Home » Earphone चा अधिक वापर करत असाल तर व्हा सावध

Earphone चा अधिक वापर करत असाल तर व्हा सावध

by Team Gajawaja
0 comment
earphone side effects
Share

ईअरफोनचा तुम्ही सतत कानाला लावून ठेवत असाल तर सावध व्हा. कारण याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ईअरफोनचा अधिक वापर हा १०० कोटी तरुणांवर वाईट परिणाम पाडतोय. अशा अंदाज वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन (WHO) कडून लावण्यात आला आहे. खरंतर आजकाल लोकल ट्रेन असो किंवा बस अथवा विमानातून प्रवास करताना आपण ईअरफोन्स कानाला लावून काही ना काही पाहतो, ऐकत राहतो. त्यामुळे मोबाईलसह ईअरफोन सुद्धा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे.(Earphone side effects)

परंतु तुम्ही कधी विचार केला आहे की, ईअरफोन आपल्यासाठी किती धोकायक ठरु शकते. ईअरफोनचा अत्याधिक वापर न केवळ आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवरच नव्हे तर कानाचे पडद्यांवर ही वाईट परिणाम करतात. यामुळे बहिरेपणाची सुद्धा समस्या उद्भवू शकते. त्यामुळे यापासून बचाव कसा करावा याच बद्दल जाणून घेऊयात.

खरंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनच्या नुकत्याच एका अंदाजानुसार हेडफोन किंवा ईअरफोनचा अधिक वापर केल्यास जगभरातील जवळजवळ १०० कोटींहून अधिक तरुणांची ऐकण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. तर गेल्या १० वर्षांकडे पाहिले तर पोर्टेबल ईअरफोनमधून येणारा जोरजोरात आवाज हा काही प्रकारचे साइड इफेक्ट्स समोर आले आहेत. अशातच ज्या लोकांना दीर्घकाळ हेडफोन्स लावण्याची सवय असेल त्यांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. डॉक्टरांच्या मते ईअरफोन्समधून निघणारे लाउड म्युजिक ईअरड्रमला स्पर्श करतात ज्यामुळेच कानाच्या पडद्यांना नुकसान पोहचते.

नियमित रुपात दीर्घकाळ हेडफोन्स लावल्याने केवळ आपले कानच नव्हे तर याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर ही पडतो. खरंतर ईअरफोन्स किंवा हेडफोन्समधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आपल्या मेंदूला प्रभावित करतात. या व्यतिरिक्त ईअरफोन वापरताना आपण बहुतांशवेळा दुसऱ्यांचे सुद्धा वापरतो. असे करणे नुकसानदायक ठरु शकते. ईअरफोन्स एक्सचेंज केल्याने कानासंदर्भात इन्फेंक्शन वाढू शकते. ईअरफोनच्या स्पंजच्या माध्यमातून बॅक्टेरिया तुमच्या कानात जातात.त्यामुळे दुसऱ्याकडून ईअरफोन्स घेताना त्याचे स्पंज स्वच्छ करुनच वापरा. (Earphone side effects)

हेही वाचा- सातत्याने AC चा वापर करत असाल तर होतील ‘या’ समस्या

ईअरफोनच्या दीर्घकालीन वापरामुळे होणारे नुकसान
-डोके दुखी
-बहिरेपणा
-कान दुखणे

असा करा बचाव
जर तु्म्हाला तुमची ऐकण्याची क्षमता दीर्घकाळ टिकवून ठेवायची असेल तर गरज नसेल तर ईअरफोन्सचा वापर करु नका. तसेच ईअरफोन किंवा हेडफोन हे नेहमीच उत्तम क्वालिटीचे असावेत. जेणेकरुन ऐकताना तुम्हाला त्रास होणार नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.