Home » आर्थिक मंदीचा सामना करतायत जगातील ‘हे’ दिग्गज देश, भारतावर होणार का परिणाम?

आर्थिक मंदीचा सामना करतायत जगातील ‘हे’ दिग्गज देश, भारतावर होणार का परिणाम?

by Team Gajawaja
0 comment
Economic Recession
Share

कोरोनाच्या महासंकटानंतर जगात विविध बदल झाल्याचे दिसून आले आहेत. कोविडच्या नंतरची स्थिती आपल्याससाठी काही आव्हाने सुद्धा घेऊन आली. त्यामुळे काही समस्यांचा आपल्याला सामना करावा लागत आहे. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्ट्सवर लक्ष दिल्यास कळते की, जागतिक अर्थव्यवस्थेवर अशी घट १९७० नंतर समोर आली आहे.काही काळापूर्वी आपण सर्वांनी पाहिले की, सर्वाधिक शक्तीशाली म्हणणारा अमेरा सुद्धा मंदीचा सामना करत आहे. चीनच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर असे ग्रहण लागले आहे की, ते हटण्याचे नावच घेत नाहीय. दुसऱ्या बाजूला युरोपी. देशांमध्ये अनिश्चिततेची परिस्थिती संपतच नाही आहे.(Economic Recession)

कोरोनापूर्वी जगभरातील देशांची आर्थिक स्थिती उत्तम होती. भारताबद्दल बोलायचे झाल्यास काही ठिकाणी अपयश आले तरीही प्रायव्हेट सेक्टरमध्ये उत्तम काम होत होते. बेरोजगारीचा आकडा सुद्धा व्यवस्थितीत होता. मात्र कोरोनानंतर सर्वांनाच त्याचा फटका बसला. नोकरदार वर्गावर तर याचा फार मोठा परिणाम झाला आणि लोकांचे रात्रीच्या रात्री हातातील काम निघून गेले.

कोविड आणि मंदीची स्थिती
स्थलांतरित मजूरांच्या पलायनामुळे खासगी क्षेत्राला फटका बसला आणि त्याचा परिणाम त्यांच्या उत्पादनावर तर पडलाच. पण त्याचसोबत आरोग्याच्या कारणामुळे सर्विस सेक्टर ही प्रभावित झाला होता. लॉकडाऊनच्या कारणामुले गाव आणि शहरात अंतर वाढल्याने जीवनावश्यक वस्तू मिळणे काही वेळेस कठीण होत गेले होते. पुरवठा सुद्धा कमी होऊ लागला आणि यामुळे ग्राहकांना हवे ते सामान मिळत नव्हते. अशातच सामानांच्या किंमती ही वाढल्या गेल्या.

Economic Recession
Economic Recession

सध्याच्या काळात जागतिक मंदी किती धोकादायक?
वर्ल्ड बँकेच्या मते २०२३ मध्ये जागतिक मंदीचा धोका सातत्याने वाढू शकतो. जगभरातील केंद्रीय बँकांकडून व्याज दरात ही वाढ केली जात आहे. तर येणारी मंदीर एक प्रमुख कारण आहे की, आर्थिक पॅकेजच्या नावावर अमाप खर्च केला जाईल. आर्थिक मोर्च्यावर अव्वल राहणारा चीन सुद्धा अत्यंत वाईटपणे प्रभावित झाला आहे.(Economic Recession)

कोरोनाच्या नियमांमुळे सप्लाईची चेन तुटली तर राहिलेले जे काही होते ते आपण युक्रेन-रशियाच्या वादाने पूर्ण केल्याचे पाहिले. गॅस ते पेट्रोल डिझेलच्या दरात खुप वाढ करण्यात आली. याच कारणास्तव फेडरल बँक ऑफ अमेरिकेने मंदीपासून तोडगा काढण्यासाठी व्याज दरात वाढ केली. त्याचसोबत फेडरल बँक ऑफ इंग्लंड आणि जापान सेंट्रल बँकने सुद्धा तेच केले. दुसऱ्या बाजूला चीनने केंद्रीय बँकांच्या दरात कपात करण्याची घोषणा केली.

हे देखील वाचा- PF खात्यावर कधीच मिळत नाही व्याज, काय आहे EPFO चा नियम

नोकऱ्यांना फटका
एका रिपोर्ट्सनुसार, कोविडपूर्वीच्या वर्षात जवळजवळ २६ कोटी नोकऱ्या गेल्या. तर पीडब्लूसी ग्लोबलच्या नुसार ५० टक्के कंपन्यानी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी केली. अमेरिकेत जून-जुलै पर्यंत जवळजवल ३५ हजार नोकऱ्या संपल्या आणि भारतात नव्या स्टार्टअप मध्ये गेल्या ६ महिन्यात जवळजवळ १० हजाराहून अधिक लोकांनी आपली नोकरी गमावली. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की,वर्ष संपता-संपता आकडेवारी ही लाखाच्या घरात पोहचेल.

जागतिक मंदीर संदर्भात अर्थतज्ञ विविध प्रकारचे दावे करत आहे. देशातील दिग्गज यावर आपली मतं व्यक्त करत आहेत की, अशा स्थितीत भारताचे काय होणार? जेव्हा या संदर्भात तपास सुरु केला तेव्हा कळले की, कोरोनाचा काळ आणि त्यानंतर नोकरीच्या संस्था यांच्यावर अत्यंत वाईट परिणाम झाला. लाखो लोकांना नोकरीवर पाणी सोडावे लागले.(Economic Recession)

जागतिक मंदीचा भारतावर काय होणार परिणाम?
भारताचा आर्थिक पाया युरोप आणि अमेरिकेसारखा नाही आहे. भारतावर मंदीचा परिणाम जास्त होणार नाही. पण टेक्सटाइल, जेम्स, ज्वेलरी आणि फार्मा सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना नोकरीच्या संधी कमी असतील. तर पर्यटन आणि हॉटेल इंडस्ट्रीला सुद्धा त्याचा फटका बसू शकतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.