पालेभाज्या म्हटले की, अनेक जणं नाक मुरडतात. पालेभाज्या खाणे आजच्या पिढीला अजिबातच आवडत नाही. त्यामुळे अनेकांच्या घरात पालेभाज्या बनण्याचे प्रमाण तसे कमी असते. याउलट काही घरांमध्ये पालेभाज्या मोठ्या आवडीने खाल्ल्या जातात. तर काहींना पालेभाज्या म्हणजे फक्त पालक एवढेच माहित असते. पालकची भाजी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. मात्र तुम्हाला माहित आहे. पालेभाजी विभागात मोडणारी मेथीची भाजी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे.
हिवाळा ऋतू सुरू होताच बाजारात हिरव्या भाज्या दिसू लागतात. हिरव्या भाज्यांनी जेवणात भरपूर चव तर येतेच, पण आरोग्याशी संबंधित अनेक फायदेही मिळतात. हिरव्या पालेभाज्यांची गणना सुपरफूड्समध्ये केली जाते. सौम्य कडू चवीची मेथीची भाजी देखील अतिशय उत्तम पालेभाजी आहे. आयुर्वेदानुसार मेथीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे वजन कमी करण्यापासून ते रक्तातील साखर नियंत्रणापर्यंत मदत करतात. मेथीच्या उष्णतेमुळे हिवाळ्यात शरीरात उष्णता निर्माण होऊन शरीराचे तापमान संतुलित राखण्यास मदत होते. मेथीची भाजी खाल्याने हिवाळ्यात शरीर उबदार तर राहतेच याशिवाय अनेक आजारांपासून देखील संरक्षण मिळते. मेथीमध्ये लोह, मॅग्नीज, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
मेथी भाजी खाण्याचे फायदे
त्वचा निरोगी ठेवते
मेथीच्या भाजीमध्ये अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात जे त्वचेला मुलायम आणि चमकदार तसेच सुंदर बनवण्यास मदत करतात. अशा प्रकारे हे निरोगी त्वचेसाठी औषधासारखे काम करते.
सूज कमी करते
मेथीच्या हिरव्या भाजीमध्ये दाह विरोधी गुणधर्म असतात. जे शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज कमी करण्यास मदत करतात. तथापि यावर कोणतेही संशोधन आतापर्यंत झाले नाही.
केसांच्या समस्या दूर करते
मेथीची पेस्ट केसांना लावल्यास किंवा मेथीचा आहारात समावेश केल्यास केस काळे आणि चमकदार होतात. केस गळतीवर खोबरेल तेलामध्ये मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. नंतर केसांना हलक्या हाताने मसाज करा. मेथीमुळे केसातील कोंडा दूर होतो
कोलेस्ट्रॉल कमी होतो
मेथीचे सेवन केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
मासिक पाळीत आराम
मासिक पाळीतील पोटदुखी दूर होते. आयर्न तयार करण्यासाठी मेथी फायदेशीर ठरते.
त्वचेच्या समस्या दूर हाेतात
मेथीच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, पिम्पल्स, सुरकुत्या कमी होतात. मेथीचे दाणे पाण्यात टाकून उकळा. हे पाणी चेहरा धुण्यासाठी वापरा. तसेच ताज्या मेथीच्या पानांची पेस्ट लावल्यानेही अनेक समस्या दूर होतात.
ब्लड प्रेशर नियंत्रणात
मेथीच्या हिरव्या भाजीमध्ये कांदा परतून खाल्याने ब्लडप्रेशरची समस्या दूर होते. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
हृदयाचे आरोग्य
मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन घटकामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हृदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
मेथीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम असते. जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकते आणि बदलत्या ऋतूंमध्ये आपल्याला निरोगी ठेवू शकते.
रक्तातील साखर नियंत्रित ठेवते
मेथीच्या भाजीचा आहारात समावेश केला तर ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकते. ज्यामुळे तुम्हाला टाईप 2 मधुमेहाच्या समस्येपासून वाचता येवू शकते.
शरीरात उष्णता निर्माण करते
मेथीची भाजी शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यास मदत करते. थंडीच्या दिवसात मेथीच्या भाजीचे सेवन केल्याने शरीराचे थंडीपासून संरक्षण होते आणि नैसर्गिक रित्या उबदार वाटते.
वजन कमी करते
मेथीची भाजी वजन कमी करण्यात खूप मदत करते. एका अभ्यासानुसार जर नियमितपणे मेथीच्या भाजीचे सेवन केले तर १७ टक्क्यांपर्यंत शरीरातील चरबी कमी करण्याचे काम करते.