Home » Leukorrhea : व्हाईट डिस्चार्ज होतो…? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Leukorrhea : व्हाईट डिस्चार्ज होतो…? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

by Jyotsna Kulkarni
0 comment
Leukorrhea
Share

महिलांना आरोग्याच्या विविध लहान मोठ्या समस्यांना सतत सामोरे जावे लागत असते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांच्या शरीरामध्ये मोठे आणि महत्वाचे बदल घडत असतात. या बदलांचे परिणाम त्यांना कधी कधी काही त्रासांमधून जाणवत असतात. स्त्रियांच्या शरीरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचे सततचे बदलणारे हार्मोन्सचे संतुलन. या असंतुलनामुळे त्यांना कायमच आरोग्याच्या छोट्या छोट्या कुरघोडी सतावत असतात. यातलीच एक अतिशय सामान्य मात्र तितकीच जरा गंभीर समस्या म्हणजे अंगावरून पांढरे पाणी जाणे. (Leukorrhea)

प्रत्येक महिलेला कधी ना कधी हा त्रास होतोच. काही महिलांना दोन पाळीचादरम्यान हा त्रास होतो. याला ल्युकोरिया असेही म्हणतात. स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्ज तसा सामान्य आहे. जो मासिक पाळीपूर्वी आणि ओव्हुलेशनच्या वेळी जास्त असतो. हे गर्भधारणा, प्रायव्हेट पार्टमध्ये संसर्ग किंवा हार्मोन्सच्या अनियमिततेमुळे देखील होऊ शकते. प्रत्येक महिलेला होणारा व्हाईट डिस्चार्ज हा गंभीर असतो असे नाही. मात्र याला देखील काही निकष दिले आहेत. (Marathi Top News)

Leukorrhea

व्हाईट डिस्चार्ज ही जरी एक सामान्य बाब असली तरी, पण व्हाईट डिस्चार्जच्या वेळी बर्‍याच वेळा खाज सुटणे, जाड आणि पिवळ्या, हिरव्या रंगाचा स्राव होणे, जास्त दुर्गंधी येणे आदी त्रास सतत अनेक दिवस होत असल्यास याकडे चुकूनही दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. या व्हाईट डिस्चार्जकडे दुर्लक्ष केल्यास कमकुवतपणा, थकवा आणि इतर स्त्रीसंबंधित आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. (Marathi Latest News)

वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेऊन तुम्ही व्हाईट डिस्चार्ज अथवा ल्युकोरियाची समस्या टाळू शकता. यासोबतच उत्तम, सकस आहार आणि योग्य पदार्थांचे सेवन देखील हा त्रास टाळण्यास मदत करते. व्हाईट डिस्चार्जचा त्रास होऊ नये यासाठी महिलांनी त्यांच्या आहारामध्ये काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केलाच पाहिजे. मग या त्रासापासून वाचण्यासाठी कोणते पदार्थ खाण्यास प्राधान्य दिले पाहिजे घ्या जाणून.(Marathi Trending News)

नारळाचे पाणी
नारळाचे पाणी नैसर्गिक डिटॉक्सिफायर असून, त्याच्या सेवनाने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण संतुलित होते. जर तुम्हाला सतत व्हाईट डिस्चार्ज जाणवत असेल, तर नियमित नारळाचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि स्राव नियंत्रित होतो. शिवाय नारळ पाण्यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संसर्ग रोखण्यात सुद्धा मदत करतात. (Marathi)

Leukorrhea

गाजर
गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे संप्रेरकांचे संतुलन राखून गर्भाशयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. गाजराचे सेवन केल्यास अनावश्यक स्राव नियंत्रित होण्यास मदत मिळते आणि शरीरातील पोषणतत्त्वांची कमतरता भरून निघते.

Leukorrhea

अंजीर
व्हाईट डिस्चार्जच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी अंजीर फार उपयुक्त आहे. यासाठी ४ अंजीर चांगले धुऊन आणि रात्री भिजवून ठेवावे आणि सकाळी रिकाम्या पोटी ते खावे. यानंतर पाणी प्यावे. हा उपाय नियमितपणं केल्यास एका महिन्यात पांढर्‍या पाण्याच्या स्त्रावाची समस्या दूर होईल. (Marathi Top Trending News)

Leukorrhea

आवळा
​आवळा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास उत्तम आहे. शिवाय रक्तशुद्धीकरण होण्यासाठी देखील आवळा फायदेशीर आहे. आवळा व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स समृद्ध असल्याने, त्याचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गजन्य व्हाईट डिस्चार्ज कमी होतो. तुम्ही आवळ्याचा रस, चूर्ण किंवा लोणच्याच्या स्वरूपात देखील याचा आहारात समावेश करू शकता. आवळा पावडरमध्ये मध मिसळा आणि दिवसातून २ वेळा घ्या. याचं नियमित सेवन केल्यानं पांढरा स्त्राव कमी होईल. (Women Health)

Leukorrhea

मेथी दाणे
​मेथीमध्ये शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोन संतुलित ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे व्हाईट डिस्चार्जमुळे निर्माण होणारी अस्वस्थता आणि अशक्तपणा दूर होतो. एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून त्याचा काढा बनवून प्यायल्याने मासिक पाळीच्या दरम्यान होणारा स्राव नियंत्रित होतो.

Leukorrhea

==========

हे देखील वाचा : तणावापासून दूर राहण्यासाठी करा हे 5 उपाय, नेहमीच रहाल आनंदित

==========

केळी
​केळीचे नियमित सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला अनेक चमत्कारिक फायदे होतात. या केळीमध्ये नैसर्गिकरित्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा मोठा गुणधर्म आहे. शिवाय तिचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते. महिलांमध्ये बॅक्टेरिया किंवा संसर्गामुळे होणारा व्हाईट डिस्चार्ज केळी खाल्ल्याने कमी होऊ शकतो. रोज सकाळी उपाशीपोटी एक केळी खाल्ल्यास अनावश्यक स्राव नियंत्रित होतो.

Leukorrhea

(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.