Home » Home : ‘या’ सोप्या उपायांनी घर करा सुगंधित

Home : ‘या’ सोप्या उपायांनी घर करा सुगंधित

by Jyotsna Kulkarni
0 comment
Home
Share

कोणालाही जर आपण विचारले की, या जगातील तुमचे आवडते ठिकाण कोणते? तर जवळपास सर्वांचे एकच उत्तर असेल की, घर. प्रत्येक व्यक्तीसाठी तिचे घर हे जगातील सर्वात बेस्ट आणि आवडते ठिकाण असते. आपण सर्वच जेव्हा आपल्या घरी जातो तेव्हा आपल्याला एक वेगळाच आनंद एक वेगळाच सुकून, शांतता मिळते. प्रत्येकासाठी आपले घर हे हक्काची जागा असते. जेव्हा आपण थकून भागून आपल्या घरात जातो तेव्हा जे आत्मिक समाधान मिळते ते शब्दात व्यक्त करता येत नाही. (Marathi)

आपले घर छोटे असो किंवा मोठे घर कायम नीटनेटके, पद्धतीशीर, स्वच्छ असावे असा आपण कायम प्रयत्न करत असतो. घरात कोणीही कधीही आले तरी त्यांना घरात आल्यानंतर आनंद आणि समाधान मिळाले पाहिजे. अशाच स्वच्छ आणि नीटनेटक्या घरात लक्ष्मी वास करते असे म्हटले जाते. यासोबतच सर्वांना आनंद देखील मिळतो. यासाठीच अनेक लोकं आपल्या घरात कायम फ्रेश वाटण्यासाठी घर सुंगंधीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

घरात जर मंद सुवास येत असेल तर घरातील वातावरण सकारात्मक तर होतेच शिवाय घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समाधान मिळते. सणवार म्हटलं की घरातली स्वच्छता होते पण घरात असलेले वास घालवण्यासाठी विविध उपाय केले जातात. घर सुगंधित ठेवण्यासाठी अनेक घरांमध्ये रूम फ्रेशनरचा वापर केला जातो. पण हे फ्रेशनर जास्त काळ घर सुगंधित ठेऊ शकत नाही. अनेकांना तर रूम फ्रेशनरची ऍलर्जी देखील असते. मग अशा वेळस काय करावे? घर कायम सुगंधित कसे ठेवावे? जाणून घेऊया. (Home)

> घरच्याघरी रुम फ्रेशनर तयार करण्यासाठी कोणतेही सेंटेड ऑइल, अर्धा कप व्हिनेगर आणि दोन कप पाणी घ्यावे. एका भांड्यात पाणी व्हिनेगर आइ सेंटेड ऑइल एकत्र करावे. हे मिश्रण एका स्प्रे बाॅटलमध्ये भरावं. सर्व खोल्यांमध्ये हा स्प्रे फवारला की घरात छान मंद सुवास दरवळतो.

> स्वयंपाक घरातला वास घालवण्यासठी कापूर वापरावा. यासाठी घरातले जुने न वापरले जाणारे कोणतेही भांडे घ्यावे. ते गरम करावे. गरम भांड्यात कापराच्या २ ते ३ वड्या घालाव्यात. कापराचं हे भांडं स्वयंपाकघरात ठेवले तरी कापुराचा सुगंध घरभर दरवळतो.

> जर तुम्हाला सौम्य सुगंध आवडत असेल तर तुम्ही पॅशन फ्लॉवर प्लांट विकत घ्यावा. पॅशन फ्लॉवर हे तारेच्या आकाराच्या फुलासारखे दिसते. जर तुम्हाला घर सुगंधित ठेवायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही रूम फ्रेशनरची गरज नसेल, यासाठी तुम्ही पॅशन फ्लॉवरचा वापर करू शकता. याशिवाय बाजारातून पॅशन फ्लॉवर विकत घेण्याऐवजी तुम्ही ते घरीही वाढवू शकता. (Todays Marathi Haedline)

Home

> स्वयंपाक घरातील काही गोष्टींचा वापर करून देखील घर सुवासिक ठेवले जाऊ शकते. यासाठी लवंग, दालचिनी आणि वेलची घेऊन ३ कप पाणी एका भांड्यात पाणी घ्यावे. त्यात हे मसाले घालावेत. मसाले घातलेले हे पाणी १५-२० मिनिटं उकळून घ्यावे. पाणी गार झाल्यावर ते गाळून घ्या आणि स्प्रे बाॅटलमध्ये भरावे. घर सुगंधित ठेवण्याचा हा सोपा पर्याय आहे. (Top Marathi News)

> लिंबू, संत्री, मोसंबी या सालांचा उपयोग रुम फ्रेशनर तयार करण्यासाठी करता येतो. यासाठी लिंबू/ संत्री/ मोसंबी/ एकत्रित सालं घ्यावी/ ती पाण्यामध्ये घालून पाणी १० मिनिटं उकळावं. पाणी उकळलं की गॅस बंद करावा. पाणी थंड झाल्यावर ते स्प्रे बाॅटलमध्ये भरावं. हे पाणी घरातल्या सर्व खोल्यांमध्ये फवारलं की मन फ्रेश करणारा सुवास घरभर दरवळतो.

> घराचे सौंदर्य वाढवण्यासोबतच घराला सुगंधी बनवण्यासाठी जास्मीनच्या फुलाचाही वापर करता येतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ते घरी सहज वाढवू शकता. जास्मीन फुल वाढवण्यासाठी तुम्हाला फक्त थोडासा सूर्यप्रकाश आणि मातीची गरज आहे. चमेलीचे फूल तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा सुगंधित करेल. (Latest Marathi Headline)

> घर सुगंधित करण्याचा सोपा पर्याय म्हणजे घरात अगरबत्ती लावणं. घराच्या कोपऱ्यात अगरबत्ती लावावी. घर मोठं असल्यास दोन तीन कोपऱ्यात अगरबत्ती लावावी किंवा धूप लावावा. या उपायानं घर सुगंधित राहाते.

> घराच्या विविध कोपऱ्यांमध्ये तुम्ही सेंटेड मेणबत्त्या लावून ठेऊ शकता. या मेणबत्त्या घरात मंद सुगंध पसरवतात. बाजारामध्ये विविध वासाच्या बजेट फ्रेंडली मेणबत्त्या सहज उपलब्ध होतात. (Top Stories)

> घरात ताजी सुगंधी फुलं ठेवल्यास घरात फुलांचा मंद सुगंध दरवळत राहातो. मोगऱ्याची किंवा निशिगंधाची फुलं आणून ठेवल्यास घर सुगंधित राहाते.

=======

Indian Army : भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करून देणारा ‘आर्मी डे’

=======

> इसेन्शियल ऑइलचा उपयोग करुनही घर सुगंधित ठेवता येते. यासाठी १ कप पाण्यात थोडंसे इसेन्शियल ऑइल घालून द्रावण तयार करावे. हे द्रावण एका स्प्रे बाॅटलमध्ये भरुन ते घरात फवारल्यास घरातला विशिष्ट प्रकारचा वास निघून जातो.

> जर तुम्हाला तुमचे घर नैसर्गिक पद्धतीने सुगंधित करायचे असेल तर तुम्ही काही घरातील सुवासिक रोपे तुमच्या घराचा एक भाग बनवा. रोझमेरी वनस्पती यासाठी सर्वोत्तम मानली जाते. रोझमेरी प्लांट हे सुईसारखे दिसते परंतु घरगुती रोपासाठी हा एक चांगला पर्याय आहे. रोझमेरी वनस्पतीचा सुगंध लिंबूवर्गीय सारखा असतो. रोझमेरी प्लांट तुम्हाला बाजारात सहज मिळेल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.