Home » वेळेआधीच आलेल्या मेनोपॉजमुळे महिलांच्या शारिरीक-मानसिक आरोग्याला धोका

वेळेआधीच आलेल्या मेनोपॉजमुळे महिलांच्या शारिरीक-मानसिक आरोग्याला धोका

by Team Gajawaja
0 comment
Early menopause
Share

मेनोपॉज महिलांच्या आयुष्यातील एक महत्वाचे वळण असते. याचा प्रभाव मासिक पाळीवर होतो. म्हणजेच महिलांची प्रजनन क्षमता बंद होते. यानंतर त्या आई बनू शकत नाहीत. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी सर्वसामान्यपणे ४५ ते ५० वयोगटातील महिलांमध्ये दिसून येते. दरम्यान, मेनोपॉजमुळे केवळ मासिक पाळी किंवा प्रजनन क्षमता बंद होण्यापर्यंत मर्यादित नाही. यामुळे महिलांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर ही सखोल परिणाम होतो. मेनोपॉज दरम्यान, महिलांमध्ये चिडचिडेपणा, तणाव, मूड स्विंग, थकवा, शारिरीक संबंध प्रस्थापित करताना दुखणे असा समस्या येऊ शकतात. काही रिसर्चमध्ये असे ही समोर आले आहे की या दरम्यान, जर महिलांना त्यांच्या परिवाराची साथ मिळाली नाही तर त्या तणावाच्या शिकार होतात. (Early menopause)

सध्याच्या दिवसात बदलत्या लाइफस्टाइलमुळे महिलांमध्ये मनोपॉजची समस्या इरेग्युरल झाली आहे. काही महिलाना वेळेपूर्वीच अथवा उशिराने मेनोपॉजची समस्या उद्भवते. परंतु योग्य डाएट आणि मानसिक सपोर्टमुळे मेनोपॉजच्या दरम्यान होणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात.

मेनोपॉजमुळे परिवारत फूट पडू शकते
वरिष्ठ साइकोलॉजिस्ट यांनी असे म्हटले आहे की, मेनोपॉजी ही अशी स्थिती आहे जेथे महिलांच्या शरिरातील हार्मोन्सचा स्तर वेगाने बदलत राहतो. हार्मोन्समध्ये होत असलेल्या अशा बदलावामुळे त्यांना राग येणे, चिडचिड होणे आणि स्वत: प्रति नाराजी वाटणे असे होते. काही वेळेस त्यांचा राग दुसऱ्यांवर ही निघतो. त्यांना आधाराची गरज असे. मात्र तसे न होता त्यांना काहीवेळेस उलट ऐकवले जाते. अशातच परिवारात समस्या उद्भवू लागतात. घरातील पुरुष मंडळींना महिलांची अशी स्थिती बहुतांशवेळा कळत नाही. त्यामुळे संबंध बिघडू लागतात.

वेळेपूर्वी मेनोपॉज येण्यामुळे धोका
मेनोपॉजी ही एक नैसर्गिक प्रकिया आहेच आणि ती प्रत्येक महिलेसोबत एका मर्यादित कालावधीने होते. मात्र आजकाल अनहेल्दी लाइफ स्टाइलच्या कारणास्तव महिलांमध्ये मेनोपॉजची समस्या आधीच सुरु होते.अनहेल्दी लाइफ स्टाइल महिलांच्या शरिराला अर्ली मेनोपॉजसाठी तयार करते. मात्र त्यांचे मन अशा बदलावास मान्य करत नाही. त्यामुळेच महिलांना मानसिक समस्या उद्भवू शकतात. (Early menopause)

हे देखील वाचा- वयाच्या २० व्या वर्षीच केस पांढरे झालेत? हृदय-मेंदूसाठी ठरेल धोकादायक

डाएट-सप्लीमेंटच्या मदतीने अर्ली मेनोपॉजपासून दूर रहा
आजकाल ३५ ते ४० वर्षातील महिलांना अनियमित पीरियड्ची समस्या असते. यापासून दूर राहण्यासाठी चहा, कॉफी, अल्कोहोल, सिगरेट पासून दूर रहावे. दररोज व्यायाम करावा. हिरवी फळं आणि खुप पाणी प्यावे. या व्यतिरिक्त अशा स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंट्स ही घेऊ शकता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.