रोजच्या आहारात काही डाळी, कडधान्य नियमीत सेवन केल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. पचनशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारशक्तही वाढते. या सर्व डाळी आणि कडधान्यात पहिल्या क्रमांकावर हिरव्या मुगाचा समावेश होतो. हिरव्या रंगाचे मूग (mung bean) रोज मुठभर खाल्ले तर अनेक रोगांवर मात करता येते. हिरव्या रंगाच्या मुगासोबत मुगाची डाळही (mung bean) तेवढीच पोषक आहे. या सर्वांचा आहारात रोज समावेश केला तर आश्चर्यकारक असे फायदे आपल्या शरीराला मिळतात. हिरव्या मूग डाळीमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. त्याच्या नियमित सेवनानं मधुमेहासारख्या रोगालाही अटकाव करण्यात येतो.

आरोग्यदायी जीवनासाठी भाज्यांसोबत डाळींचे सेवन करणे आवश्यक असते. भारतीय जेवणात हिरवे मूग (mung bean), उडीद, मसूर, चणा आदी डाळींचा नित्यनियमानं समावेश असतो. या सर्व डाळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. पण यातही सर्वात हिरवे मूग आणि हिरव्या मुगाची डाळ सर्वात चांगली मानली जाते. हिरवे मूग आणि त्याच्या डाळीमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. मधुमेहापासून ते रक्तदाबापर्यंत अनेक आजारांपासून या मुगाच्या नियमीत सेवनानं फायदे होतात. हिरव्या मुगाची डाळ (mung bean) मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते. यामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहाण्यास मदत होते. मुगाचे सेवन केल्यामुळे शरीरात इन्सुलीन लेव्हल वाढण्यात मदत मिळते.
त्याचप्रमाणे उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत असेल तर त्यामध्येही हिरव्या मुगाचेसेवन फायदेशीर ठरते. रक्तदाब नियंत्रीत रहाण्यास मदत होते.सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. अशावेळी भूक मंदावते. उष्म्याचा शरीराला त्रास होतो. शरीरावर पुरळ येते. काहीजणांना मूत्ररोगाचाही त्रास होतो. या सर्वांवर मूग (mung bean) हे खूप फायदेशीर ठरतात. रोज मुठभर मोड आलेले मूग खाल्यास शरीराला आवश्यक असे घटक मिळतात, शिवाय उन्हाळ्याचा होणारा त्रासही कमी होतो. उन्हाळ्यात भूक मंदावते, अशावेळी भरपूर पाणी असलेली मुगाची पेज आरोग्यदायी ठरते. शरीरातील पाण्याची गरज पूर्ण होते, तसेच शरीराला योग्य पोषणही मिळते. मूग हे फायबर (mung bean), प्रथिने, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक घटकांनी परिपूर्ण असतात. त्यामुळेच ज्यांना पोटाचे आजार आहेत, ज्यांची पचनशक्ती कमी आहेत, अशांना या मुगाच्या डाळीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मूग डाळ (mung bean) खाल्ल्याने अनेक आजारांशी लढण्यास मदत होते.
मुगामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे तसेच वेगवेगळी व्हिटॅमिन आढळतात. यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई यांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअमही मूगात भरपूर प्रमाणात आढळतात. मुगाचे सेवन केल्यास शरीरात कॅलरीज मोठ्या प्रमाणात वाढत नाहीत. मोड आलेले मूग (mung bean) हे पचनास हलके समजले जातात. त्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यांना बद्धकोष्टतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी मूग हे एखाद्या औषधासारखे ठरतात. नियमित मूगाचे सेवन केले तर बद्धकोष्टतेचा त्रास कमी होतो.
=======
हे देखील वाचा : लालचुटक लिचीचे फायदे…
=======
दररोज मूग सेवन (mung bean) करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे वेगवेगळ्या आजारापासून शरीराचा बचाव होतो. मूगामध्ये सायट्रोजन असतात जे शरीरात कोलेजन आणि एलास्टिन कायम ठेवतात. याने चेहऱ्यावर वय दिसून येत नाही. चेहरा कायम तजेलदार दिसतो. तसेच सुरकुत्या कमी होतात. मोड आलेल्या मूगात फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे पोटाने विकार, पोटदुखणे या समस्या मूगाच्या सेवनानं कमी होतात. मूगाची डाळ आणि मोड आलेले मूग नियमीत सेनव केल्यास शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. शरीरातील विषारी पदार्थ-द्रव्य बाहेर टाकले जातात. या सर्वांचा फायदा पचनक्रीया सुधारण्यासाठी होतो. अन्न व्यवस्थित पचले जाते. परिणामी आरोग्याच्या समस्या होत नाहीत. अन्नाचे पचन निट झाले नाही तर अनेकवेळा त्यामुळे अंगदुखीचाही त्रास होतो. असा त्रासही मूगाच्या सेवनानं कमी होतो. यामुळेच रोज मुठभर मूग खाल्यास त्याचा खूप फायदा आरोग्याला होतो.
सई बने