Arthritis : आजच्या वेगवान जीवनशैलीत सांधेदुखी हा अनेकांसाठी कायमस्वरूपी त्रास बनला आहे. पण अनेकदा लोक ही समस्या वय वाढल्यामुळे होते असा समज करून दुर्लक्ष करतात. मात्र ही वेदना आर्थ्रायटिसची सुरुवात असू शकते. तज्ज्ञांच्या मते, वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास हे आजार पुढे गंभीर होऊ शकतो. त्यामुळे आर्थ्रायटिसची प्रारंभिक लक्षणे आणि त्यावरील बचाव जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (Arthritis)

Arthritis
आर्थ्रायटिस म्हणजे नेमके काय?आर्थ्रायटिस म्हणजे सांध्यांमध्ये सूज येणे, वेदना, कडकपणा आणि हालचालींवर मर्यादा येणे. या आजाराचे दोन प्रमुख प्रकार आहेत:
ऑस्टिओआर्थ्रायटिस हाडांच्या टोकांवरील कार्टिलेज झिजल्याने होणारा आजार रुमेटॉइड आर्थ्रायटिस प्रतिकारशक्ती स्वतःच्या सांध्यांवर हल्ला करते हा आजार फक्त वृद्धांचाच नाही तर आजकाल तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतो. लठ्ठपणा, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि ताण हे मुख्य कारणांपैकी आहेत.(Arthritis)
सुरुवातीची लक्षणे कोणती? तज्ज्ञ सांगतात की, ही 5 लक्षणे आर्थ्रायटिसची पहिली घंटा असू शकतात (Arthritis)
सकाळी उठल्यावर सांधे कडक होणे
सांध्यांमध्ये सुज व उष्णता वाटणे
जास्त वेळ चालल्यावर किंवा जिने चढताना वेदना वाढणे
सांधे ‘कटकट’ आवाज करणे
नेहमी थकवा आणि कमजोरी जाणवणे

Arthritis
जीवनशैलीत बदल — आर्थ्रायटिसपासून वाचवायचे सोपे मार्ग आर्थ्रायटिस होण्यापूर्वीच प्रतिबंध महत्त्वाचा! तज्ज्ञांसोबत जाणून घ्या हेल्दी टिप्स
वजन नियंत्रणात ठेवा– अत्याधिक वजनामुळे गुडघ्यांवर ताण वाढतो
नियमित व्यायाम – योगा, स्विमिंग आणि वॉकिंग सांध्यांसाठी उत्तम
कॅल्शियम व व्हिटॅमिन Dयुक्त आहार– दूध, पनीर, पालक, मोड आलेली कडधान्ये
एंटिऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ– हळद, लसूण, शेवग्याची पाने, सुका मेवा
धूम्रपान आणि अल्कोहोल टाळा
=====================
हे देखील वाचा :
=====================
डॉक्टरांची मदत का आवश्यक?
आर्थ्रायटिस दीर्घकालीन असू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतीही औषधे न वापरणे योग्य.
-
एक्स-रे, एमआरआयद्वारे अचूक निदान
-
फिजिओथेरपी आणि औषधांनी वेदना नियंत्रित
-
गंभीर स्थितीत शस्त्रक्रिया आवश्यक
आर्थ्रायटिस हा वयानुसार येणारा स्वाभाविक आजार नसून, जीवनशैलीतील चुका आणि सांध्यांवर होणाऱ्या ताणामुळे तो वाढतो. सुरुवातीची लक्षणे ओळखून योग्य उपचार घेतल्यास वेदनामुक्त आणि सक्रिय जीवन जगणे शक्य आहे. (Arthritis)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
