फूड एलर्जी ही रोगप्रतिकारक शक्तीची अशी रिअॅक्शन आहे जी एखादा खास पदार्थ खाल्ल्यानंतर होतो. एलर्जीचे कारण बनणाऱ्या पदार्थाचा थोडा तरी भाग सुद्धा काही समस्यांचे कारण बनू शकतो. जसे डाइजेस्टिव्ह प्रॉब्लम, हाइव्स, उल्टी, खरूज. काही लोकांना काही खाद्यपदार्थांची एलर्जी असते. जसे की, मशरुम, शेंगदाणे, मासे. अशातच काही लोकांना अंड्यापासून सुद्धा एलर्जी असते. मुलांमध्ये सामान्य एलर्जीचे कारण बनणाऱ्या पदार्थांमध्ये अंड्याचा सुद्धा समावेश आहे. ही एलर्जी माइल्ड ते गंभीर सुद्धा असू शकते. तर जाणून घेऊयात अंड्यामुळे होणाऱ्या एलर्जीची कारणे, लक्षणे आणि त्यापासून कसा बचाव कराल त्याबद्दल अधिक. (Egg Allergy Tips)
अंड्यामुळे होणाऱ्या एलर्जीची काय कारणं आहेत?
मायो क्लिनिक नुसार, अंड्याच्या एलर्जीचा प्रभाव हा वेगवेगळ्या व्यक्तीवर वेगळा असू शकतो. याची लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत.
-त्वचेवर सूज येणे किंवा हाइव्स
-नाक बंद होणे, वाहणे किंवा शिंका येणे
-पचनासंबंधित समस्या जसे की, उलटी होणे
-अस्थमाची लक्षण जसे की, खोकला, छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास समस्या

या व्यतिरिक्त गंभीर अंड्याची एलर्जी ही एनाफिलेक्सिसचे सुद्धा कारण बनू शकते. त्याची लक्षणं पुढीलप्रमाणे-
-पोटात दुखणे
-श्वास घेण्यास समस्या
-बेशुद्ध पडणे
अंड्याच्या एलर्जीची कारणे
जसे आपण पाहिले की, रोगप्रतिकारक शक्तीचे ओवररिअॅक्शन फूड एलर्जीचे कारण बनू शकते. अंड्याच्या एलर्जीमुळे रोगप्रतिकारक शक्ती ही अंड्याचे प्रोटीन हे चुकून हानिकारक असल्याचे मानते. अशातच तुम्ही त्यापासून बनवण्यात आलेल्या गोष्टी खाण्यापासून दूर राहिले पाहिजे.
कसा बचाव कराल?
अंड्याची एलर्जी होण्यापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्या-
-फूड लेबल्स व्यवस्थितीत वाचा आणि अंड्याचे सेवन करण्यापासून दूर रहा
-तुमच्या परिवारातील किंवा मित्रपरिवारात या समस्येबद्दल सांगा.
-जर तुमच्या मुलाला अंड्याची एलर्जी असेल तर त्याला ब्रेस्टफिडिंग करण्यापासून दूर ठेवा (Egg Allergy Tips)
हे देखील वाचा- Vegan Food च्या नावाखाली कच्चे शाकाहारी भोजन आरोग्यासाठी धोकादायक?
अंड्यापासून एलर्जी असेल तर काय खावे?
अंड्याचे सेवन केल्याने आपल्या शरिराला प्रोटीन आणि न्युट्रिशन अगदी सहज मिळतात. मात्र जर एखाद्याला अंड्यापासून एलर्जी असेल तर त्याने अंड्याऐवजी अन्य पदार्थांचा समावेश करावा. जसे की, सोयाबीन, ब्रोकोली, बदाम, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया.
अंड्यामुळे अधिकच एलर्जी झाल्यास तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याचसोबत स्वत:हून कोणत्याही औषधांचे त्यासाठी सेवन करण्यापासून दूर रहा.