आहे. एर्दोगान यांनी वाढत्या हिंसक निदर्शनामुळे आपल्या कुटुंबालाही शेजारील देशात नेल्याची बातमी आली आहे. (Syria)
सई बने