Home » Health : रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने आरोग्यास होतात ‘हे’ मोठे फायदे

Health : रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने आरोग्यास होतात ‘हे’ मोठे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Health
Share

आपल्या सगळ्यांच्याच स्वयंपाक घरात सहज सापडणारी एक गोष्ट म्हणजे, कढीपत्ता. अगदी पोहे, उपम्यापासून ते आमटी, डाळी, भाज्यांपर्यंत सर्वच पदार्थांमध्ये कढीपत्ता सर्वात महत्वाचा असतो. कढीपत्ता टाकल्यानंतर पदार्थाला एक वेगळीच आणि मस्त चव येते. कढीपत्ता म्हणजे आपल्या जेवणातला राजा. मात्र आपल्या जेवणात कढीपत्ता आल्यानंतर आपण तो बाहेर काढून ठेवतो. कढीपत्ता जास्तकरून कोणीही खात नाही. मात्र हा जेवणातून बाहेर काढला जाणारा कढीपत्ता आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. (Marathi)

कोथिंबीरीसोबत फ्री येणाऱ्या या कढीपत्त्याची खरी किंमत आपल्याला माहीतच नाही. फ्री मिळणाऱ्या गोष्टीला तसेपण आपण जास्त महत्त्व देत नाही. पण कढीपत्ता याला अपवाद आहे. कढीपत्ता खाण्याचे अनेक फायदे असले तरी उपाशी पोटी कढीपत्ता खाण्याने आपले आरोग्य निरोगी राहण्यास खूपच महत्त्व होते. उपाशी पोटी कढीपत्ता खाल्ल्याने कोणते फायदे होतात चला जाणून घेऊया. (Curry Leaves)

शरीराला थंडावा देतो
कढीपत्ता हा थंड पदार्थ आहे. उन्हाळ्यात याचं सेवन केलं तर शरीर कूल राहण्यास मदत होते. एवढंच नव्हे तर पचनक्रिया देखील सुधारते. रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केले तर गॅस, ऍसिडिटी, पचनाच्या सर्व समस्या दूर होतात. (Marathi)

हृदयाचे आरोग्य सुधारते
कढीपत्त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आणि फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल यामुळे कमी होते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. (Latest Marathi HEadline)

त्वचा आणि केसांसाठी लाभदायक
कढीपत्त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचा आणि केसांना निरोगी बनवतात. सकाळी कढीपत्त्याचे सेवन केल्याने त्वचा सुधारते आणि केस गळणे कमी होते. हे केस नैसर्गिकरित्या काळे आणि दाट होण्यासदेखील मदत करते. कढीपत्त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. दैनंदिन आहारात याचा समावेश करून शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवता येते. (Todays Marathi HEadline)

Health

वजन कमी करण्यास उपयुक्त
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, कढीपत्ता तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासोबतच कढीपत्ता कोलेस्ट्रॉलही नियंत्रित ठेवतो. यासाठी रोज सकाळी तुळशीच्या पानांसोबत कढीपत्ता खा. (Marathi NEws)

रक्तातील साखरेवर नियंत्रणासाठी उपयुक्त
कढीपत्त्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ग्लुकोजचे शोषण कमी करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते. (Top Marathi Headline)

डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक
दृष्टी सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्वाचे आहे. कढीपत्त्यात विटामिन ए मुबलक प्रमाणात असते. दृष्टी सुधारण्यास मदत होते. कढीपत्त्याच्या सेवनाने मोतीबिंदूपासून आराम मिळतो. (Social Updates)

सर्दी आणि खोकल्यामध्ये लाभदायक
सर्दी, खोकला अशा समस्या आहेत. कफ जास्त असतो. छातीत रक्तसंचय होत असेल आणि सायनुसायटिसची समस्या कायम राहिल्यास कढीपत्ता खूप आराम देतो. छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्याचे काम करते. कॅम्पफेरॉल, व्हिटॅमिन सी आणि ए चे संयुग, त्यात दाहक-विरोधी घटक असतात. हे छातीला आराम देण्याचे काम करते. (Latest Marathi News)

अपचनामध्ये फायदेशीर
कढीपत्त्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रिकाम्या पोटी सकाळी कढीपत्ता खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठते सारख्या समस्यांपासून आराम मिळतो कढीपत्ता खाल्ल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. (Top Trending Headline)

=======

Hair Care : कोणत्या प्रकारच्या केसांना कोणते तेल लावावे?

Beauty Tips : फूड खाताना लिपस्टिक परसरणार नाही! फॉलो करा या स्मार्ट टिप्स

=======

मॉर्निंग सिकनेस
अनेकांना मॉर्निंग सिकनेसचा मोठा त्रास होतो. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केल्याने मॉर्निंग सिकनेसला ‘गुडबाय’ म्हणू शकता. यासाठी लिंबाचा रस आणि कढीपत्त्याच्या रसात थोडीशी साखर मिसळून या मिश्रणाचे सेवन करावे. उलट्या, मळमळ यासारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो. (Top Stories)

निरोगी यकृतासाठी उपयुक्त
रोज रिकाम्या पोटी कढीपत्ता चावून खाल्ल्याने यकृताचे आरोग्य चांगले राहते. कढीपत्ता यकृताचे कार्य सुधारण्यासदेखील मदत करतो. कढीपत्ता सिरोसिसचा धोका कमी करून यकृत मजबूत आणि निरोगी बनवण्याचे काम करतो. (Social News)

(टीप : कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.