नेपाळ मध्ये नुकत्याच आलेल्या भुकंपाचा परिणाम हा भारतावर झाला आहे. यामुळे उत्तराखंड मधील पिथौरागढं येथे सुद्धा भुकंप झाला. परंतु यापूर्वी सुद्धा आपण जापान आणि अन्य ठिकाणी भुकंप आल्याचे आणि त्यामुळे झालेल्या जीवितहानीची दृष्ये ही पाहिली आहेत. मात्र जगात सर्वाधिक भुकंप हे इंडोनेशियात येतात. याचे कारण म्हणजे देश रिंग ऑफ फायरमध्ये असणे. या व्यतिरिक्त जावा आणि सुमात्रा सुद्धा याच परिसरात येतात. प्रशांत महासागरच्या किनाऱ्याला स्थित हा परिसर जगातील सर्वाधिक खतरनाक भू-भाग असल्याचे म्हटले जाते. (Earthquake in India)
भारतात आतापर्यंत सर्वाधिक भुकंप येण्याबद्दल बोलायचे झाल्यास तर तो हिमाचल पर्वत आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे. एका रिपोर्ट्नुसार, जवळजवळ चार कोटी वर्षांपूर्वी भारतीय उपमहाद्वीप येथेच युरेशियाई प्लेटला धडकला होता आणि हिमालय पर्वताची निर्मिती झाली. तो प्रत्येक वर्षाला एक सेंटीमीटरने वर वाढत चालला आहे. याच हालचालीमुळे या परिसरात काही वेळेस भुकंप येतात. हिमालय आणि आसपासच्या भारतात येणारा भाग जसे की, कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम आणि उत्तर-पश्चिमी राज्यांचा समावेश आहे.

हिमालयाच्या खाली ३०० मीटर खोल काळ्या मातीच्या रुपात प्रागैतिहासिक झऱ्याचे अवशेष आहेत. त्याच कारणास्तव अधिक तीव्रतेचे भुकंप येतात. काही भौगोलिक अभ्यास असे सांगतात की, या मातीच्या द्रवीकरणामुळे सर्वाधिक मोठे भुकंप येण्याचा धोका असतो. या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची घर ही दगडांपासून बनवण्यात आलेली आहेत. नेपाळ सुद्धा याच क्षेत्रात येतो. तराई असणारे भारतीय क्षेत्र हे अधिक घनदाट आहे. त्यामुळे मोठा भुकंप आल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता असते.
गेल्या काही दशकांपासून भारत भुकंपाचे केंद्र बनत चालले आहे, बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, भूकंपाचा धोका हा देशातील विविध ठिकाणी वेगवेगळा आहे. त्यामुळेच देशाला काही झोन मध्ये विभागण्यात आले आहे. जसे की, झोन-१, झोन-२, झोन-३, झोन-४ आणि झोन-५. झोन-२ म्हणजे सर्वाधिक कमी धोका आणि झोन-५ म्हणजे सर्वाधिक धोका. भुकंपाच्या दृष्टीने पाहिल्यास सर्वाधिक खतरनाक क्षेत्र म्हणजेझोन ५ मधील गुजरातचे कच्छचा परिसर, उत्तराचंल का एक हिस्सा आणि पुर्वोत्तर मधील अधिक राज्यांचा समावेश आहे. (Earthquake in India)
हे देखील वाचा- युरोपचं वातावरण खालावणार?
झोन- ४ मध्ये मुंबई, दिल्ली सारखी महानगरे आणि त्याव्यतिरिक्त जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम गुजरात, उत्तरांचल, उत्तर प्रदेशातील डोंगराळ क्षेत्र आणि बिहार-नेपाळच्या सीमेकडील काही परिसरांचा समावेश आहे. तर झोन- ३ मध्ये केरळ, बिहार, पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम राजस्थान, पूर्व गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशाचा काही भाग येतो. झोन-२ मध्ये तमिळनाडू, राजस्थान आणि मध्यप्रदेशाचा काही भाग, पश्चिम बंगाल आणि हरियाणाचा समावेश होते. तर झोन-१ मध्ये पश्चिम मध्यप्रदेश, पूर्व महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि उडीसाचा समावेश होतो. या क्षेत्रात भुकंपाचा धोका सर्वाधिक कमी असतो.