2023 हे वर्ष जवळपास अर्धेअधिक संपले आहे. नव्या वर्षाची, 2024 ची चाहूल लागली आहे. मात्र 2023 या वर्षाची सुरुवात आठवतेय का ? नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी हे वर्ष कसं जाणार याची उत्सुकता अनेकांना असते. त्यातूनच ज्योतिषांची मदत घेतली जाते. मात्र 2023 ची सुरुवातच अतिशय थरारक अशा भविष्यवाणींनं झाली. बाबा वेंगा या बल्गेरियाच्या एका महिलेनं 2023 हे वर्ष सर्वात खतरनाक वर्ष असेल अशी भविष्यवाणी कित्येक वर्षापूर्वीच केल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
त्यातील 2023 या वर्षातला सर्वात धोका म्हणजे, एखादे मोठे सौरवादळ किंवा पृथ्वीवर आंतराळातील काहीतरी आदळून होणारा मोठा स्फोट. 2023 मध्ये पृथ्वीवर एखादा उपग्रह आपटणार असून त्यामुळे सर्व पृथ्वी अंधारात जाणार आहे. जवळपास आठवडाभर सर्व उपग्रहांचा संपर्क तुटणार असून पृथ्वीवर सर्वत्र हाहाकार उडणार अशी भविष्यवाणी या बाबा वेंगानं करुन ठेवली आहे म्हणे. ही बाबा वेंगाची भविष्यवाणी 2023 च्या सुरुवातीला अनेकांच्या चर्चेचा विषय झाला होता. मात्र आता सहा महिन्यानंतर ही पुन्हा बाबा वेंगा चर्चेत आली आहे. त्याला कारण आहे, अवकाशात सौरमालेच्या बाहेरील एक ग्रह पृथ्वीवर आदळणार असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. पृथ्वीला टक्कर देणा-या या गुढ ग्रहामुळे पृथ्वीच्या अस्तित्वालाच धोका असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. (Mysterious planet)
अंतराळ हा नेहमी अभ्यासाचा विषय राहिला आहे. या अंतराळात पृथ्वीसारखे हवामान असलेले अनेक ग्रह असल्याचा शोध घेतला जात आहे. तसेच काही ग्रहांवर पृथ्वीपेक्षाही प्रगत जीवन असल्याचा संशय काही खगोलशास्त्रज्ञांना आहे. या रहस्यमयी अवकाशात सौरमालेच्या बाहेरील 9 व्या ग्रह X ची कल्पना मांडण्यात आली आहे. या ग्रहाचा अभ्यास करणा-या शास्त्रज्ञांच्या मते हा 9 वा ग्रह आपल्या पृथ्वीच्या अंताचे कारण बनू शकतो. हा ग्रह पृथ्वीला टक्कर देण्याची शक्यता अधिक आहे. (Mysterious planet)
प्लॅनेट एक्स या नावाने ओळखला जाणा-या या लघुग्रहामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांमध्ये वाद सुरु आहेत. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हा ग्रह पृथ्वीशी आदळण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र काही शास्त्रज्ञ ही प्रक्रीया म्हणजे, निबिरू प्रलय असल्याचे सांगतात. त्यात, एक महाकाय रहस्यमय ग्रह पृथ्वीवर आदळतो, ज्यामुळे सर्वनाश होतो. ही वेळ पृथ्वीवर आता कधीही येऊ शकते, असा दावाही या अभ्यासकांनी केला आहे. 2018 मध्ये, अॅस्टन विद्यापीठातील फिजिक्स प्रोफेसर, रॉबर्ट मॅथ्यू, यांनी निबिरूशी संबंधित विश्लेषण केले आहे. बीबीसी सायन्स फोकस मासिकात त्यांनी या संदर्भात लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी प्लॅनेट एक्स या ग्रहाबाबत लिहिले आहे. हा ग्रह गुरु ग्रहापेक्षा मोठा असल्याचेही स्पष्ट केले आहे. याच संदर्भात लेखिका नॅन्सी लीडरने 1995 मध्ये दावा केला होता की, तिच्याशी एलियन्सने संपर्क साधला होता. त्यांनी निबिरू पृथ्वीवर आदळू शकतो याची कल्पना दिल्याचे सांगितले. एलियनने त्यांना सांगितलेल्या तारखांनुसार 2003 मध्ये जगाचा अंत होईल असा दावा करण्यात आला होता. 21 जून 2020 ही तारीख जगाची अंतिम तारीख असल्याचे प्लॅनेट एक्स या रहस्यमयी ग्रहाच्या अस्तित्वावर विश्वास असलेल्यांनी जाहीर केले होते. मात्र पृथ्वीवर अशी कुठलीही आपत्ती आली नाही. आताही बाबा वेंगाच्या भविष्यवाणीला जोडून प्लॅनेट एक्स या ग्रहाबाबत सांगण्यात येत असले तरी भविष्यात असे कधीही शक्य होणार नाही, असा दावा करणारा एक शास्त्रज्ञांचा गट आहे. (Mysterious planet)
============
हे देखील वाचा : ट्रेनमध्ये विकल्या पेपरमेंटच्या गोळ्या, तर कधी केली ड्रायव्हरची नोकरी… पहा मेहमूदच्या आयुष्याची ट्राजीडी
===========
प्लॅनेट एक्स या ग्रहामुळे होणारी निबिरू प्रलय ही संकल्पना अनेक शास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय राहिली आहे. पहिल्यांदा ही संकल्पाना ZetaTalk वेबसाइटच्या संस्थापक नॅन्सी लिडर यांनी मांडली. त्यातून 2003 हे वर्ष पृथ्वीचे अंतिम वर्ष असल्याचे काही अभ्यासकांनी सांगितले. पण हा दावा फोल ठरला आणि त्या शास्त्रज्ञांची खिल्ली उडवण्यात आली. त्यानंतरही 2000, 2012, 2017 या वर्षात पृथ्वीचा विनाश घडेल अशा वावड्या उठल्या होत्या. पृथ्वीवर धुमकेतू किंवा प्लॅनेट एक्स हा रहस्यमयी ग्रह टक्कर देणार असल्याचे तेव्हाही सांगण्यात येत होते. आता पुन्हा हा प्लॅनेट एक्स ग्रह बाबा वेंगाच्या भविष्यवाणीबरोबर जोडण्यात आला आहे.
सई बने