Eating Dates in Winter : हिवाळ्यात खजूराचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. खजूराचे सेवन केल्याने हिवाळ्यात वजन वाढणे ते कोलेस्ट्रॉलची समस्या कंट्रोल करण्यास मदत होऊ शकते. याशिवाय आपल्या शरीरात रक्त पुरवठाही सुरळीत सुरू राहतो. हिवाळ्यात दररोज खजूराचे सेवन केल्याने आरोग्यासंबंधित काही आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. खजूर खाल्ल्याने शरीर आतमधून गरम राहण्यास मदत मिळते. जाणून घेऊयात हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे काय होतात याबद्दल अधिक….
एनर्जी बूस्टर
हिवाळ्यात खजूराचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. खरंतर खजूरात ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज गुणधर्म असतात. जे तुमच्या शरिराला इंस्टेट एनर्जी देऊ शकतात. यामुळेच हिवाळ्यात शरिराला उर्जा मिळावी म्हणून खजूराचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
हिवाळ्यात खजूराचे सेवन केल्याने शरिराला भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स मिळू शकतात. यामुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. याशिवाय काही आजारांपासून दूर राहू शकता. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही खजूराचे सेवन करू शकता.
पचनक्रिया सुधारते
खजूरात असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. दररोज खजूराचे सेवन केल्यासने शौचास होणारी समस्याही दूर होते. हिवाळ्यात बहुतांशजणांना पचनासंबंधित समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत खजूराचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरिरातील पचनक्रियाही सुधारली जाऊ शकते.
शरीर आतमधून गरम राहते
हिवाळ्यात शरीर आतमधून गरम राहण्यासाठी खजूराचे सेवन करणे बेस्ट पर्याय आहे. यामुळे शरिरातील ब्लड सर्कुलेशन उत्तम होत शरीर आतमधून गरम राहाते. खजूरामध्ये लोहाचा उत्तम स्रोत भरपूर प्रमाणात असल्याने शरीर गरम राहण्यास मदत होते.
अशा पद्धतीने करा खजूराचे सेवन
पदार्थांच्या गोड चवीसाठी तुम्ही खजूराचा वापर करू शकता. जसे की, केक, बनाना शेक. यावेळी साखरेऐवजी खजूराचा वापर करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. (Eating Dates in Winter)
याशिवाय खजूर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन करावे. यामुळे लठ्ठपणाची समस्या नियंत्रणात राहू शकते. तसेच बहुतांशजण हिवाळ्यात दूधात खजूर उकळवून सेवन करतात. यामुळे शरिराला उर्जा मिळते. याशिवाय रात्री झोप न येण्याची समस्याही यामुळे दूर होऊ शकते.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)