जर तुम्ही इंस्टाग्रामवर रिल्स अथवा पोस्ट शेअर करत असाल तर त्यामधून महिन्याला लाखो रुपये कमावू शकता. अशातच हे कसे करायचे याच बद्दल सांगणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या मनात प्रश्न उपस्थितीत झाला असेल की, हे कसे शक्य आहे? तर पाहूयात इंस्टाग्रामवरुन महिन्याला लाखो रुपये कसे कमावयचे याच बद्दल अधिक. (Earn money from Instagram)
इंस्टाग्रामवर तयार करा रिल्स आणि कमवा
इंस्टाग्रामवर रिल्स बनवून तुम्ही खुप कमाई करु शकता. यासाठी तुम्हाला रिल्स मात्र जरुर तयार करावे लागतील. यावेळी लक्षात असू द्या की, ज्या अकाउंटवरुन रिल्स पोस्ट करत आहात तेथून ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. यासाठी तुम्ही काहीवेळेस पेड प्रमोशन ही करु शकता. याची मदतीने काही कंटेट क्रिएटर्स खुप पैसे कमावत आहेत. पण पैसे कमावण्याचा त्यांना एक सोप्पा मार्ग मिळाला आहे. अशातच तुम्ही घरबसल्या याच्या माध्यमातून पैसे कमावू शकता.
इंस्टाग्रामवरुन पैसे कमवा
इंस्टाग्रामवर पोस्ट करुन ही तुम्हाला खुप पैसे मिळू शकतात. काही इंस्टाग्राम युजर्स ही यामधून पैसे कमावत आहेत. जर तुम्हाला सुद्धा इंस्टाग्रामवर पोस्ट करुन पैसे कमावयचे असतील तर सर्वात प्रथम तुमचे प्रोफाइल अपडेट आणि व्यवस्थितीत ठेवावे लागेल. अशातच तुमची पोस्ट जेव्हा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचली जाईल तेव्हा तुम्ही त्यामधून कमाई करु शकता. अथवा तुम्ही थेट क्लाइंटकडून ही पैसे कमावू शकता.
इंस्टाग्रामवर जाहिरात
जर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट खुप प्रसिद्ध झाले तर तुम्ही जाहिरातीचा फायदा घेऊ शकता. या फिचरमध्ये तुम्हाला थेट इंस्टाग्रामच्या साइटवरुन पैसे दिले जातात. मात्र तुमचे खाते खुप प्रसिद्ध असले पाहिजे. इंस्टाग्राम प्रोफाइल जेवढे अधिक प्रसिद्ध तेवढेच व्हायरल होण्याच्या शक्यता जास्त असतात. अशातच तुम्ही पैसे ही कमावू शकता. (Earn money from Instagram)
या व्यतिरिक्त इंस्टाग्रामवरील रिल्सच्या फ्रंटला शॉर्ट टेक्स लिहिणे ही तुमच्या फायद्याचे ठरेल. तुम्ही किती रंगीत आणि क्रिएटीव्ह कॅप्शन लिहिता हे सुद्धा महत्वाचे असते. जेणेकरुन तुमची अशातच रिल्स व्हायरल झाल्यास तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता वाढते. त्याचसोबत रिल्स संदर्भातील काही माहिती डिस्क्रिप्शन मध्ये ही तुम्ही देण्यास विसरु नका.
हे देखील वाचा- WhatsApp बनलाय स्पॅमिंगचा अड्डा, ९५ टक्के युजर्सला येतात असे मेसेज
तसेच तुम्ही उत्तम रिल्स बनवत असाल तर इंस्टाग्रामच्या रिल्सच्या गॅलरी मधून AR इफेक्टचा वापर करु शकता. बहुतांश क्रिएटर्स ही इंस्टाग्रामवर असलेले एआर इफेक्ट वापरतात. जेणेकरुन तुमची रिल्स खुप सुंदर आणि वेगळी दिसते.