Home » Ekambashwarnath Temple : या मंदिरात झाली होती माता पार्वतीची परीक्षा !

Ekambashwarnath Temple : या मंदिरात झाली होती माता पार्वतीची परीक्षा !

by Team Gajawaja
0 comment
Ekambashwarnath Temple
Share

भगवान शंकराची पौराणिक वारसा सांगणारी अनेक मंदिरे तामिळनाडू राज्यामध्ये आहेत. त्यापैकी एक मंदिर या राज्याच्या कांचीपुरम शहरात आहे. एकंबेश्वरनाथ नावाचे हे मंदिर माता पार्वतीच्या तपश्चर्येसाठी ओळखले जाते. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी माता पार्वतीनं वाळूपासून शिवलिंगाची स्थापना करून येथे तपश्चर्या केली होती. याच शिवलिंगासह येथे पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्वाचे प्रतीक मानून भगवान शंकराची पूजा केली जाते. या शिवलिंगाला बालुका लिंगही म्हणतात. हे शिवलिंग अत्यंत शक्तिशाली आणि दैवी उर्जेचे प्रतीक मानले जाते. हे मंदिरही विशाल आहे. (Ekambashwarnath Temple)

 

एकूण 25 एकर क्षेत्रात बांधलेले हे मंदिर 11 मजली उंच आहे. 200 फूट उंचीच्या या मंदिराची वास्तुकला ही अनोखी आहे. एकंबेश्वरनाथ मंदिरात भगवान शंकराची आराधना करण्यासाठी भाविक येतातच. शिवाय या मंदिराच्या अनोख्या वास्तुकलेला बघण्यासाठीही येथे मोठी गर्दी होते. या मंदिरात भगवान शंकराची पूजा एकंबरेश्वर किंवा एकंबरनाथ म्हणून केली जाते. ज्याचा अर्थ ‘आंब्याच्या झाडाचा स्वामी’ असा होतो. कारण या मंदिराच्या आवारात तब्बल 3500 वर्षे जुने एक आंब्याचे झाड देखील आहे. एकूणच या एकंबेश्वरनाथ मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. आणि या मंदिराची रहस्येही अनेक आहेत. (Social News)

तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम येथील एकंबरेश्वर मंदिर हे एकमरेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. हे मंदिर 9 व्या शतकात चोल राजवंशाच्या शासकांनी बांधले. त्यानंतर विजयनगर साम्राज्याच्या शासकांनी त्याचा विस्तार केला. भगवान शंकरानं येथेच माता पार्वतीची परीक्षाही घेतली होती. असे म्हटले जाते की भगवान शिव स्वतः पार्वती मातेची परीक्षा घेण्यासाठी येथे प्रकट झाले होते. एकंबेश्वरनाथ मंदिरात भगवान शंकर यांची पूजा बालुकलिंग नावाच्या एका विशेष लिंगाच्या रूपात केली जाते. या मंदिरातील हे वाळूलिंग अद्वितीय उर्जेचे प्रतीक मानले जातो. हे मंदिर हिंदू धर्मातील शैव पंथासाठी महत्त्वाचे असून ते पाच भूत स्थळांपैकी एक असलेल्या पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. या मंदिर संकुलात चार गोपुरम म्हणजेच प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी दक्षिणेकडील गोपुरम सर्वात उंच असून त्याची उंची 192 आहे. भारतातील सर्वात उंच गोपुरम म्हणून या गोपुरमचा उल्लेख केला जातो. (Ekambashwarnath Temple)

 

या मंदिराच्या परिसरात एक मोठे आंब्याचे झाड आहे. या आंब्याच्या झाडाचे वय 3500 वर्षाहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. त्यातही आश्चर्य म्हणजे, या आंब्याच्या झाडाच्या प्रत्येक फांदीवर वेगवेगळ्या रंगांचे आंबे येतातच शिवाय त्यांची चवही वेगवेगळी असते. या आंब्याच्या झाडाची आणि माता पार्वती यांची एक कथा सांगितली जाते. त्यानुसार, माता पार्वती वेगवती नदीजवळील मंदिरातील या आंब्याच्या झाडाखाली तपश्चर्या करत होती. यावेळी भगवान शंकराने माता पार्वतीची परीक्षा घेतली. देवानं मातेला अग्निच्या स्वाधीन केले. यावेळी माता पार्वतीच्या मदतीला साक्षात भगवान विष्णू आले. त्यांनी अग्निचा दाह कमी करण्यासाठी भगवान शंकराच्या डोक्यावर विराजमान झालेल्या चंद्राच्या किरणांचा वापर केला. यानंतर भगवान शंकरांनी माता पार्वतीची तपश्चर्या भंग करण्यासाठी गंगा नदीला या स्थानावर पाठवले. यावेळी माता पार्वतीनं आपण दोघी बहिणी असल्याचे सांगून गंगा नदीला नमस्कार केला आणि गंगा नदीनं मातेच्या तपश्चर्येत व्यत्यय आणला नाही. (Social News)

========

Varanasi : तिळभांडेश्वर मंदिराचे रहस्य !

=========

त्यानंतर माता पार्वतीने भगवान शंकराशी एकरूप होण्यासाठी वाळूपासून शिवलिंग तयार केले. माता पार्वतीच्या या तपश्चर्येवर भगवान शंकर खूश झाले आणि माता पार्वतीसमोर प्रकट झाले. जेव्हा भगवान शिव यांनी देवी पार्वतीला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा देवी पार्वतीने लग्नाची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर महादेवाने माता पार्वतीशी येथे लग्न केले. या आख्यायिकेनुसार भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाचे स्मरण करण्यासाठी वार्षिक ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. या दरम्यान, एकंबेश्वरनाथ मंदिरातील वाळूचे शिवलिंग आणि कामाक्षी मंदिरातील मूर्ती पवित्र आंब्याच्या झाडाखाली’ नेल्या जातात आणि शिव पार्वती विवाह कल्याणोत्सव साजरा केला जातो. आजही हे आंब्याचे झाड मंदिराच्या आत असून त्याचे दर्शन पवित्र मानले जाते. (Ekambashwarnath Temple)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.