कोविड-19 ची महामारी आल्यापासून जगावर एकापाठोपाठ एक अशा नवनव्या रोगांची मालिका चालू झाली आहे. आता यात पुन्हा एका रोगाची भर पडली आहे. हा आहे, इबोला नावाचा रोग. गेल्या काही वर्षापासून आफ्रिकन देशात इबोला रोग अस्तित्वात आहे. मात्र त्याला थोपवण्यात आरोग्य संघटनांना यश आले होते. पण आता या इबोला बाधित रुग्णांची संख्या पूर्व आफ्रिकेमध्ये वाढू लागली आहे. यात एका परिचारिकेलाही इबोलाची लागण झाली असून तिचा मृत्यू झाल्यानं आरोग्य संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. इबोला हा विषाणू अत्याधिक धोकादायक समजला जातो. इबोलाची लागण झालेल्यांपैकी 50 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो, असे आरोग्य संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आफ्रिकेमध्ये पसरत चाललेल्या या इबोलाचा जगभराला धोका असल्याची चिंता या संघटनांना व्यक्त केली आहे. (Africa)
कोविड-19 नंतर वेगवेगळ्या रोगांची नावे समोर येत असून त्यामध्ये अनेक सामान्य नागरिकांचा बळी पडत आहे. सध्या महाराष्ट्रातील पुण्यामध्ये जीबीएस नावाच्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा संख्या वाढत आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाल्यानं चिंता व्यक्त होत आहे. त्यातच आता अवघ्या जगावर आणखी एका विषाणूची छाया पसरण्याची भीती आहे. हा विषाणू अत्यंत वेगानं पसरत असून त्याचे नाव इबोला आहे. गेल्या काही वर्षापासून आफ्रिकेमध्ये इबोलाचे रुग्ण मिळत आहेत. मात्र त्याला अटकाव कऱण्यात काही प्रमाणात य़श आले होते. पण अचानक पूर्व आफ्रिकेतील युगांडामध्ये इबोला विषाणूचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले आहे. या विषाणूची लागण झालेल्या एका परिचारिकेचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. इबोला विषाणू खूप धोकादायक आहे, त्याचा प्रचार अतीवेगानं होतो. आणि युगांडासारख्या देशांना त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असून यासाठी जागतिक आरोग्य संघटना काही विशेषज्ञ युगांडामध्ये पाठवण्याच्या विचारात आहे. सध्या ज्या परिचारिकेचा मृत्यू झाला, तिच्या संपर्कात आलेल्या 44 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या तब्बेतीवर नजर ठेवण्यात आली आहे. (International News)
आफ्रिकन देशातून पसरणा-या रोगांमध्ये आता इबोलाची भर पडण्याची शक्यता आहे. आफ्रिकामध्ये उद्भवलेल्या काही विषाणूंमुळे जगावर साथीचे रोग आणि गंभीर आरोग्य संकटे निर्माण झाली आहेत. मंकीपॉक्स विषाणू, पिवळा ताप, चिकनगुनिया, झिका, एड्स, लस्सा हे सर्व आफ्रिकन देशांमधूनच जगभर पसरले. इबोलाचा प्रचार युगांडामध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्याची कबुली येथील आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. वास्तविक 2023 मध्ये युगांडामधून इबोला विषाणूचा प्रादुर्भाव जवळपास संपुष्ठात आल्याची माहिती आरोग्य संघटनेनं दिली होती. मात्र अचानक या रोगानं 32 वर्षीय परिचारिका मुलागो हिचा मृत्यू झाल्यानं येथील आरोग्य कर्मचा-यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून युगांडामध्ये अनेक डॉक्टर आणि परिचारिका काम करत आहेत. त्यांचेही आरोग्य धोक्यात आल्यानं चिंता व्यक्त होत आहे. सध्या युगांडाची राजधानी कंपाला येथे इबोलाचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळून येत आहेत. आता त्या भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत असून कुठलाही ताप वा थकवा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Africa)
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
kailash Mansarovar : चलो कैलास !
===============
इबोला रोगाची लक्षणेही कोरोना सारखीच आहेत. सुरुवातीला ताप येतो. त्यानंतर डोकेदुखी, स्नायू दुखी आणि पोटात मोठ्या वेदना होऊ लागतात. यामध्ये रुग्णावर उपचार झाले नाहीत तर त्याला उलट्या होऊ लागतात, डोळे लाल होऊन मूत्रपिंड आणि यकृताचे कार्य कमी होते. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागतो. यातून रुग्णाचे एक-एक अवयव निकामी होत, त्याचा वेदनामय मृत्यू होतो. असे रुग्ण आता युगांडामध्ये मिळू लागले असल्यामुळे जगभरातील आरोग्य संघटना सतर्क झाल्या आहेत. त्यातच युगांडाच्या शेजारी असलेल्या टांझानियामध्ये मारबर्ग या रोगाचा उद्रेक जाहीर केले आहे. हा मारबर्गही इबोलासारखाच आहे. आफ्रिकन देशांमध्ये येणा-या एकामागून एक रोगांमुळे आता पुन्हा सर्व जगावर महामारीचे संकंट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या तरी युगांडा आणि टांझानियामध्ये जाणा-या आणि येणा-या नगारिकांची चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (International News)
सई बने