Home » Pigeon : घराच्या बाल्कनीतून कबुतरांना घालवायचे मग करा ‘हे’ सोपे उपाय

Pigeon : घराच्या बाल्कनीतून कबुतरांना घालवायचे मग करा ‘हे’ सोपे उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Pigeon
Share

सध्या कबुतरांचा मुद्दा खूपच गरम आहे. मुंबईतल्या दादर भागात असलेल्या कबुतरखान्यवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार हा कबुतरखाना काढून टाकला जात आहे. मात्र अशातच जैन समाजाने यावर आक्षेप घेत कबुतरखाना काढण्यास विरोध केला आहे. कबुतरांमुळे मनुष्याला अनेक प्रकारे त्रास होतो, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हा कबुतरखाना काढण्यास सांगितले आहे. कबुतरांचा त्रास हा माणसाच्या आरोग्याला नक्कीच होतो, मात्र यासोबतच कबुतरांमुळे घरं, घरांची बाल्कनी, टेरेस देखील खराब होतात. कबुतरांचा वावर सर्वत्र असतो. काळे पांढरे दिसणारे कबुतरं कायम आपले लक्ष वेधून घेतात. (Marathi)

अनेकदा कबुतरं बाल्कनीत येतात आणि घाण करतात. त्यामुळे बाल्कनीत बसावंसं वाटत नाही. कबुतरांना कितीही हाकलून लावले तरी ते परत येतात आणि पुन्हा त्याच जागी बसतात. कबुतरं घरांच्या आजूबाजूचा परिसर खूपच खराब करतात. यामुळे घाण तर होते शिवाय अनेक त्रास देखील होतात. अनेक उपाय करून देखील हे कबुतरं घराच्या परिसरातून जात नसतील तर आज आम्ही तुम्हाला या कबुतरांना घालवण्यासाठी सोपे आणि फायदेशीर उपाय सांगणार आहोत. (Marathi News)

डिंक किंवा मध
कबुतरांना हाकलण्यासाठी डिंक किंवा मध देखील वापरू शकता. बाल्कनीमध्ये विविध ठिकाणी डिंक चांगले पसरवा, यामुळे कबुतरांना बाल्कनीत बसण्यापासून रोखता येईल, कारण त्यांना चिकट जागांवर बसणे आवडत नाही. (Todays Marathi News)

वाईन आणि दालचिनी
एका भांड्यात पाणी, वाइन आणि दालचिनी पावडर मिसळून दिवसाच्या सुरुवातीला हे मिश्रण बाल्कनीमध्ये शिंपडावे. कबुतरांनी तळ ठोकलेल्या ठिकाणी जास्त फवारणी करा. त्याच्या तीव्र वासामुळे कबुतरे इथे बसणार नाहीत. (Trending Headline)

Pigeon

बर्ड स्पाइक्स
कबुतरांना बाल्कनीतून पळवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे एसी कॅबिनेट किंवा बाल्कनीच्या रेलिंगवर बर्ड स्पाइक्स बसवणे. हे स्पाइक्स कबुतरांना त्यावर बसण्यापासून रोखतात, ज्यामुळे ते हळूहळू या ठिकाणी येणे बंद करतात.(Marathi Headline)

व्हीनेगरचा वापर
तुम्हाला तुमच्या बाल्कनीतून कबुतरांना काढून टाकायचे असेल, तर एका भांड्यात दोन चमचे व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांचे द्रावण तयार करा आणि ते स्प्रे बाटलीत भरा. आणि हे द्रावण बाल्कनीत चांगले फवारणी करा, कबुतरे त्याच्या वासाने पळून जातील आणि कधीही परत येणार नाहीत. (Marathi Latest Headline)

तिखट आणि मिरपूड
काळी मिरी पावडर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागेल. तुम्ही पाण्यात लाल मिरची पावडर मिसळूनही फवारणी करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, दोन्ही मिसळा आणि बाल्कनीमध्ये शिंपडा. यामुळे कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून रोखले जाईल. (Top Trending News)

==========

 Health : जेवणानंतर अंघोळ करणे योग्य की अयोग्य?

==========

विंड चाईम्स
तुमच्या घराच्या बाल्कनीतून कबुतरांना हाकलण्यासाठी विंड चाईम्स देखील लावू शकता. कबुतरांना विंड चाइमच्या आवाजाची भीती वाटते, म्हणून वाऱ्यामुळे विंड चाईम्स आवाज करत राहील जेणेकरून कबुतरे तुमच्या बाल्कनीत येऊन बसणार नाहीत. (Top News)

काटेरी झाडे
घराच्या बाल्कनीमध्ये किंवा कबुतर राहत असलेल्या ठिकणी कॅक्टस किंवा इतर काटेरी वनस्पती लावून ठेवावी. या वनस्पतींना कबुतर घाबरतात. काटेरी वनस्पतींजवळ कबुतर बसणे टाळतात. तसेच कबुतरांना चमकदार आणि काटेरी वस्तूंची खूप जास्त भीती वाटते. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.