Heart Attack : हृदयरोग हे आजच्या काळातील सर्वात गंभीर व जलद वाढणारे आरोग्यसमस्या आहे. अनेकदा हार्ट अटैक अचानक झाल्यासारखा वाटतो, परंतु प्रत्यक्षात शरीर काही तास आधीच धोक्याचा इशारा देत असते. या संकेतांकडे वेळेत लक्ष दिल्यास मोठी दुर्घटना टाळता येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, धूम्रपान करणारे आणि जास्त तणावात राहणारे लोक हा धोका अधिक असतो. (Heart Attack)
छातीत जडपणा आणि वेदना सर्वात महत्वाचा संकेत हार्ट अटैकचा सर्वात सामान्य व गंभीर संकेत म्हणजे छातीत वेदना किंवा जडपणा जाणवणे. काही सेकंदांपुरता नाही, तर काही मिनिटे टिकणारा दाब, जळजळ, खूप ताण जाणवणे हे दुर्लक्षित करू नये. ही वेदना कधी कधी डाव्या हाताकडे, खांद्याकडे, पाठीत वा जबड्यापर्यंत पसरू शकते. विशेषतः चालताना, जिने चढताना ही वेदना तीव्र होते. हा संकेत दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Heart Attack
अचानक श्वास घेण्यास त्रास आणि थकवा शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळणं थांबलं की श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. कोणतीही शारीरिक मेहनत न करता दम लागणे, श्वास अडकणे, अगदी छातीत दडपण जाणवणे हे हार्ट स्ट्रोकचे आधीचे लक्षण असू शकते. काही जणांना अचानक तीव्र थकवा जाणवतो, चालताना किंवा बोलताना दम लागतो. हा त्रास वारंवार होत असल्यास दुर्लक्ष करू नका. (Heart Attack)
घाम येणे, भोवळ येणे आणि मळमळ अचानक थंड घाम येणं, अंग थरथरणं, भोवळ येणे किंवा उलटीची भावना येणे हेही हृदयावर ताण वाढल्याचे संकेत असू शकतात. विशेषतः महिलांमध्ये हे लक्षण जास्त आढळते. पोट दुखणे, मळमळ अशा तक्रारींमुळे अनेकदा लोक हे फक्त अॅसिडिटी समजून सहजगत्या दुर्लक्ष करतात. मात्र हे हार्ट अटैकचे संकेतही असू शकतात.

Heart Attack
हातापायात मुंग्या आणि अनियमित धडधड डाव्या हातात, खांद्यात किंवा मान दुखण्यासोबत मुंग्या येणे, हात सुन्न होणे हे लक्षण हार्टच्या ब्लॉकेजबद्दल माहिती देतात. त्याचबरोबर हृदयाची धडधड अचानक वाढणे, अनियमित होणे (Palpitations) हेही धोक्याचे चिन्ह आहे. या सर्व संकेतांना वेळेत प्रतिसाद दिल्यास जीव वाचण्याची संधी वाढते. (Heart Attack)
=================
हे देखील वाचा :
Health : दिवाळीत फराळ खाऊन त्रास होतोय मग करा झटपट ‘हे’ उपाय
हार्ट अटैक टाळण्यासाठी काय करावे?
रक्तदाब आणि शुगरची नियमित तपासणी
कमी मीठ-मसाल्याचा व कमी तेलकट आहार
धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहणे
नियमित व्यायाम, योग आणि स्ट्रेस मॅनेजमेंट
वजन नियंत्रित ठेवणे व पुरेशी झोप घेणे
तज्ज्ञ सांगतात की, शरीर कधीही विनाकारण संकेत देत नसते. त्यामुळे वरील कोणतीही लक्षणे जाणवताच ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. योग्य वेळी योग्य उपचार मिळाले, तर हार्ट अटैकसारखी जीवघेणी घटना रोखता येऊ शकते. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी ही माहिती जीवनरक्षक ठरू शकते. काळजी घ्या, सावध रहा
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
