Home » Health : हिवाळ्यातील सुपरफूड असलेल्या डिंकाच्या लाडूचे ‘हे’ आहेत आरोग्यवर्धक फायदे

Health : हिवाळ्यातील सुपरफूड असलेल्या डिंकाच्या लाडूचे ‘हे’ आहेत आरोग्यवर्धक फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

हिवाळा सुरु झाला की लगेच घरात हटके पदार्थांची रेलचेल सुरु होते. थंडीचा ऋतू असलेला हा हिवाळा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला आणि फायदेशीर आहे. या ऋतूमध्ये जर आपण उत्तम, सकस, पौष्टिक पदार्थ खाल्ले तर वर्षभर आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो असे म्हटले जाते. यासाठी या ऋतूमध्ये उत्तम चवीचे आणि सकस पदार्थ केले जातात. यातलाच एक अतिशय चविष्ट, प्रसिद्ध, आरोग्यवर्धक आणि लोकप्रिय पदार्थ म्हणजे हिवाळ्यातील डिंकाचे लाडू. (Winter Health)

हिवाळ्याची चाहूल लागली भारतातील घरांमध्ये महिलांची डिंकाचे लाडू बनवण्याची तयारी सुरु होते. हिवाळ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये हे लाडू बनतात आणि आवडीने खाल्ले देखील जातात. अनेक प्रकारचे ड्रायफ्रुट्स, डिंक, गुळ असे पौष्टिक घटक एकत्र करुन डिंकाचे लाडू तयार केले जातात. हिवाळ्यासोबतच महिलांना त्यांच्या प्रसूतीनंतर देखील हे लाडू खाण्यास दिले जातात. थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या काळात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. म्हणूनच हे डिंकाचे लाडू हिवाळ्यात करण्याची पद्धत सुरु झाली असावी. हिवाळ्यात सर्वच घरांमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या या डिंकाच्या लाडूचे कोणते आरोग्यवर्धक फायदे चला जाणून घेऊया. (Marathi News)

* डिंक हे गरम असतात म्हणून डिंक हिवाळ्यात शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यास मदत करते. तूप, पीठ आणि काजू यांच्या मिश्रणाने बनवले जाणारे डिंकाचे लाडू उर्जेचा चांगला स्रोत आहेत, ज्यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते. (Marathi)

* डिंक कॅल्शियमने समृद्ध आहे , जे हाडांची घनता वाढविण्यास आणि त्यांना मजबूत करण्यास मदत करते. तसेच तुम्ही डिंकाच्या लाडूचे सेवन केल्यास  सांध्यातील लुब्रिकेशन सुधारण्यास आणि सांधेदुखी आणि संधिवात कमी करण्यास देखील मदत करते. (Top Trending Headline)

* बाळाच्या जन्मानंतर स्त्रीसाठी प्रथिनांची गरज वाढते. कारण स्तनपानावर लक्ष केंद्रित केले जाते. डिंकाच्या लाडूमध्ये प्रथिने आणि निरोगी चरबीचे प्रमाण चांगले असते. डिंकाच्या लाडूचे अगदी सहजपणे सेवन केले जाऊ शकते. (Top Stories)

* डिंकाचे लाडू हे नुकतेच प्रसृती झालेल्या आईसाठी खूप फायदेशीर असते. पारंपारिकपणे डिंकाचे लाडू प्रसूतीनंतर त्या महिलेला खायला दिले जातात. हे लाडू आईच्या शरीराला शक्ती आणि आवश्यक पोषण प्रदान करतात आणि स्तनपान सुधारतात. (Todays Marathi Headline)

Health

* नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांना प्रसूतीनंतर डिंकाचे लाडू खाण्यास सांगितले जाते. बाळाला जन्म दिल्यांनतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी ह्या लाडवांमधून आईला आवश्यक ती पोषण तत्वे मिळत असतात. त्यामुळे या काळात डिंकाच्या लाडू खाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

* डिंक आणि काजूमध्ये असलेले पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला आणि इतर हंगामी आजार टाळता येतात. (Top Marathi Headline)

* डिंकचे लाडू बद्धकोष्ठता असलेल्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते आणि हे लाडू खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. मात्र एक लक्षात ठेवा दोनपेक्षा जास्त लाडू सेवन केल्याने पोट खराब होऊ शकते. कारण जास्त खाल्ल्याने पचन करणे कठीण होते.

* डिंकाचे लाडूमध्ये असलेले तूप आणि काजू हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई प्रदान करतात, जे हिवाळ्यात त्वचेला कोरडेपणापासून वाचवतात आणि केसांना निरोगी ठेवतात. डिंकात जास्त फॅट्स आणि कॅलरिज् असतात. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो. डिंक लाडू शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात आणि हे लाडू खाल्ल्याने शरीराचा अशक्तपणा कायमचा जातो. म्हणून ज्या स्त्रियांना अशक्तपणाचा त्रास असेल अश्यांनी दररोज डिंक लाडू खावे. (Marathi Latest News)

डिंकाचे लाडू बनवण्याची कृती
साहित्य
डिंक – १०० ग्रॅम, गव्हाचे पीठ – २५० ग्रॅम, साजूक तूप – सुमारे ३०० ग्रॅम, पिठीसाखर किंवा गूळ – २५० ग्रॅम,
बदाम, काजू – १०० ग्रॅम, खोबऱ्याचा किस- ५० ग्रॅम, वेलची पावडर चवीपुरती

=========

Winter : शरीराला उबदार ठेवणाऱ्या ‘या’ चविष्ट सूप रेसिपी नक्की तरी करा

Winter Dite : हिवाळ्यात चणा आणि गूळ एकत्र खाणे किती फायदेशीर, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

=========

कृती
प्रथम, एका पॅनमध्ये सुमारे २०० ग्रॅम तूप गरम करा. आता त्यात डिंक थोड्या थोड्या प्रमाणत टाका. जेव्हा डिंक फुगून हलका सोनेरी रंगाचा होईल तेव्हा तो काढून प्लेटमध्ये ठेवा. थंड झाल्यावर लाटण्याच्या साहाय्याने किंवा वाटीने बारीक करा. आता त्याच पॅनमध्ये उरलेले १०० ग्रॅम तूप टाका. नंतर गव्हाचे पीठ त्या तुपात टाकून मंद आचेवर भाजण्यास सुरुवात करा. पीठ हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत आणि चांगला वास येईपर्यंत सतत परतवत राहा. आता भाजलेले पीठ एका मोठ्या प्लेट किंवा भांड्यात काढा. नंतर, एका पॅनमध्ये चिरलेले बदाम आणि काजू हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. (Top Trending News)

नारळाचा किस देखील हलके भाजून घ्या. आता भाजलेले पीठ, कुस्करलेला डिंक, भाजलेले काजू आणि वेलची पूड हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण थोडे गरम झाल्यावर त्यात पिठीसाखर टाका आणि नीट मिक्स करा. तुम्ही यात गूळ देखील टाकू शकता. लक्षात ठेवा की जर मिश्रण खूप गरम असेल तर साखर वितळेल. तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोल लाडू बनवा. जर तुम्हाला मिश्रण कोरडे वाटले आणि लाडू तयार होत नसतील तर तुम्ही एक किंवा दोन चमचे गरम तूप घालून ते मिक्स करू शकता. चविष्ट, पौष्टिक डिंकाचे लाडू तयार. (Social News)

(टीप : ही माहिती केवळ वाचनासाठी आहे. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.