Home » सोनं, पैसा, डॉलर…लालू यादव यांच्या मुलीसह नातेवाईकांवर ईडीची छापेमारी

सोनं, पैसा, डॉलर…लालू यादव यांच्या मुलीसह नातेवाईकांवर ईडीची छापेमारी

by Team Gajawaja
0 comment
ED Raids
Share

लालू प्रसाद यादव यांच्या परिवारासंबंधित ‘नोकरीच्या बदल्यात जमीन’ घोटाळ्याची देशभरात चर्चा सुरु आहे. ईडीने बिहारचे माजी मुख्यमंत्र्यांच्या तीन मुली आणि काही आरजेडी नेत्यांच्या परिसरावर छापेमारी केली. दिल्लीत सुद्धा एका घराचा तपास केला गेला. त्यावेळी लालू यांचा मुलगा आणि बिहारचे डेप्युटी सीएम तेजस्वी यादव सुद्धा उपस्थितीत होते. हे घर दिल्लीतील न्यू फ्रेंन्ड्स कॉलनीत आहे. ईडीचे असे म्हणणे आहे की, हे एके इंफोसिस्टिम प्रायव्हेट लिमिटेडचा रजिस्टर पत्ता आहे. जो केस मध्ये सहभागी आहे. ईडीने दावा केला आहे की, यादव परिवार याचा वापर करत आहे. याआधी गाजियाबाद मध्ये लालू यांच्या एका नातेवाईकांच्या घरी सुद्धा ईडीने छापेमारी (ED Raids) केली. हा कथित घोटाळा त्या वेळचा आहे जेव्हा लालू यादव UPA-1 सरकारमध्ये रेल्वे मंत्री होते.

कोणते सामान जप्त केले
५३ लाखांची रोख रक्कम, १९०० अमेरिकन डॉलर, ५४० ग्रॅम सोन, १.५ किलो सोन्याचे दागिने, काही कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस.

कुठे-कुठे केली छापेमारी
ईडीने छापेमारी पटना, फुलवारी शरीफ, दिल्ली-एनसीआर, रांची आणि मुंबईतील लालू प्रसाद यांच्या मुली रागिनी यादव, चंदा यादव आणि हेमा यादव यांच्या घराव्यतिरिक्त आरजेडीचे माजी आमदार अबू दोजाना, अमित कत्याल, नवदीप सरदाना आणि प्रवीण जैन यांच्या ठिकाणांवर केली.

जमिनीच्या बदल्यात नोकरी काय आहे प्रकरण?
असा आरोप लावला जात आहे की, २००४ ते २००९ दरम्यान रेल्वेतील काही झोनमध्ये समूह-डी मध्ये काही लोकांना नोकरी दिली गेली. त्या बदल्यात त्यांना आपली जमीन तत्कालीन रेल्वे मंत्री लालू यादव यांच्या घरातील सदस्य आणि एके इंफोसिस्टिम प्राइवेट लिमिटेडला ट्रांन्सफर केली. अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, रागिनी यादव आणि चंदा यादव एके इंफोसिस्टिम प्रायवेट लिमिटेडमध्ये माजी निर्देशक होत्या. ज्यांना कथित रुपात एका व्यक्तीकडून भूखंड मिळाला होता.(ED Raids)

हे देखील वाचा- पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अमेरिका मदत करणार

या प्रकरणी लालू प्रसाद यादव यांनी काही ट्विट्स ही केले आहेत. त्यांनी त्या दोन्ही मेसेज मध्ये परिवाराला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी असे लिहिले आहे की, आम्ही आपत्काळ ही पाहिला आहे. आम्ही लढाई ही लढलो होते. आज माझी मुलगी, माझी नातवंड आणि गर्भवती पुत्रवधुला भाजपाच्या ईडीने १५ तास बसवून ठेवले आहे. ऐवढ्या खाली उतरुन भाजप आमच्याशी कोणती राजकीय लढाई करणार आहे? तसेच भाजच्या विरोधात माझी वैचारिक लढाई होती आणि राहणार आहे असे ही त्यांनी म्हटले. त्यांच्या समोर मी कधीच गुघडे टेकले नाही आणि माझ्या परिवारातील अथवा पक्षाचा कोणताही व्यक्ती त्यांच्या राजकरणासमोर नतमस्तक होणार नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.