Home » घरीच बनवा चवदार आणि अंड्याविना ब्राउनी, लहानांसोबत मोठेही करतील पसंत

घरीच बनवा चवदार आणि अंड्याविना ब्राउनी, लहानांसोबत मोठेही करतील पसंत

by Team Gajawaja
0 comment
Eggless Chocolate Brownie Recipe
Share

मुलांना चॉकलेट खूप आवडतं. इतकंच काय, तर मोठी माणसंही चॉकलेटला नाही म्हणत नाहीत. पण जर तुमची मुले सतत गोड खायला मागत असतील, तर त्यांना घरीच चॉकलेट ब्राउनी बनवून देऊ शकता. ही ब्राउनी खायलाही स्वादिष्ट लागते शिवाय लहानांसकट मोठ्यांनाही आवडेल. तसेच ब्राउनी आइस्क्रीमसोबत सर्व्ह करता येते.

ब्राउनी हे एक परफेक्ट डेजर्ट आहे. पण सर्वचजण अंड खात नाहीत. पण अंड्याशिवायही उत्तम चवीची ब्राउनी बनवता येते. ती ही घरच्या घरी. आज आम्ही तुम्हाला अंड्याशिवाय कुकरमध्ये ब्राउनी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ज्याची चवही अप्रतिम असेल. (Eggless Chocolate Brownie Recipe)

चॉकलेट ब्राउनी (Eggless Chocolate Brownie Recipe)- साहित्य


अर्धी वाटी मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाऊण चमचा बेकिंग सोडा, पाऊण कप कोको पावडर, अर्धी वाटी पिठीसाखर, पाव वाटी तेल, व्हॅनिला इसेन्स, एक ते दोन चमचे दूध, दोन चमचे अक्रोडाचे तुकडे, पूड आणि गरजेनुसार तूप.

चॉकलेट ब्राउनी (Eggless Chocolate Brownie Recipe) – कृती

मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि कोको पावडर एका भांड्यात घ्या. ते चांगले मिसळा. दुसऱ्या भांड्यात पिठी साखर, तेल आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा. कुकरची शिट्टी काढून त्यात एक वाटी मीठ टाकून गॅसवर ठेवा आणि झाकण बंद करा.(Eggless Chocolate Brownie Recipe)

बेकिंगसाठी एक भांडे देशी तुपाने ग्रीस करा. बटर पेपर असेल तर ते लावून ग्रीस करा. आता या भांड्यात सर्व पीठ उलटे ठेऊन सेट करा. मात्र हे करताना संपूर्ण भांडे भरणार नाही याची काळजी घ्या. त्यात एक चतुर्थांश जागा मोकळी ठेवा.

आता हळूहळू कुकर पुरेसा गरम होईल. हळूवारपणे झाकण उघडा आणि कशाने तरी धरून कुकरमध्ये ठेवा. यावेळी हात जळणार नाहीत याची काळजी घ्या. कुकरच्या आत स्टँड ठेवा. ज्याच्यावर ब्राउनीच्या पिठाचे भांडे ठेवता येईल. महत्त्वाचे म्हणजे, त्यात मीठ घालू नका!
=====

हे देखील वाचा- उन्हाळ्यात ताक सेवन करणे ठरेल फायदेशीर, पण वाढू शकतात ‘अशा’ लोकांच्या समस्या!
=====

पंधरा मिनिटांनंतर झाकण उघडून टूथपिकच्या मदतीने ब्राउनी शिजली आहे की नाही ते तपासा. शिजली असेल तर गॅस बंद करून ती बाहेर काढा. नंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर ब्राउनी बाहेर काढून तिचे तुकडे करा. सर्व्हिंग बाऊलमध्ये ब्राउनीवर आइस्क्रीम आणि चॉकलेट सिरप टाकून सर्व्ह करा. प्रत्येकाला हे डेझर्ट नक्कीच आवडेल. (Eggless Chocolate Brownie Recipe)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.