Ekadashi : हिंदू धर्मात एकादशी हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. भगवान विष्णूच्या भक्तांसाठी हा दिवस उपवास, जप आणि प्रार्थनेचा असतो. असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते. पण अनेकांना प्रश्न पडतो वर्षभरात नक्की किती एकादश्या येतात? आणि त्या दिवशी कोणते उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात? चला जाणून घेऊया याचं संपूर्ण धार्मिक महत्त्व. (Ekadashi)
वर्षभरात किती असतात एकादश्या? प्रत्येक महिन्यात दोन एकादश्या असतात शुक्ल पक्षातील एकादशी आणि कृष्ण पक्षातील एकादशी.म्हणजेच एका वर्षात साधारणत २४ एकादश्या येतात.परंतु अधिवर्ष (leap year) आल्यावर म्हणजेच जेव्हा चांद्र वर्ष थोडं लांब असतं, तेव्हा अधिक मास येतो आणि त्या वर्षात दोन अतिरिक्त एकादश्या म्हणजे एकूण २६ एकादश्या होतात. प्रत्येक एकादशीचं वेगळं नाव आणि धार्मिक महत्त्व असतं जसे की निर्जळा एकादशी, मोक्षदा एकादशी, देवउठणी एकादशी, कामिका एकादशी, व्रतद्वादशी इत्यादी. प्रत्येक व्रत भगवान विष्णूच्या वेगवेगळ्या रूपाशी संबंधित असतं आणि भक्त आपल्या श्रद्धेनुसार उपवास व पूजा करतात. (Ekadashi)

Ekadashi
एकादशी व्रताचं धार्मिक महत्त्व : एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि नामस्मरण केल्याने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो.पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूंनी स्वतः एकादशी व्रताचं महत्त्व सांगितलं होतं. जे भक्त प्रामाणिकपणे हे व्रत पाळतात त्यांचे पाप नष्ट होतात आणि त्यांना वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. भगवान विष्णूला तुळशीपत्र, पिवळे फुलं आणि पिवळ्या वस्त्राचं अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तसंच, गीतेचं पठण, विष्णुसहस्रनामाचं जप आणि दानधर्म केल्यास पुण्य अनेक पटींनी वाढतं.
भगवान विष्णूना प्रसन्न करण्याचे सोपे उपाय
1. एकादशीच्या दिवशी धान्य, भात किंवा तांदूळ खाणं टाळा आणि शक्य असल्यास फक्त फळाहार करा.
2. सकाळी लवकर उठून भगवान विष्णूचा ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र १०८ वेळा जपा.
3. विष्णू मंदिरात तुळशीपत्र आणि पिवळ्या फुलांचं अर्पण करा.
4. शक्य असल्यास एखाद्या गरजूंना अन्नदान करा कारण विष्णूला दान सर्वात प्रिय आहे.
5. संध्याकाळी दीपदान केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीप्राप्ती होते.
देवउठणीपासून सुरू होतो शुभ काळ कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशी हा एक विशेष दिवस असतो. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि त्या क्षणापासून सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते. लग्न, गृहप्रवेश, मुहूर्त, व्रत यांची सुरुवात या दिवसानंतर केली जाते. म्हणूनच, देवउठणी एकादशी हा हिंदू संस्कृतीतील पुनरुत्थानाचा आणि नवीन प्रारंभाचा प्रतीक मानला जातो.
=================
हे देखील वाचा :
Shrikrishna : गोवर्धन पूजेत श्रीकृष्णाला ५६ भोग का दाखवतात?
Bhaubij : भाऊबीजेच्या दिवशी ‘हे’ सोपे उपाय करून होतील मोठे लाभ
=================
एकादशी ही केवळ उपवासाची परंपरा नाही, तर ती आत्मिक शुद्धीचा आणि आत्मसंयमाचा दिवस आहे. या दिवशी मन, वाणी आणि आचरण यांचा संयम ठेवणं म्हणजे भगवान विष्णूच्या कृपेची प्राप्ती. वर्षातील २४ किंवा २६ एकादश्या म्हणजे भक्ती, संयम आणि श्रद्धेचं प्रतिक आहेत. म्हणूनच, पुढची एकादशी आली की फक्त उपवासच नाही तर शुद्ध मनाने प्रार्थना, दान आणि जप करा कारण प्रत्येक एकादशी ही विष्णूच्या कृपेचं द्वार असते. तज्ज्ञांच्या मते, या छोट्या पण सातत्यपूर्ण सवयींमुळे व्यक्तीच्या जीवनात शांती, आरोग्य आणि समृद्धी येते.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics